पुणे : आळंदीतील आठ विद्यार्थ्यांचा दिवेआगरच्या समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. सहलीचा आनंद लुटण्यासाठी हसत-खेळत घराबाहेर पडलेल्या मुलांच्या दुर्दैवी मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. रायगड श्रीवर्धन जिल्ह्यातील तालुक्यातील दिवेआगर (Raigad Diveagar beach death) समुद्रकिनारी काल (गुरुवारी, ता १) सायंकाळी घडलेल्या दुर्घटनेत विनर्स अकॅडमीच्या अकरावी-बारावी विज्ञान शाखेतील आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. (Raigad Diveagar beach death) या आठ विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुमित भरत अहिरे या विद्यार्थ्याच्या मामाने एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, सुमितने कधी कुठल्याही गोष्टीचा हट्ट केला नाही, पण त्यानं पहिल्यांदाच तो दिवेआगारच्या ट्रिपला जाण्याचा हट्ट केल्याची माहिती सुमितचे मामा मुकेश माळी यांनी सांगितलं आहे. 

Continues below advertisement

सुमितचे मामा मुकेश माळी म्हणाले, इंजिनिअर होण्याचं स्वप्न उराशी बाळगून सुमित अहिरेने विनर्स ऍकॅडमीमध्ये प्रवेश घेतला. अकरावीचं शिक्षण घेत तो JEE ची तयारी करत होता. स्वतःचं स्वप्न पूर्ण करताना सुमित आई-वडिलांची नित्यनेमाने काळजी घ्यायचा. एकुलता एक असलेल्या सुमितचा नुकताच वाढदिवस ही झाला. कधीचं कोणत्या गोष्टीसाठी हट्ट न करणाऱ्या सुमितने पहिल्यांदाच हट्ट केला, तो दिवेआगारच्या ट्रिपला जाण्याचा. पण काळाने घाला घातला अन आमच्या सुमितला हिरावून घेतलं.

Raigad Diveagar Beach Death: सहलीचे निकष पाळले होते का? दिवेआगारच्या दुर्घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित?

दिवेआगारच्या सहलीला विध्यार्थ्यांना घेऊन गेलेल्या आळंदीतील विनर्स ऍकॅडमीने सर्व निकष पाळले होते का? असा प्रश्न आठ विध्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर उपस्थित झाला आहे. त्यासोबतच विनर्स ऍकॅडमी सुरु करताना सर्व परवानग्या घेतल्या होत्या का? याची ही चौकशी केली जातीये. 

Continues below advertisement

- समुद्रात जाण्यास परवानगी होती का?- जीवरक्षक जॅकेट (Life Jacket) दिले होते का?- विद्यार्थ्यांवर प्रत्यक्ष देखरेख किती होती?- पाण्याजवळ विद्यार्थ्यांना नेताना अतिरिक्त खबरदारी - भरती-ओहोटी, समुद्राची स्थिती, सुरक्षित क्षेत्र, स्थानिक इशारे आणि रेस्कू (rescue) व्यवस्था तपासली होती का?- आपत्कालीन व्यवस्था काय होती?

Raigad Diveagar beach Tragedy: नेमकं काय घडलं?

विनर्स अकॅडमीतील ४८ जणांचा ग्रुप रायगड किल्ला आणि दिवेआगरच्या सहलीसाठी काल (गुरुवारी, ता २) पहाटे आळंदीहून रवाना झाला होता. या गटात २५ मुले, १७ मुली व सहा शिक्षकांचा समावेश होता. दिवसभर पर्यटन केल्यानंतर विद्यार्थी दिवेआगर समुद्रकिनारी गेले. सायंकाळी समुद्रात उतरलेल्या काही विद्यार्थ्यांना समुद्राच्या प्रवाहाचा अंदाज आला नाही. त्यातून ८ विद्यार्थी पाण्यात ओढले गेले. बुडून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावे राजवीर वहिले, सोहम भांडवलकर, कौस्तुभ दौंड, यश वानखेडे, कैवल्य वासनकर, तन्मय वहिले, सुमित अहिरे, प्रणव बनसोडे अशी असून, सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथील समुद्रात बुडून आळंदी येथील आठ विद्यार्थ्यांचा गुरुवारी मृत्यू झाला. हे विद्यार्थी सहलीसाठी आले होते. समुद्रात उतरल्यानंतर त्यांना पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज आला नाही. त्यामुळे ते समुद्राच्या लाटांसोबत वाहून गेले.