Rupali Patil quits MNS :मनसेच्या माजी नगरसेविका आणि प्रवक्त्या रुपाली पाटील यांनी मंगळवारी मनसेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आज पत्रकार परिषदेत त्यांनी मौन सोडले. मनसेतून बाहेर पडण्याचा निर्णयावर सांगताना त्यांनी कोणातही बदल घडत नसल्यास स्वत: मध्ये बदल घडवावेत असे सूचक वक्तव्य रुपाली पाटील यांनी केले. गुरुवारी मुंबईत रुपाली पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे. 


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पुणे दौरा आजपासून सुरू होत असताना त्याच्या काही तास आधीच पुण्यातील मनसेच्या नेत्या रुपाली पाटील यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे पुण्यातील मनसेला मोठा धक्का बसला आहे. रुपाली पाटील यांनी पक्ष सोडण्याचे कारण आणि पुढील वाटचालीबाबत पत्रकार परिषदेत भाष्य केले. पक्षाच्या आंदोलनात सात दिवस तुरुंगवास भोगला आहे. मनसेत निस्वार्थीपणे काम करणारे अनेक कार्यकर्ते आहेत. त्यांच्याबद्दल आदर आणि प्रेम आहे. मनसे अथवा महाराष्ट्र सैनिकांना बदनाम करणार नसल्याचे रुपाली पाटील यांनी म्हटले. 


रुपाली पाटील काय म्हणाल्या ?


मी  मनसेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.  राज ठाकरे यांना पाहून राजकारणात आले. मला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्याबद्दल वाईट बोलणार नाही. ती माझी वृत्ती नसल्याचे पाटील यांनी सांगितले. राजीनामा देण्याआधी माझ्या मनातील खदखद राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहचवली आहे. काही अपरिहार्य कारणांमुळे राजीनामा दिला असल्याची कबुली त्यांनी दिली. मुंबईत काही कामानिमित्त मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि युवा सेना नेते वरूण सरदेसाई यांची भेट झाली असल्याचे रुपाली पाटील यांनी म्हटले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha