पुणे : आळंदीमधून रायगडमधील प्रसिद्ध श्रीवर्धन येथील दिवेआगर समुद्रकिनारी सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांवर काळाने घाला घातला. आळंदी येथील 'विनर्स अ‍ॅकॅडमी' या कोचिंग क्लासच्या 11th आणि 12th सायन्सच्या 8 विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. आता या घटनेनंतरची आंळदी (Raigad Diveagar beach Tragedy) येथे शोककळा पसरली आहे. ही घटना घडली त्यावेळी गुरुवारी 1 ऑक्टोबरला आळंदी पोलीस ठाण्यात नेमकी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी केळगावचे पोलीस पाटील असणारे युवराज वहिले देखील उपस्थित होते. बैठक सुरू असतानाच दिवेआगर येथे गेलेल्या 8 विद्यार्थ्यांच्या मृत्यूची बातमी आली आणि युवराज वहिले यांना मोठा धक्का बसला. कारण या सहलीला त्यांचा मुलगा राजवीर देखील गेला होता.(Raigad Diveagar beach Tragedy)

Continues below advertisement

Raigad Diveagar beach Tragedy : आठ विद्यार्थ्यांमध्ये आपल्या लेकाचं नाव पाहिलं अन्....

बैठकीसाठी पोलीस जमलेले असतानाच पोलीस निरीक्षकांचा फोन वाजला. तिकडून नगराध्यक्ष बोलत होते. त्यांनी पोलिसांनी फोनवर आळंदीतील आठ विद्यार्थी दिवेआगर येथे बुडून मृत्यू झाल्याची बातमी दिली. बैठक सुरू असतानाच नगराध्यक्ष प्रशांत कऱ्हाडे यांनी पोलीस निरीक्षक भीमा नरके यांना फोन करून 'आळंदीतील आठ मुलांचा दिवेआगर येथे समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे, तुम्ही तातडीने नगर परिषदेत या,' असं सांगितलं. ही माहिती कळताच बैठक रद्द करण्यात आली. मात्र, हे वाक्य ऐकताच युवराज वहिले यांना मोठा धक्का बसला. 'माझा मुलगाही याच सहलीसाठी गेला आहे' असं त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांना सांगितलं एक सगळ्यांच्यात थरकाप उडाला. हे सगळं सुरू असतानाच व्हॉट्सॲपवर मृत मुलांच्या नावाची यादी आली आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण, यात तळहाताप्रमाणे जपलेल्या त्यांच्या लेकाचंही नाव होतं. मृत्यू झालेल्या आठ विद्यार्थ्यांमध्ये आपल्या लेकाचं नाव पाहून त्यांना मोठा धक्का बसला. हा प्रकार पाहून पोलीस ठाण्यातील उपस्थित सर्वच अधिकारी आणि नागरिकांचे डोळे पाणावले.

Raigad Diveagar beach Tragedy: नेमकं काय घडलं?

विनर्स अकॅडमीतील 48 जणांचा ग्रुप रायगड किल्ला आणि दिवेआगरच्या सहलीसाठी गुरुवारी, ता 2 पहाटे आळंदीहून रवाना झाला होता. या गटात 25 मुले, 17 मुली व सहा शिक्षकांचा समावेश होता. दिवसभर पर्यटन केल्यानंतर विद्यार्थी दिवेआगर समुद्रकिनारी गेले. सायंकाळी समुद्रात उतरलेल्या काही विद्यार्थ्यांना समुद्राच्या प्रवाहाचा अंदाज आला नाही. त्यातून 8 विद्यार्थी पाण्यात ओढले गेले. बुडून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावे राजवीर वहिले, सोहम भांडवलकर, कौस्तुभ दौंड, यश वानखेडे, कैवल्य वासनकर, तन्मय वहिले, सुमित अहिरे, प्रणव बनसोडे अशी असून, सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथील समुद्रात बुडून आळंदी येथील आठ विद्यार्थ्यांचा गुरुवारी मृत्यू झाला. हे विद्यार्थी सहलीसाठी आले होते. समुद्रात उतरल्यानंतर त्यांना पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज आला नाही. त्यामुळे ते समुद्राच्या लाटांसोबत वाहून गेले.

Continues below advertisement