आळंदी (पुणे): दिवेआगर किनाऱ्यावर घडलेल्या भीषण दुर्घटनेतून सुखरूप वाचलेली आळंदी येथील 'विनर्स अकॅडमी'ची एक विद्यार्थिनी सुरक्षितपणे (Raigad Diveagar beach Tragedy) आपल्या पालकांकडे पोहोचली आहे. या दुर्दैवी दुर्घटनेचा अंगावर काटा आणणारा थरार तिने प्रत्यक्षदर्शी म्हणून मांडला, तर दुसरीकडे निष्काळजीपणाचा आरोप करत पालकांनी अकॅडमीच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.(Raigad Diveagar beach Tragedy)

Continues below advertisement

Raigad Diveagar beach Tragedy: पाच मिनिटांत घडला थरार

विद्यार्थिनीने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी ४:३० च्या सुमारास सर्व विद्यार्थी दिव्यागार बीचवर पोहोचले. मुली किनाऱ्यावर सुरक्षितपणे पाण्यात खेळत होत्या, तर पोहता येणारी मुले थोडी पुढे गेली होती. मुलांनी जास्त आत जाऊ नये म्हणून शिक्षक स्वतः त्यांच्यापुढे पाण्यात उभे होते. मात्र, समुद्रात असलेल्या एका खड्ड्याचा आणि पाण्याच्या खोलीचा मुलांना अंदाज आला नाही. तितक्यात एक मोठी लाट आली आणि मुले पाण्यात उलटली. नाकातोंडात पाणी आणि वाळू गेल्यामुळे त्यांना सावरता आले नाही. एका मुलाने हात वर करून 'वाचवा वाचवा' असा आरडाओरड केल्यानंतर किनाऱ्यावरील सर्वांच्या ही गोष्ट लक्षात आली.(Raigad Diveagar beach Tragedy)

Raigad Diveagar beach Tragedy: वाचवण्यासाठी शिक्षकांची धडपड

घटना घडताच शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना तात्काळ पाण्यातून बाहेर पडण्याचे आदेश दिले. शिक्षक आणि पोहता येणाऱ्या २-३ मुलांनी पाण्यात उड्या मारून ३ ते ४ जणांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर सुमारे १० मिनिटांनी पोलीस आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली. त्यांनी उर्वरित मुलांना बाहेर काढून माऊथ-टू-माऊथ ब्रीथिंग आणि सीपीआर (CPR) देऊन वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

Continues below advertisement

Raigad Diveagar beach Tragedy: संस्थेच्या कारभारावर पालकांचा संताप

आपल्या मुलीला सुखरूप परत मिळाल्यानंतर तिच्या वडिलांनी संस्थेच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित केले. "सहल नेण्यापूर्वी पालकांकडून जबाबदारीचे अर्ज भरून घेताना संस्थेने जेवढी तत्परता दाखवली, तेवढी खबरदारी मुलांच्या सुरक्षेबाबत घेतली नाही," असा आरोप पालकांनी केला. एवढ्या मोठ्या संख्येने मुलांना समुद्रावर नेताना अनुभवी सुरक्षा रक्षक आणि योग्य सुरक्षा यंत्रणा सोबत असायला हवी होती, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Raigad Diveagar beach Tragedy: नेमकं काय घडलं?

विनर्स अकॅडमीतील ४८ जणांचा ग्रुप रायगड किल्ला आणि दिवेआगरच्या सहलीसाठी काल (गुरुवारी, ता २) पहाटे आळंदीहून रवाना झाला होता. या गटात २५ मुले, १७ मुली व सहा शिक्षकांचा समावेश होता. दिवसभर पर्यटन केल्यानंतर विद्यार्थी दिवेआगर समुद्रकिनारी गेले. सायंकाळी समुद्रात उतरलेल्या काही विद्यार्थ्यांना समुद्राच्या प्रवाहाचा अंदाज आला नाही. त्यातून ८ विद्यार्थी पाण्यात ओढले गेले. बुडून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावे राजवीर वहिले, सोहम भांडवलकर, कौस्तुभ दौंड, यश वानखेडे, कैवल्य वासनकर, तन्मय वहिले, सुमित अहिरे, प्रणव बनसोडे अशी असून, सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथील समुद्रात बुडून आळंदी येथील आठ विद्यार्थ्यांचा गुरुवारी मृत्यू झाला. हे विद्यार्थी सहलीसाठी आले होते. समुद्रात उतरल्यानंतर त्यांना पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज आला नाही. त्यामुळे ते समुद्राच्या लाटांसोबत वाहून गेले.