Raj Thackeray : बॅडमिंटनला पूनागेम म्हणायचे, पण सध्या पुण्याचा काय गेम चालूय मला माहिती नाही आणि ज्यांचे गेम चालूयत त्यांना सांगण काही उपयोगाचं नाही. कारण दिसली जमीन की विक हे एकमेव धोरण घेऊन लोक पुढे जातात. त्यांना जर बॅडमिंटनचं मैदान दाखवलं. तर ही जमीन मोकळी का? असं ते विचारू शकतात. बॅडमिंटनपेक्षा (Badminton) कॅरम का नाही खेळत? हेही ते सुचवू शकतात, असे मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले. पुण्यातील एका कार्यक्रमात राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बॅडमिंटनपटूंना संबोधित केलं. यावेळी ते बोलत होते.
'माझ्या हातामध्ये काही द्यायचे नाही, पण अपेक्षा माझ्याकडून फार ठेवायच्या'
राज ठाकरे म्हणाले, मला एका गोष्टीचं फार नवलं वाटतं की, माझ्या हातामध्ये काही द्यायचे नाही. पण अपेक्षा माझ्याकडून फार ठेवायच्या. एकदा हातामध्ये सगळ द्या म्हणजे बघा मी कसा हाणतो ते. हे राजकीय व्यासपीठ नाही. बॅडमिंटन या खेळावरती माझे नितांत प्रेम आहे. जवळपास 15 ते 20 वर्षे मी बॅडमिंटन खेळलोय. एखादा ड्रग असावा त्याच अॅडिक्शन व्हावं. तशाप्रकारे मी बॅडमिंटन खेळायचो. सकाळी सहा किंवा साडेसहाला मी जायचो आणि अकरा-बाराच्या वेळेला मी बॅडमिंटन खेळून परत यायचो. नंतर माझं बॅडमिंटन थांबलं. नंतर मी टेनिस सुरु केलं, असेही ठाकरेंनी स्पष्ट केले.
हात फ्रॅक्चर ते हिप रिप्लेसमेंट काय म्हणाले राज ठाकरे ?
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, एकदा अंगात वीकनेस असताना मी टेनिस खेळायला गेलो होतो. तिथे पडलो आणि हात फ्रॅक्चर झाला. टेनिस खेळून मला टेनिसएल्बो झाला होता. त्यानंतर हात माझा बरा झाला आणि कंबर दुखू लागली. मग डॉक्टरांनी सांगितले की, हिप रिप्लेसमेंट करावी लागेल. मग मला एकाने विचारले की, पूर्ण? मग मी त्याला उत्तर दिले की, अशी पर्ण होते का? असा शरीराचा भाग काढला दुसऱ्याचा लावला अस काही नसतं. त्याला हिप रिप्लेसमेंट म्हणजे काय हे समजून सांगितलं. जवळपास दीड-पाऊणेदोन वर्ष मला कोणत्याही प्रकारचा व्यायाम करता येत नव्हता. मात्र, माझं पुन्हा एकदा टेनिस सुरु झालंय.
मी पुण्यामध्ये बॅडमिंटनसाठी काय करु शकतो माहिती नाही. तुम्ही सांगवे. आपण ते निश्चित पुण्यासाठी करु. बॅडमिंटनसाठी मला जे जे करता येईल ते मी पुण्यासाठी किंवा महाराष्ट्रासाठी नक्की करेन. कारण तो माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. बॅडमिंटनला पुणागेम म्हणायचे, पण सध्या पुण्याचा काय गेम चालूय मला माहिती नाही आणि ज्यांचे गेम चालूयत त्यांना सांगण काही उपयोगाचं नाही. कारण दिसली जमीन की विक हे एकमेव धोरण घेऊन लोक पुढे जातात. त्यांना जर बॅडमिंटनचं मैदान दाखवलं. तर ही जमीन मोकळी का? असं ते विचारू शकतात. बॅडमिंटनपेक्षा कॅरम का नाही खेळत? हेही ते सुचवू शकतात.
'बॅडमिंटन खेळायला कधीही घरच्यांनी मला प्रोत्साहित केलं नाही'
मी ऑस्ट्रेलियाला गेले होतो. तिथून एका गॅलरीतून पाहिले. माझ्यासमोर सर्वत्र समुद्र होता. त्या एका नजरेत 22 स्विमिंग पूल होते. 80 च्या आसपास बॅडमिंटनचे मैदान होते. ऑस्ट्रेलियातील दृश्य पाहिले समजते की, ही स्पोर्ट्स कंट्री आहे. पुढील काळात चांगल बॅडमिंटनपटू बनता आलं तर तुम्हाला आहेच. नाही झालं तर दीपिका पादुकोणकडेही पाहा, असेही राज ठाकरे या वेळी म्हणाले.
Raj Thackeray Full Speech : नाहीतर दीपिका पादुकोण कडे बघा...बॅडमिंटन खेळाडूंसमोर धमाल भाषण!
इतर महत्वाच्या बातम्या