पुणे: एका पुणेरी काकूंनी वाहतूक नियम मोडणाऱ्या कार चालकाला जन्माचा धडा शिकवला. हा प्रसंग मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आणि सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. सध्या सर्वत्र या व्हिडिओची आणि काकूंची चर्चा होताना दिसत आहे. डेक्कन परिसरातील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाजवळ यशवंतराव चव्हाण पूल आहे, जो फक्त दुचाकींसाठी आहे. मात्र, एका कारचालकाने या पुलावरून कार नेण्याचा प्रयत्न केला. अर्ध्या रस्त्यात असतानाच समोरून येणाऱ्या काकूंनी त्याला अडवले आणि "हा रस्ता फक्त दुचाकींसाठी आहे, कार मागे घ्या" असा दम भरला, अशा प्रकारचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला, मात्र या व्हिडिओमागचं सत्य वेगळंच असल्याचं समोर आलं आहे.

"फक्त दुचाकीसाठी असलेल्या पुलावर चारचाकी घेउन जाणाऱ्या कारचालकाला पुणेरी काकुंनी शिकवला धडा" अशा पद्धतीची बातमी अनेक ठिकाणी प्रसिद्ध झाली. मात्र, प्रत्यक्षात घडलेला प्रसंग वेगळाच आहे. नारायण सहस्रबुद्धे आणि अमिता सहस्रबुद्धे हे जेष्ठ दांपत्य मुंबईहुन पुण्याला नातेवाईकांना भेटण्यासाठी आले होते. मात्र, डेक्कन भागातून पुना हॉस्पीटलकडे जाणारा पुल फक्त दुचाकीसाठी आहे हे या नवरा - बायकोंना माहित नव्हते. पुलावर गाडी नेल्यावर त्यांना ते चुकुन नो एन्ट्रीमध्ये शिरल्याचं लक्षात आलं. मात्र, सहस्रबुद्धे काकांना पुल अरुंद असल्याने गाडी मागे घेणं जमत नव्हतं. त्यामुळे अमिता सज्ञस्रबुद्धे खाली उतरल्या आणि नवऱ्याला गाडी मागे घेण्यासाठी मदत करु लागल्या. तेवढ्यात कोणीतरी या प्रसंगाचा व्हिडीओ काढला आणि पुणेरी काकुंनी ड्रायव्हरला धडा शिकवला या पोस्टसह व्हिडीओ व्हायरल केला. मात्र यामुळे सहस्रबुद्धे दांपत्याला मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागलं. नो एट्रीत चुकुन गेलो होतो आणि त्याचा दंड देखील आम्ही भरलाय असं त्यांचं म्हणणं आहे.

नेमकं काय घडलं?

डेक्कन परिसरातील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाजवळ यशवंतराव चव्हाण पूल आहे, जो फक्त दुचाकींसाठी आहे. मात्र, एका कारचालकाने या पुलावरून कार नेल्याचा प्रयत्न केला. मात्र, पुलावर गाडी नेल्यावर त्यांना ते चुकुन नो एन्ट्रीमध्ये शिरल्याचं लक्षात आलं. मात्र, सहस्रबुद्धे काकांना पुल अरुंद असल्याने गाडी मागे घेणं जमत नव्हतं. त्यामुळे अमिता सज्ञस्रबुद्धे खाली उतरल्या आणि नवऱ्याला गाडी मागे घेण्यासाठी मदत करु लागल्या. तेवढ्यात कोणीतरी या प्रसंगाचा व्हिडीओ काढला आणि पुणेरी काकुंनी ड्रायव्हरला धडा शिकवला या पोस्टसह व्हिडीओ व्हायरल केला. मात्र यामुळे सहस्रबुद्धे दांपत्याला मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागलं. नो एट्रीत चुकुन गेलो होतो आणि त्याचा दंड देखील आम्ही भरलाय असं त्यांचं म्हणणं आहे.

व्हायरल व्हिडिओ आणि नेटकऱ्यांचा प्रतिसाद

हा संपूर्ण प्रसंग एका दुचाकीस्वाराने आपल्या कॅमेऱ्यात टिपून सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून, नेटकऱ्यांनी "जर वाहनचालकांना शिस्त पाळायची नसेल आणि पोलीस दुर्लक्ष करत असतील, तर आता नागरिकांनीच नियम मोडणाऱ्यांना धडा शिकवला पाहिजे" अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. डेक्कन परिसरातील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाजवळ यशवंतराव चव्हाण पूल आहे, यशवंतराव चव्हाण पूल असं या पुलाचं नाव असून हा पूल अत्यंत छोटा असून फक्त दुचाकींसाठी या पुलावरून जाण्यासाठी परवानगी आहे.