एक्स्प्लोर

रुपाली चाकणकरांकडून माझ्या जीवाला धोका; महिला आयोगाकडे तक्रार, सोबत ऑडिओ क्लिप

मी चार-पाच दिवसांपूर्वी फेसबुकवर महिला आयोगाला सक्षम नेतृत्वाची गरज आहे, अशा आशयाची पोस्ट लिहिली होती.

मुंबई : पुण्यातील वैष्णवी हगवणे (Vaishnavi hagwane) आत्महत्याप्रकरणानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होऊ लागला. त्यानंतर, भाजपच्या महिला आघाडीने पुण्यातील कोर्ट परिसरात राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध तीव्र आंदोलन केले होते. तर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षातील समर्थकांकडून महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनाही जाब विचारला जात होता. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहणी खडसे आणि रुपाली चाकणकर यांच्यात शाब्दीक चकमकही पाहायला मिळत होती. त्यातच, एका महिलेला रुपाली चाकणकर (Rupali chakankar) यांच्या समर्थक महिलेनं फोन करुन धमकी दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. आता,  संगिता भालेराव यांना फोन करून धमकी दिल्याप्रकरणी, भालेराव यांनी राज्य महिला आयोग, मुख्यमंत्री कार्यालय व पुणे (Pune) पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या कार्यकर्त्या व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युवती सेल च्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सोनाली गाडे यांनी ही धमकी दिल्याचं संगिता भालेराव यांनी तक्रारीत म्हटलं आहे. 

मी चार-पाच दिवसांपूर्वी फेसबुकवर महिला आयोगाला सक्षम नेतृत्वाची गरज आहे, अशा आशयाची पोस्ट लिहिली होती. त्यामुळे रूपाली चाकणकर यांच्या कार्यकर्त्या व त्यांच्या पक्षाच्या पदाधिकारी सोनाली गाडे यांनी चिडून पदाची धमकी देत मला अनेक फोन केले. त्यातील एक फोन मी उचलला असता तिने धमकी व शिवीगाळ केली, मी कोणत्याही प्रकारे पोस्टमध्ये अथवा कमेंटमध्ये चुकीचा मजकूर लिहिलेला नाही, महिला आयोगाचं काम सुधारावे ही मागणी करणे हा माझा संवैधानिक हक्क आहे, व त्याबाबतच मी बोललेले होते, असे सोनाली गाडे यांनी म्हटलं आहे. तसेच, सोनाली अजित गाडे यांचेवर यापूर्वी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे सोनाली गाडे व हे ज्यांच्यासाठी मला धमकी दिली, त्या रूपाली चाकणकर यांच्याकडून माझ्या जीवितास धोका आहे. त्यामुळे माझी रुपाली चाकणकर, सोनाली गाडे, स्नेहल चव्हाण यांच्या विरोधात तक्रार आहे, असे संगिता भालेराव यांनी म्हटलं आहे.

चाकणकरांविरुद्ध तक्रारीच्या पत्रात नेमकं काय?

मी महिला म्हणून तसेच सामाजिक कार्यात सक्रिय असल्याने वैष्णवी हगवणे-कस्पटेसारख्या घटना मनाला हेलावून टाकतात व त्या संवेदनशीलतेमधून मागणी करणे तसेच त्याबाबत विचारणा करणे हे माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. मी देखील तेवढेच केले होते, तरीही माझ्या अभिव्यक्तीची गळचेपी सोनाली गाडे या व्यक्तीने करण्याचा प्रयत्न केला आहे. मला धमकावून ती पोस्ट डिलीट करण्यासाठी प्रवृत्त केले, तसेच अन्य ठिकाणी सोशल मिडीयावर मला असभ्य शब्द वापरले धमकी देत शिवीगाळही केली. महिलांसाठी सर्वात वाईट समजला जाणारा शब्द म्हणजे वांझोटी अशा शब्दांसारखे अनेक क्रूरता स्पष्ट करणारे व महिला म्हणून मला लज्जा उत्पन्न करणारे अपमानित करणारे शब्दप्रयोग त्यांनी केले असल्याने मला मानसिक त्रास झाला आहे. तसेच हे सगळं त्यांनी सोशल मीडियामध्ये केले असल्याने माझी बदनामी देखील झाली आहे. त्या एका राजकीय सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकारी आहेत व त्यांच्या पदाचा त्या गैरवापर करू शकतात असे त्यांनी खुद्द धमकी देत बोलून दाखवले आहे. तसेच, त्यांनी 8379955110 या नंबरवरून मला कंटिन्यू 18 कॉल केलेले असल्याने त्यांच्या डोक्यात किती चीड असेल याचा अंदाज येईल. त्यासोबतच सोनाली अजित गाडे यांचेवर यापूर्वी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे सोनाली गाडे व हे ज्यांच्यासाठी केले, त्या रूपाली चाकणकर यांच्याकडून माझ्या जीवितास धोका आहे. त्यामुळे, माझी रूपाली चाकणकर, सोनाली गाडे, स्नेहल चव्हाण यांच्या विरोधात तक्रार आहे, असे संगिता भालेराव यांनी महिला आयोगाकडे केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. तसेच, सोनाली गाडे यांच्यासमवेतच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप देखील इ-मेलसोबत जोडल्याचे सांगितले आहे. 

हेही वाचा

स्लिप होऊन पलटी, कारचा चेंदामेंदा; भीषण अपघातात मुंडेंचे निष्ठावंत माजी आमदार आर.टी देशमुख कालवश

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : संयुक्त सभेआधी ठाकरे बंधूंचा शाखा भेटीचा सपाटा सुरुच, शिवसैनिक-मनसैनिकांत मोठा उत्साह
संयुक्त सभेआधी ठाकरे बंधूंचा शाखा भेटीचा सपाटा सुरुच, शिवसैनिक-मनसैनिकांत मोठा उत्साह
Election : बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा
बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा
शिवसेना उमेदवाराच्या बापाचा प्रताप; लेकाच्या हातात 10 लाखांचं घड्याळ, पण घरभाडे मागितल्याने प्रकल्पबाधितांना दमदाटी
शिवसेना उमेदवाराच्या बापाचा प्रताप; लेकाच्या हातात 10 लाखांचं घड्याळ, पण घरभाडे मागितल्याने प्रकल्पबाधितांना धमकी
Indore Accident: घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार

व्हिडीओ

Aaditya Thackeray Speech Dadar : आदित्य ठाकरेंचं दादरमध्ये दणदणीत भाषण, मुख्यमंत्र्‍यांवर टीका
Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण
Uddhav Thackeray Speech Nashik : भाजपने झेंड्यावरील हिरवा रंग काढावा ; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले
Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE
Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : संयुक्त सभेआधी ठाकरे बंधूंचा शाखा भेटीचा सपाटा सुरुच, शिवसैनिक-मनसैनिकांत मोठा उत्साह
संयुक्त सभेआधी ठाकरे बंधूंचा शाखा भेटीचा सपाटा सुरुच, शिवसैनिक-मनसैनिकांत मोठा उत्साह
Election : बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा
बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा
शिवसेना उमेदवाराच्या बापाचा प्रताप; लेकाच्या हातात 10 लाखांचं घड्याळ, पण घरभाडे मागितल्याने प्रकल्पबाधितांना दमदाटी
शिवसेना उमेदवाराच्या बापाचा प्रताप; लेकाच्या हातात 10 लाखांचं घड्याळ, पण घरभाडे मागितल्याने प्रकल्पबाधितांना धमकी
Indore Accident: घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
पुण्यात पद्मभूषण माधव गाडगीळांच्या अंत्यविधीला अवघे 50 लोक, एकही स्थानिक नेता नाही; समाज कुठं चाललाय?
पुण्यात पद्मभूषण माधव गाडगीळांच्या अंत्यविधीला अवघे 50 लोक, एकही स्थानिक नेता नाही; समाज कुठं चाललाय?
मुंबईतील मसिना हॉस्पिटलची माणुसकी मेली, 8 तास मृतदेह अडवून ठेवला, ट्रस्टच्या हॉस्पिटलचा भ्रष्ट कारनामा!
मुंबईतील मसिना हॉस्पिटलची माणुसकी मेली, 8 तास मृतदेह अडवून ठेवला, ट्रस्टच्या हॉस्पिटलचा भ्रष्ट कारनामा!
अजित पवार अन् महेश लांडगेंच्या वादात फडणवीसांची उडी; दादांना शायरीतून टोला, आमदारालाही सल्ला
अजित पवार अन् महेश लांडगेंच्या वादात फडणवीसांची उडी; दादांना शायरीतून टोला, आमदारालाही सल्ला
Charter Plane Crash: 9 आसनी चार्टर्ड विमान कोसळले, पायलटसह 6 जण गंभीर जखमी; भीषण अपघात नेमका घडला तरी कसा?
9 आसनी चार्टर्ड विमान कोसळले, पायलटसह 6 जण गंभीर जखमी; भीषण अपघात नेमका घडला तरी कसा?
Embed widget