पिंपरी चिंचवड : भाजपने उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का दिला आहे. ठाकरेंनी मावळ लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरवलेले आणि पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष संजोग वाघेरेंना (Sanjog Waghere) भाजपने आपल्याकडे घेतलं आहे. आज मुंबईत प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत दुपारी बारा वाजता त्यांचा प्रवेश होईल. सोबत अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील काही माजी नगरसेवकांचा प्रवेश होईल, थोड्याचं वेळात ही नावं सर्वांना समजतील, असा दावा वाघेरेंनी (Sanjog Waghere) केला आहे. त्यांच्या पत्नी उषा वाघेरे प्रभाग क्रमांक 21 मधून भाजपच्या तिकिटावर लढणार आहेत. त्यामुळं प्रभाग 21 मधील इच्छुकांमध्ये नाराजी उफाळू शकते. ती नाराजी वरिष्ठ नक्की दूर करतील असा विश्वास वाघेरेंनी व्यक्त केला. (Sanjog Waghere)
ठाकरेंच्या सेनेचा राजीनामा दिलेले पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघरेंचा आज मुंबईत प्रवेश होण्याची शक्यता आहे. पिंपरीतून ते सकाळी 8 वाजता ते मुंबईकडे मार्गस्थ झाले आहेत. दुपारी 12च्या सुमारास हा प्रवेश होईल, अशी सूत्रांनी माहिती दिलीये.संजोग वाघेरे यांनी मावळ लोकसभेची निवडणूक ठाकरे सेनेकडून लढवली होती. वाघेरे यांना सहा लाख मतं मिळाली होती. मात्र शिंदे सेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव झाला होता. 2029ची लोकसभा भाजपने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यास वाघेरे हे भाजपचे संभाव्य उमेदवार असू शकतात. तसेच वाघेरे यांच्या पत्नी अथवा मुलगा पिंपरी पालिकेची निवडणूक भाजपच्या तिकिटावर लढवू शकतात. संजोग वाघेरेंनी आजच्या भाजप प्रवेशाला दुजोरा दिलाय. मुंबईत प्रदेशाध्यक्ष रविंद चव्हाणांच्या उपस्थितीत हा प्रवेश होईल.
Sanjog Waghere: पक्षप्रवेशाआधी भावना व्यक्त करताना म्हणाले...
आदरणीय उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर विश्वास टाकून मला लोकसभेला उमेदवारी दिली त्यांच्याबद्दलचा आदर आजही माझ्या मनात आहे आणि त्याबाबतीत कोणतीही शंका नाही, परंतु येत्या काळामध्ये पिंपरी चिंचवडची वाढती लोकसंख्या आणि जे काही विकास आहेत त्याला चालना देण्यासाठी भाजपच्या सोबत जात आहे, केंद्रात आणि महाराष्ट्रात त्यांची सत्ता असल्यामुळे हे प्रश्न सोडवण्यासाठी सोपे जातील असे संजोग वाघेरे यांनी म्हटलं आहे. माझ्यासोबत काही नगरसेवक आहेत पदाधिकारी आहेत, तेही आजच्या प्रवेशामध्ये आहेत, आज पक्षप्रवेश झाल्यानंतर नगरसेवकांची नाव तुम्हाला कळतील, काही लोक पुढे गेलेले आहेत. महानगरपालिकेसाठी माझी पत्नी निवडणुकीच्या रिंगणात आहे,अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
Sanjog Waghere: 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश, लोकसभेला पराभव
2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Election 2024) संजोग वाघेरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटातून त्यांनी मावळ लोकसभेची निवडणूक लढवली होती. महायुतीकडून शिंदे गटाचे श्रीरंग बारणे त्यांच्यासमोर उमेदवार होते. बारणे विरुद्ध वाघेरे यांच्या सामन्यात श्रीरंग बारणे यांनी पुन्हा बाजी मारल्याचं पाहायला मिळालं होतं.
Sanjog Waghere: संजोग वाघेरे कोण आहेत?
माजी महापौर दिवंगत भिकू वाघेरे यांचे ते पुत्र आहेत. संजोग वाघेरे राष्ट्रवादीच्या तिकिटावर तीन वेळा नगरसेवक राहिलेतमहापौर म्हणून त्यांनी कारभार पाहिलायत्यांच्या पत्नी ही नगरसेविका होत्यास्थायी समितीचे अध्यक्ष पद ही त्यांनी भूषवले आहेसंजोग वाघेरे राष्ट्रवादीचे सलग 8 वर्षे शहराध्यक्ष राहिलेतशरद पवार आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून या कुटुंबाकडे पाहिलं जात होते2024 च्या लोकसभा निवडणुकीपुर्वी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश2024 च्या लोकसभेला मावळ लोकसभा मतदारसंघातून श्रीरंग बारणे यांच्याकडून पराभूत18 डिसेंबर शिवसेना ठाकरे गटाचा शहराध्यक्षपदाचा राजीनामाआज भाजपमध्ये करणार प्रवेश