पुणे : दिवेआगर येथे आळंदीहून सहलीसाठी गेलेल्या आठ विद्यार्थ्यांचा झालेल्या दुर्दैवी मृत्यूच्या पार्श्वभूमीवर आळंदी नगरपरिषदेमार्फत शहरातील संबंधित कोचिंग क्लासेस व आस्थापनांची पाहणी (Raigad Diveagar beach Tragedy) करण्यात येत आहे. या अनुषंगाने आळंदी नगरपरिषदेच्या पथकाने विनर्स अकादमीच्या इमारतीची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान नारायण हरिभाऊ दस यांच्या मालकीची मालमत्ता क्र. जुना ११३७, नवीन LAN00001729 या मिळकतीमध्ये विनर्स अकादमी कोचिंग क्लासेस सुरू असल्याचे निदर्शनास आले. सदर आस्थापनेने नगरपरिषदेकडून आवश्यक व्यवसाय परवाना/ना-हरकत प्रमाणपत्र घेतल्याचे नगरपरिषदेच्या अभिलेखावरून निदर्शनास आले नाही. त्यामुळे लागू असलेल्या कायदे व नियमांनुसार आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.(Raigad Diveagar beach Tragedy)
त्यानुसार मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या आदेशानुसार कर विभाग प्रमुख श्रीमती सीमा चारवे यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेच्या पथकाने विनर्स अकादमीची सदर मिळकत सील करण्याची कार्यवाही केली. या कार्यवाहीदरम्यान पोलीस प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यवाही ही संबंधित आस्थापनांनी आवश्यक परवानग्या व नियमांचे पालन करावे तसेच नगरपरिषदेकडून लागू असलेल्या कायदेशीर तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्याच्या अनुषंगाने करण्यात आली आहे, अशी माहिती आळंदी नगरपरिषदकडून देण्यात आली आहे.
Raigad Diveagar beach Tragedy: संस्थेच्या कारभारावर पालकांचा संताप
आपल्या मुलीला सुखरूप परत मिळाल्यानंतर तिच्या वडिलांनी संस्थेच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित केले. "सहल नेण्यापूर्वी पालकांकडून जबाबदारीचे अर्ज भरून घेताना संस्थेने जेवढी तत्परता दाखवली, तेवढी खबरदारी मुलांच्या सुरक्षेबाबत घेतली नाही," असा आरोप पालकांनी केला. एवढ्या मोठ्या संख्येने मुलांना समुद्रावर नेताना अनुभवी सुरक्षा रक्षक आणि योग्य सुरक्षा यंत्रणा सोबत असायला हवी होती, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
Raigad Diveagar beach Tragedy: दिवेआगर येथे नेमकं काय घडलं?
विनर्स अकॅडमीतील ४८ जणांचा ग्रुप रायगड किल्ला आणि दिवेआगरच्या सहलीसाठी काल (गुरुवारी, ता २) पहाटे आळंदीहून रवाना झाला होता. या गटात २५ मुले, १७ मुली व सहा शिक्षकांचा समावेश होता. दिवसभर पर्यटन केल्यानंतर विद्यार्थी दिवेआगर समुद्रकिनारी गेले. सायंकाळी समुद्रात उतरलेल्या काही विद्यार्थ्यांना समुद्राच्या प्रवाहाचा अंदाज आला नाही. त्यातून ८ विद्यार्थी पाण्यात ओढले गेले. बुडून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावे राजवीर वहिले, सोहम भांडवलकर, कौस्तुभ दौंड, यश वानखेडे, कैवल्य वासनकर, तन्मय वहिले, सुमित अहिरे, प्रणव बनसोडे अशी असून, सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथील समुद्रात बुडून आळंदी येथील आठ विद्यार्थ्यांचा गुरुवारी मृत्यू झाला. हे विद्यार्थी सहलीसाठी आले होते. समुद्रात उतरल्यानंतर त्यांना पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज आला नाही. त्यामुळे ते समुद्राच्या लाटांसोबत वाहून गेले.
