पुणे : पुणे लोकसभेची निवडणूक यंदा चांगलीत (Pune Loksabha election) रंगतदार होणार आहे. पुण्यात तिहेरी लढत होणार आहे. त्यातच पुण्याचे तिन्ही उमेदवार म्हणजेच महायुतीचे मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol), महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि वंचितचे उमेदवार वसंत मोरे (vasant More यांनी पुण्याती पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पुण्याच्या विकासासंदर्भात प्रश्न विचारण्यात आले. मात्र या प्रश्नांना उत्तर देताना तिन्ही उमेदवारांमध्ये चांगलीच शाब्दिक बाचाबाची झाल्याचं दिसून आलं.
पुण्यातील तिन्ही उमेदवार कायम नाव न घेता एकमेकांवर टीका करताना आपल्याला दिसले आहेत. तात्या, भाऊ आणि अण्णा एकाच मंचावर असल्याने आमोरासामोर टीका करताना दिसले. त्यामुळे पुण्याच्या विकासावर मत मांडायची सोडून तिन्ही उमेदवारांमध्ये शाब्दिक वॉर पाहायला मिळाले.
यात भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ म्हणाले की, माझं पुणे हे देशातील सर्वोत्तम शहर असावा असा आमचा प्रयत्न असणार आहे. आम्ही शहर म्हणून वाढलो आहे. आमची लोकसंख्या झपाट्याने वाढली म्हणून शहरावर ताण येणार आहेपुण्यात वाहतुकीचा मोठा प्रश्न ,पाण्याचं नियोजन, मेट्रो असे अनेक विषय समोर आहेत. यावर तोडगा काढणार आहोत. आधी केंद्रात, राज्यात आणि पालिकेत एकच सत्ताधारी होते त्यावेळी त्यानी पुढच्या 50 वर्षांचा विचार केला नाही अस मला वाटतं, म्हणत त्यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे. कागदावरची मेट्रो आम्ही सत्यात आणली आधीच्या लोकांनी अनेक कामाची फक्त उद्घाटन केली काम केली नाहीत आम्ही करून दाखवलं. पुण्यात सगळ्या क्षेत्रांत आम्ही काम केलं आहे.ही निवडणूक देशाची दिशा ठरवणारी आहे. देशाचं भविष्य कुणाच्या हातात सुरक्षित राहिल हे पाहणं महत्वाचं असल्याचंही ते म्हणाले.
रवींद्र धंगेकर म्हणाले की, पुणे हे विद्येच माहेर घर आहे. देशातील पहिली मेट्रो काँग्रेसने पळवली.वाहतूक कोंडी कोण आणि कशी सोडवणार, याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. देशात पाहिलं संगणक आम्ही आणलं. सुरेश कलमाडींनी पुण्याचा खरा विकास केला आहे. विचारांची लढाई विचाराने लढ्याला हवी, असंही ते म्हणाले. मात्र यावेळी त्यांनी भाजपला चांगलंच सुनावलं. जर भाजपचे 400 पार होणार असतील तर इथून मी एकटा निवडणून आलो तर काय होतं?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.
वसंत मोरेंचा मोहोळांना टोला
माझा विकासाचा अजेंडा माझ्या डोक्यात कागदावर नाही, असं म्हणत वसंत मोरे यांनी मुरलीधर मोहोळ यांना टोला लगावला आहे. यानंतर वसंत मोरेंनी आपलं पुण्यासंदर्भात असलेलं व्हिजन सांगितलं. ते म्हणाले की, मला पुण्यात विकासाचा पॅटर्न राबवायचा आहे.शहरतील वाहतूक कोंडी ही महत्त्वाची समस्या आहे. शहराच्या चारही बाजूला बस स्थानक होणे आवश्यक आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नीट करावी लागेल. पुण्यात पाणी प्रश्न गंभीर आहे शहरात पाण्याचं नियोजन करण गरजेचं शहराला वेगळं धरण मिळणं गरजेचं आहे. पुणे महापालिका देशातील सगळ्यात मोठी महापालिका झाली आहे. त्यामुळे शहराकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मी शहराचा विकास करणार आहे, असंही ते म्हणाले.
इतर महत्वाची बातमी-