Purandar Airport Land Acquisition: प्रस्तावित पुरंदर विमानतळाच्या (Purandar Airport) जमीन अधिग्रहणासाठी सरकारने दर जाहीर केले आहेत. या प्रकल्पासाठी एकरामागे 1 कोटी 61 लाख 1 हजार 925 रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केली. तसेच या प्रकल्पात ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्यांच्या कुटुंबातील एकाला नोकरी देण्यात येणार आहे. तर शेतकऱ्याकडून घेण्यात आलेल्या जमिनीपैकी 10 टक्के जमीन विकसित भूखंड शेतकऱ्याला परत केला जाणार असल्याची घोषणाही करण्यात आली आहे. (Purandar Airport Land Acquisition)
पुरंदर विमानतळाच्या या प्रकल्पासाठी पुरंदरमधील 7 गावांमध्ये मिळून 1 हजार 216 हेक्टर जमीन तर इतर 242 एकर जमीन अधिग्रहित करण्यात येणार आहे. या गावांमधील शेतकऱ्यांना व्याजासहित एक एकरला 1 कोटी 51 लाख 1 हजार 925 रुपये एवढा दर देण्यात येणार आहे. 10 जूनपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील. ज्याची सहमती असेल त्यांना पैसे दिले जातील, जे सहमती देणार नाहीत त्याची सक्तीने भूसंपादन करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. परंतु जमीन अधिग्रहणास स्थानिकांचा विरोध कायम आहे यावर आता स्थानिक काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. (Purandar Airport Land Acquisition)
कोणत्या गावातील क्षेत्र किती अधिग्रहित करणार? (Purandar Airport Land Acquisition)
- उदाचीवाडी – 58.34 हे.आर
- वनपुरी – 154.06 हे.आर
- कुंभारवळण – 245.48 हे.आर
- खानवडी – 269.22 हे.आर
- मंुजवडी – 82.56 हे.आर
- एकहतपूर – 199.03 हे.आर
- पारगाव – 188.07 हे.आर
मोबदला दर? (Purandar Airport Land Acquisition)
24/04/2026 रोजी प्रधान सचिव (उद्योग) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मोबदल्याचे दर निश्चित
- प्रति हेक्टर मूळ दर: ₹94,94,060
- गुणांकानंतर दर: ₹1,89,88,120
- 100% दिलासा: ₹1,89,88,120
- एकूण मोबदला (प्रति हेक्टर): ₹3,79,76,240
- प्रति एकर मोबदला: ₹1,51,90,496
- 12% अतिरिक्त रक्कम: ₹9,11,429
- एकूण प्रति एकर ₹1,61,01,925 प्रति
- इतर मोबदला
जमिनीव्यतिरिक्त खालील घटकांसाठी स्वतंत्र मोबदला देण्यात येणार आहे:
फळझाडे- (Purandar Airport Land Acquisition)
- आंबा: ₹50,000 – ₹60,000
- सिताफळ: ₹11,000 – ₹13,000
- अंजीर: ₹10,000 – ₹13,000
- नारळ: ₹4,000 – ₹6,000
- चिंच: ₹40,000 – ₹50,000
- चिकू: ₹13,000 – ₹17,000
वनझाडे- (Purandar Airport Land Acquisition)
- बाभूळ: ₹4,899
- कडूलिंब: ₹6,392
- बोर: ₹2,044
- निलगिरी: ₹11,783
- पिंपळ / वड / करंज: ₹21,979
- उंबर: ₹11,783
इतर- (Purandar Airport Land Acquisition)
- विहीर: ₹3 ते ₹17 लाख
- बोअरवेल: ₹40,000 – ₹60,000
- पक्के घर: ₹3 लाख ते ₹40 लाख क्षेत्रफळानुसार ( 5700 प्रति चौरस मीटर)
- वरील सर्व घटकांच्या मूल्यावर 100% दिलासा देऊन दुप्पट मोबदला दिला जाणार आहे.
विशेष मोबदला- (Purandar Airport Land Acquisition)
- 10% विकसित भूखंड परतावा (अटीनुसार)
- जमीनधारकांना 750 दिवसांची मजुरी
- अल्पभूधारकांना 500 दिवसांची मजुरी
- घर स्थलांतर: ₹40,000
- गोठा स्थलांतर: ₹20,000
- मोबदला RTGS द्वारे थेट खात्यात जमा होणार
- मोबदला करमुक्त राहील
- 7/12 वरील खातेदारांनी 7 दिवसांत हरकती सादर कराव्यात
- आवश्यक कागदपत्रे: आधार, पॅन, बँक खाते, फोटो इ
- संमती करार न केल्यास सक्तीने भूसंपादन करण्यात येईल व काही लाभ मिळणार नाहीत.
