पुणे : सहलीचा आनंद लुटण्यासाठी हसत-खेळत घराबाहेर पडलेल्या आळंदीतील आठ विद्यार्थ्यांचा दिवेआगरच्या समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. रायगड श्रीवर्धन जिल्ह्यातील तालुक्यातील दिवेआगर (Raigad Diveagar beach death) समुद्रकिनारी काल (गुरुवारी, ता १) सायंकाळी घडलेल्या दुर्घटनेत विनर्स अकॅडमीच्या अकरावी-बारावी विज्ञान शाखेतील आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला.(Raigad Diveagar beach death)
आळंदी येथील 'विनर्स अकॅडमी फॉर ११वी-१२वी सायन्स'च्या विद्यार्थ्यांच्या दिवेआगर सहलीवर गुरुवारी दुःखाचा डोंगर कोसळला. समुद्रात भरतीची वेळ असताना पाण्यात उतरलेल्या ८ विद्यार्थ्यांचा नाकातोंडात पाणी आणि वाळू गेल्याने करुण अंत झाला. जीवरक्षक आणि स्थानिकांनी अवघ्या पाच मिनिटांत सर्वांना बाहेर काढले, मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. मुख्य पर्यटनस्थळापासून काहीशा आडबाजूला असलेल्या आणि कमी वर्दळ असलेल्या किनाऱ्यावर विद्यार्थी समुद्रात उतरले होते. स्थानिक नागरिकांच्या मते, विद्यार्थ्यांना या भागातील समुद्राच्या पाण्याचा आणि खोलीचा अंदाज नव्हता.(Raigad Diveagar beach death)
घटना घडली तेव्हा काल (गुरुवारी, ता 1) भरतीच्या वेळी समुद्रात उतरलेले सुरुवातीला दोन विद्यार्थी एका खड्ड्यात बुडू लागले. त्यांना वाचवण्यासाठी गेलेले आणखी पाच विद्यार्थी आणि इतर साथीदारही पाण्यात अडकले. विद्यार्थ्यांचा आरडाओरड ऐकून किनाऱ्यावर असलेल्या स्थानिकांनी आणि जीवरक्षकांनी तात्काळ समुद्राकडे धाव घेतली. जीवरक्षक व स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत सुरुवातीला ३० ते ३५ विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणले.
Raigad Diveagar beach Tragedy: पाच मिनिटांत बाहेर काढले, पण...
इतर ३०-३५ विद्यार्थ्यांना बाहेर काढल्यानंतर आठ विद्यार्थी अद्याप समुद्रात अडकल्याचे लक्षात आले. जीवरक्षकांनी क्षणाचाही विलंब न लावता पाण्यात शोध घेऊन अवघ्या ५ मिनिटांत या आठही जणांना बाहेर काढले. मात्र, नाकातोंडात मोठ्या प्रमाणावर वाळू आणि पाणी गेल्यामुळे या सर्व आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता.
Raigad Diveagar beach Tragedy: नेमकं काय घडलं?
विनर्स अकॅडमीतील ४८ जणांचा ग्रुप रायगड किल्ला आणि दिवेआगरच्या सहलीसाठी काल (गुरुवारी, ता २) पहाटे आळंदीहून रवाना झाला होता. या गटात २५ मुले, १७ मुली व सहा शिक्षकांचा समावेश होता. दिवसभर पर्यटन केल्यानंतर विद्यार्थी दिवेआगर समुद्रकिनारी गेले. सायंकाळी समुद्रात उतरलेल्या काही विद्यार्थ्यांना समुद्राच्या प्रवाहाचा अंदाज आला नाही. त्यातून ८ विद्यार्थी पाण्यात ओढले गेले. बुडून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावे राजवीर वहिले, सोहम भांडवलकर, कौस्तुभ दौंड, यश वानखेडे, कैवल्य वासनकर, तन्मय वहिले, सुमित अहिरे, प्रणव बनसोडे अशी असून, सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथील समुद्रात बुडून आळंदी येथील आठ विद्यार्थ्यांचा गुरुवारी मृत्यू झाला. हे विद्यार्थी सहलीसाठी आले होते. समुद्रात उतरल्यानंतर त्यांना पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज आला नाही. त्यामुळे ते समुद्राच्या लाटांसोबत वाहून गेले.
