एक्स्प्लोर

Pune Yerawada Jail: येरवडा जेलमध्ये कैद्याची संशयास्पद हालचाल पोलिसांनी टिपली, झडती घेताच अधिकाऱ्यांना सापडले 5 मोबाईल, 2 पॉवर बँक, चार्जिंग वायर

Pune Yerawada Jail: कारागृह अधिकार्‍यांना बराकीमध्ये झाडाझडती घेतल्यानंतर ५ मोबाईल फोन, २ पॉवर बँक आणि चार्जिंग वायर आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

पुणे : पुण्यातील येरवडा (Pune Yerawada Jail) जेलच्या सीमा भिंतीलगत मोबाईल फोन सापडल्याने कारागृह पोलिसांनी १, २ व ६ बराकींमध्ये घेतलेल्या झाडाझडती मोहिमेमध्ये अधिकार्‍यांना अनेक धक्कादायक गोष्टी सापडल्या आहेत. कारागृह अधिकार्‍यांना बराकीमध्ये झाडाझडती घेतल्यानंतर ५ मोबाईल फोन, २ पॉवर बँक आणि चार्जिंग वायर आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत सहायक तुरुंगाधिकारी सुनिल तुकाराम गायकवाड (वय ५५) यांनी येरवडा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी कैदी नौशाद बदुद्रीन शेख व इतर कैद्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार येरवडा कारागृहात शनिवारी समोर आला आहे. (Pune Yerawada Jail)

नेमकी घटना कशी आली समोर?

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सहायक तुरुंगाधिकारी नियमित कर्तव्यावर (Pune Yerawada Jail) असताना सर्कल परिसरात गस्त (Pune Yerawada Jail) घालत होते. यावेळी बाह्य शौचालयाच्या मागील भागात एका बंदीकडून संशयास्पद हालचाल होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ त्या ठिकाणी धाव घेतली असता, नौशाद बदुद्रीन शेख याने जमिनीवर पडलेला मोबाईल त्यांच्या ताब्यात दिला. याबाबत विचारणा केली असता शेखने समाधानकारक उत्तर न देता टाळाटाळ केली आणि तेथून निघून गेला. त्यानंतर फिर्यादी अधिकाऱ्यांनी (Pune Yerawada Jail) संपूर्ण प्रकाराची माहिती वरिष्ठांना दिली. कारागृह उपमहानिरीक्षकांची परवानगी घेऊन २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ ते साडेसहा दरम्यान विशेष झडती मोहिम राबविण्यात आली.(Pune Yerawada Jail)

बराकबाहेरील बॅगेची तपासणी करण्यात आली, त्यात...

विशेष झडतीदरम्यान बराक क्रमांक १ मधील शिक्षा बंदी नौशाद शेख याच्या बराकबाहेरील (Pune Yerawada Jail) बॅगेची तपासणी करण्यात आली. त्यातून ‘हिरो’ कंपनीचा बॅटरी व सीमकार्ड नसलेला मोबाईल आणि चार्जिंग वायर जप्त करण्यात आली. त्यानंतर बराक क्रमांक १, २ आणि ६ च्या बाह्य परिसराचीही सखोल तपासणी करण्यात आली. या झडतीत बराक १ बाहेर ‘नोकीया’ कंपनीचे बॅटरी व सीमकार्ड (Pune Yerawada Jail) नसलेले तीन मोबाईल सापडले. तसेच बराक ६ बाहेरील भागात एक मोबाईल फोन, दोन पॉवर बँक आणि चार्जिंग वायर आढळून आल्या. कारागृहात प्रतिबंधित असलेले मोबाईल व इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य बाळगल्याप्रकरणी नौशाद शेख आणि अन्य कैद्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुंदन सत्रे करीत आहेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

2019 च्या मिस इंडिया स्पर्धेतील सुंदरीचं शुद्धीकरण, पुण्यातील सायलीची हिंदू धर्मात वापसी; खासदार-आमदारांची उपस्थिती
2019 च्या मिस इंडिया स्पर्धेतील सुंदरीचं शुद्धीकरण, पुण्यातील सायलीची हिंदू धर्मात वापसी; खासदार-आमदारांची उपस्थिती
Pune News : अजितदादांना आज खूप मिस करतोय, शहरातल्या पहिल्या उद्घाटन सोहळ्याला ते नाहीयेत; डबल डेकर पुलाला अजित पवारांचे नाव द्यावं, मुरलीधर मोहोळ यांची मागणी
अजितदादांना आज खूप मिस करतोय, शहरातल्या पहिल्या उद्घाटन सोहळ्याला ते नाहीयेत; पुण्यातील डबल डेकर पुलाला अजित पवारांचे नाव द्यावं, मुरलीधर मोहोळ यांची मागणी
Pune Crime News : पुण्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ! नामंकित कॉलेजच्या विभागप्रमुखाने संपवलं जीवन; धक्कादायक कारण समोर
पुण्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ! नामंकित कॉलेजच्या विभागप्रमुखाने संपवलं जीवन; धक्कादायक कारण समोर
Pune Crime: जुन्या वादातून पुण्यात गोळीबाराचा थरार! विदेशी बनावटीच्या पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह दोघांना अटक
जुन्या वादातून पुण्यात गोळीबाराचा थरार! विदेशी बनावटीच्या पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह दोघांना अटक
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?
Eknath Shinde Vidhan Parishad : T 20 World Cup मध्ये टीम इंडियाचा विजय, शिंदेंकडून अभिनंदन प्रस्ताव
Vijay Wadettiwar on Budget : महाराष्ट्र कंगाल झालाय,केवळ रस्ते बांधण्यासाठी बजेट आहे का?
Gold Silver Price Drop Iran Israel War : सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण;इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम
Nashik Crime : Dr. Manisha Jejurkar प्रकरणी पतीचे विवाहबाह्य संबंध होते, माहेरच्यांचे गंभीर आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandara : शाळेच्या भीतीने 12 वर्षीय विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
शाळेच्या भीतीने 12 वर्षीय विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीत आग, मोठ्या स्फोटानंतर धुराचे लोट; कामगार सैरावैरा धावले
अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीत आग, मोठ्या स्फोटानंतर धुराचे लोट; कामगार सैरावैरा धावले
Share Market Crash : युद्धामुळे शेअर बाजारात हाहाकार! Sensex  1, 352 अंकांनी गडगडला, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटी पाण्यात
युद्धामुळे शेअर बाजारात हाहाकार! Sensex  1, 352 अंकांनी गडगडला, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटी पाण्यात
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात हायकोर्टाची सर्व 23 आरोपींना नोटीस; सीबीआय तपास अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय कारवाईलाही स्थगिती, मनी लाँड्रिंग प्रकरणात सुनावणी न करण्याचे आदेश
कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात हायकोर्टाची सर्व 23 आरोपींना नोटीस; सीबीआय तपास अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय कारवाईलाही स्थगिती, मनी लाँड्रिंग प्रकरणात सुनावणी न करण्याचे आदेश
इस्रायलच्या तेल साठ्यांवरील हल्ल्यानंतर इराणमध्ये तेलमिश्रीत काळाकुट्ट पाऊस, सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात; लेबनॉनमध्ये महिला लेकरा बाळांनी रस्त्यावर रात्र काढली
इस्रायलच्या तेल साठ्यांवरील हल्ल्यानंतर इराणमध्ये तेलमिश्रीत काळाकुट्ट पाऊस, सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात; लेबनॉनमध्ये महिला लेकरा बाळांनी रस्त्यावर रात्र काढली
Embed widget