एक्स्प्लोर

सिंहगडावरील तानाजी कड्यावरुन युवक दरीत कोसळला; हैदराबादहून मित्रांसमवेत पुण्यात आलेला ग्रुप

गुरुवारी दुपारी 4.30 वाजता ते सिंहगडावर आले असता, या वेळेस सायंकाळच्या सुमारास तानाजी कड्याजवळ येऊन ते पर्यटनाचा आनंद घेत होते.

पुणे : सध्या पावसाळी (Rain) पर्यटनासाठी मित्र कंपनी, कुटुंबीय आणि वेगवेगळे ग्रुप्स निसर्सरम्य ठिकाणी जात आहेत. पुणे जिल्हा हाही पर्यटनासाठी प्रसिद्ध असून सिंहगड किल्ला आणि परिसरात दरवर्षी देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येतात. त्यातच, पुण्यातील सिंहगड किल्ल्याच्या तानाजी कड्यावरून खोल दरीत कोसळून एक पर्यटक बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सिंहगड (Pune) किल्ल्याच्या तानाजी कडा येथे हवा पॉइंटजवळील खोल दरीत पाय घसरून पडल्याने पर्यटक बेपत्ता झाला असून घटनास्थळी प्रशासन व पोलीस (Police) कर्मचारी पोहोचले आहेत. गौतम गायकवाड (वय 24) असे बेपत्ता तरुणाचे नाव असून त्याच्यासाठी शोधमोहिम राबवली जात आहे. गौतम हा हैदराबादवरुन मित्रांसमवेत पर्यटनास आला होता.   

हैदराबाद येथून गौतमसह 5 जणांचा ग्रुप पुणे येथे फिरण्यासाठी आला होता.  काल बुधवारी दुपारी 4.30 वाजता ते सिंहगडावर आले असता, या वेळेस सायंकाळच्या सुमारास तानाजी कड्याजवळ येऊन ते पर्यटनाचा आनंद घेत होते. त्यावेळी, गौतमने लघवीला जाऊन येतो असे मित्रांना सांगितले. मात्र, बऱ्याच वेळानंतरही तो परत आला नाही. त्यामुळे मित्रांनी गौतमचा शोध घेतला असता तो कुठेही आढळून आला नाही. जवळच हवा पॉइंटशेजारी त्याची चप्पल सापडली, मात्र तो दिसला नाही. सिंहगड भागात मुसळधार पाऊस असून, वाऱ्याचा वेगही जास्त आहे. वाऱ्याचा व जमिनीचा अंदाज न आल्याने गौतम खोल दरीत कोसळला असावा असा अंदाज त्याच्या मित्रांकडून लावला गेल्याने गौतमचा शोध घेतला जात आहे. 

घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन आणि  ग्रामीण पोलीस कर्मचारी, व स्थानिक गिर्यारोहक कार्यकर्ते या तरुणाचा रात्री उशिरापर्यंत शोध घेत होते. जवळपास एक हजार फुटापर्यंत खोल दरीत उतरून आपत्ती व्यवस्थापन पथकाने शोध घेण्याचा प्रयत्न केला. खोल दरीत जाऊन मुसळधार पाऊस, वाऱ्यात बेपत्ता गौतमचा शोध घेतला. मात्र रात्रीच्या अंधारात तो आढळून न आल्याने रात्री 11 वाजता शोधकार्य थांबवले. त्यानंतर, आज सकाळी 6 वाजता पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले आहे. 

हेही वाचा

मोठी बातमी : बीडमध्ये सरकारी वकिलाने कोर्टातच जीवन संपवलं, आता कुटुंबाच्या मागणीने मोठा ट्विस्ट

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: भाजपचे नेते म्हणाले होते, मुख्यमंत्री माझं ऐकतात, ही पण एक दंतकथाचं; पुण्यातील दुर्ग प्रतिकृतीच्या उद्घाटन सोहळ्यात राज ठाकरेंचं मिश्किल भाष्य
भाजपचे नेते म्हणाले होते, मुख्यमंत्री माझं ऐकतात, ही पण एक दंतकथाचं; पुण्यातील दुर्ग प्रतिकृतीच्या उद्घाटन सोहळ्यात राज ठाकरेंचं मिश्किल भाष्य
Pune Crime News: सणाच्या तोंडावर पुण्यात पुन्हा 'कोयता गँग'ची दहशत; कोथरूडमध्ये तरुणाला संपवलं, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, पुण्यात नेमकं काय घडलं?
सणाच्या तोंडावर पुण्यात पुन्हा 'कोयता गँग'ची दहशत; कोथरूडमध्ये तरुणाला संपवलं, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, पुण्यात नेमकं काय घडलं?
पायल झांबरे मृत्यू प्रकरण! घरातून 35 तोळे सोने, चांदीचे दागिने, मोबाईलसह सीसीटीव्ही फुटेज जप्त, पतीसह सासू सासऱ्यांच्या पोलीस कोठडीत वाढ
पायल झांबरे मृत्यू प्रकरण! घरातून 35 तोळे सोने, चांदीचे दागिने, मोबाईलसह सीसीटीव्ही फुटेज जप्त, पतीसह सासू सासऱ्यांच्या पोलीस कोठडीत वाढ
Rajendra Pawar Ajit Pawar: 'अजित गेल्यानंतर आज पहिल्यांदाच दिवाळी सुनी-सुनी', राजेंद्र पवारांनी अजितदादांसोबत घालवलेल्या लहानपणीच्या दिवाळीची अन् फटाक्यांची आठवण केली शेअर, म्हणाले, 'आठवण काढणे एवढेच मागे...'
'अजित गेल्यानंतर आज पहिल्यांदाच दिवाळी सुनी-सुनी', राजेंद्र पवारांनी अजितदादांसोबत घालवलेल्या लहानपणीच्या दिवाळीची अन् फटाक्यांची आठवण केली शेअर, म्हणाले, 'आठवण काढणे एवढेच मागे...'

व्हिडीओ

Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा
Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Modi Zelenskyy Phone Call : रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
मोठी बातमी : अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil on Gokul: सतेज पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, महायुती सरकारने गुपित ठेवलेल्या चार संचालकांची नावंच सांगून टाकली, हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांबाबतही सनसनाटी दावा
सतेज पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, महायुती सरकारने गुपित ठेवलेल्या चार संचालकांची नावंच सांगून टाकली, हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांबाबतही सनसनाटी दावा
Gokul President Election 2026 Court Hearing: गोकुळची निवडणूक उद्याच, शासन नियुक्त संचालक मतदान करणार, पण मतं बाजूला ठेवणार; अध्यादेश चूक की बरोबर हे न्यायालयाचं अद्याप ठरलं नाही
गोकुळची निवडणूक उद्याच, शासन नियुक्त संचालक मतदान करणार, पण मतं बाजूला ठेवणार; अध्यादेश चूक की बरोबर हे न्यायालयाचं अद्याप ठरलं नाही
Raju Shetti: तर जावयाला सुद्धा कोल्हापूरमध्ये पाऊल ठेवून देणार नाही; राजू शेट्टींचा थेट अमित शाहांना इशारा, अध्यादेशावरून सीएम देवेंद्र फडणवीसांवरही सडकून प्रहार
तर जावयाला सुद्धा कोल्हापूरमध्ये पाऊल ठेवून देणार नाही; राजू शेट्टींचा थेट अमित शाहांना इशारा, अध्यादेशावरून सीएम देवेंद्र फडणवीसांवरही सडकून प्रहार
Vivekanand Patil Kolhapur Gokul Morcha speech: मंत्रालयात कंस मामा बोटं मोडितो! गोकुळच्या मोर्चातील विवेकानंद पाटलांचं जळजळीत भाषण, महायुती सरकारला झोडपलं
मंत्रालयात कंस मामा बोटं मोडितो! गोकुळच्या मोर्चातील विवेकानंद पाटलांचं जळजळीत भाषण, महायुती सरकारला झोडपलं
दिवाळीच्या फटाक्यांना ब्रेक! मुंबई आणि ठाण्यात रॉकेट फटाक्यांवर बंदी, राज्य सरकारचा मोठा निर्णय, नियम मोडल्यास कारवाई
दिवाळीच्या फटाक्यांना ब्रेक! मुंबई आणि ठाण्यात रॉकेट फटाक्यांवर बंदी, राज्य सरकारचा मोठा निर्णय, नियम मोडल्यास कारवाई
Embed widget