Rahul Gandhi Chhatro Ki Gunj Pune News : महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद असल्याचे मत काँग्रेस खासदार राहुल गांधी (MP Rahul Gandhi) यांनी व्यक्त केले. महिला कधीच स्वतंत्र राहू नये हा मनुस्मृतीचा (Manusmriti) डाव असल्याचे राहुल गांधी म्हणाले. तुम्ही स्वत:शिवाय कोणालाच बांधिल नाही आहात. महिलांवर कोणत्याही पुरुषाचा अधिकार नाही. महिलांनी विविध क्षेत्रात उल्लेखनिय यश मिळवलं आहे, तरीदेखील त्यांना विशिष्ट चौकीटत बसवलं जातं असल्याची खंत राहुल गांधी यानी व्यक्त केली. राहुल गांधी पुण्यात (Pune) आयोजीत करण्यात आलेल्या छात्रो की गुंज (Chhatron Ki Goonj) या कार्यक्रमात बोलत होते. पुणे म्हणजे प्रेम असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले. 

Continues below advertisement

Rahul Gandhi : शिक्षणातही मुलींसोबत भेदभाव केला जातो

पिंजरा तोडा हीच या कार्यक्रमाची संकल्पना आहे. मी इथे राजकारणावर बोलायला आलो नाही असेही राहुल गांधी म्हणाले. शिक्षणातही मुलींसोबत भेदभाव केला जात असल्याचे गांधी म्हणाले. तरुणांची लोकसंख्या ही भारताची सर्वात मोठी ताकद आहे. दरम्यान, यावेळी काही विद्यार्थीनींनी समोर येत आपले अनुभव देखील राहुल गांधी यांच्यासोबत शेअर केले. शिक्षण घेत असताना किंवा नोकरी करत असताना कोण कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो, याबाबतची माहिती विद्यार्थीनींनी यावेळी दिली. मुलींवर मोठ्या प्रमाणात बंधने आणली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. सार्वजनिक ठिकाणी प्रवास करताना देखील महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो असेही विद्यार्थीनींनी सांगितले.

आज भारताची ताकद काय आहे? प्रत्येकजण ते आपापल्या परीने स्पष्ट करतो. पण 70 कोटी लोकांची स्वप्ने आणि विचार हीच भारताची ताकद असल्याचे राहुल गांधी यावेळी म्हणाले. या देशातील मुली स्वतंत्र असणे महत्त्वाचे आहे असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले. 

Continues below advertisement

देशात 100 पैकी सहा महिलांवर अत्याचार होतात

देशात 100 पैकी सहा महिलांवर अत्याचार होत आहेत. तसेच दरवर्षी साडेचार लाख स्त्रीभूण हत्या होत असल्याचे राहुल गांधी यावेळी म्हणाले. आर्थिक हिंसाचारालाही अनेक महिलांना तोंड द्यावे लागते असे राहुल गांधी यावेळी म्हणाले. 

पुरुषांपेक्षा महिलांना 25 टक्के पगार कमी मिळतो

84 टक्के महिलांना काम करण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. देशात पुरुषांपेक्षा महिलांना 25 टक्के पगार कमी मिळतो. महिलांना सन्मान मिळत नसल्याचे राहुल गांधी म्हणाले. मोठ्या प्रमाणात हिंसेच्या घटना घडत आहेत. अत्याचाराच्या घटना घडत आहे.