Bulli Bai App Case : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून बुली बाईप्रकरण गाजत आहे. 'बुली बाई' अॅप्लिकेशन प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना अटक केली आहे. हे प्रकरण संपले असे वाटत असतानाच असाच प्रकार पुण्यातही उघडकीस आला आहे. मुंबईनंतर पुण्यात असा प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील खडकी परिसरात देखील बुली बाईसारखं प्रकरण घडलं असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. परिसरात राहणाऱ्या महिलांचे व मुलींचे फोटो काढत ते अश्लील बनवून सोशल मीडियावर व्हायरल केल्या प्रकरणी खडकी पोलीसांनी एका तरुणाला अटक केली आहे. करण्यात आलेला आरोपी काही व्हाट्सअॅप ग्रुप मध्ये एड होता. त्या ग्रुपच्या माध्यमातून तरुणाला फोटो एडिट कसं करायचा आणि इतर गोष्टींबद्दलची माहिती मिळाली. तो काम धंदा काहीच करत नाही असे समोर आले आहे. तसचे  त्याचे आई-वडील मजुरी काम करतात. महागड्या मोबाईलच्या माध्यमातून आरोपी एडिटिंग करत होता. आरोपीला पोलिसांनी बुधवारी कोर्टात हजर केलं. त्यानंतर न्यायालयाकडून पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.  


खडकी येथे राहत असलेल्या एका 25 वर्षीय तरुणाने हे कृत्य केले आहे. 9 ९ जानेवारी रोजी हा सगळा प्रक्रार घडला आहे. खडकी पोलीस स्टेशनमध्ये 10 जानेवारीला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने तो राहत असलेल्या परिसरातच महिला आणि अल्पवयीन मुलींचे फोटो, व्हिडिओ स्वतःच्या मोबाईल मध्ये काढले आणि नंतर त्याला अश्लील रित्या एडिट करत ते सोशल मीडिया वर व्हायरल केलं. आणि हा तरुण 2019 पासून हे कृत्य करत असल्याच उघड झालं आहे.


त्याचबरोबर या आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईल हँडसेट सह त्याने अनेक वेगळे वेगळे मोबाईल वापरल्याच देखील उघड झाल आहे. त्याच्या कडे आणखीन तपास सुरू असून आतापर्यंतच्या तपासात त्याने  व्हायरल केलेल्या व्हिडिओ मध्ये 18 वर्षा खालील 4 मुलींची तर तीन महिलांची नावे समोर आली आहेत. या आरोपीला अटक केल्यानंतर आता कोर्टाने 15 तारखेपर्यंत पोलिस कस्टडी दिली आहे त्याच बरोबर या आरोपी बरोबर आणखीन त्याचे साथी आहेत का या दिशेनेही आता पोलीस शोध घेत आहेत..