पुणे : पुणे विद्यापीठ परिसरात मोठी वाहतूक कोंडी (Pune Traffic) होत असते. हिच वाहतूक कोंडी (Traffic Diversion In Pune) फोडण्यासाठी विद्यापीठ परिसरात वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारातून विद्यापीठात जाण्यासाठी सेनापती बापट रस्ता आणि गणेशखिंड रस्त्याने येणाऱ्या वाहनांसाठी दिलेला उजवे वळण (राइट टर्न) आणि यू टर्न बंद करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग म्हणून चतु:शृंगी पोलिस ठाण्यासमोरील मिलेनियम गेटमधून उजवीकडे वळून विद्यापीठात इच्छित स्थळी जाता येईल.
विद्यापीठ परिसर, गणेशखिंड रोड, औंध-बाणेर, सेनापती बापट रोड या ठिकाणी मेट्रो आणि उड्डाणपुलाच्या कामामुळे सकाळ-संध्याकाळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. हा पेच सोडवण्यासाठी आतापर्यंत अनेक योजना आखण्यात आल्या आहेत. त्यानंतरही कोंडीतून सुटका झाली नाही. त्यामुळे आता वाहतूक पोलिसांनी आणखी एक पर्याय समोर आणला आहे.
असे असतील वाहतुकीतील बदल?
· सेनापती बापट रस्त्यावरील आचार्य आनंदऋषीजी चौक आणि गणेशखिंड रस्त्यावरून उजवीकडे वळून विद्यापीठात प्रवेश दिला जाणार नाही.
· या रस्त्यावरून येणाऱ्यांनी आचार्य आनंदऋषीजी चौकातून थेट चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात जावे.
· तेथून उजवीकडे वळून मिलेनियम गेटमार्गे विद्यापीठात प्रवेश करा.
· औंधकडून येणाऱ्या वाहनचालकांना मुख्य प्रवेशद्वारातून विद्यापीठात प्रवेश दिला जाणार नाही. त्यांना मिलेनियम गेटमधूनही जावे लागणार आहे.
· बाणेर रोडवरून येणाऱ्या वाहनचालकांना आचार्य आनंदऋषीजी चौकात डावीकडे वळून औंध घ्यावे लागणार आहे .
शिवजयंतीला पुण्यात वाहतुक बदल
शिवजयंतीला पुण्यातील मध्यभागी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. शोभायात्रेमुळे प्रामुख्याने बाजीराव रस्ता, कुमठेकर, केळकर व इतर रस्त्यावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शोभायात्रा संपेपर्यंत नेहरू रस्ता, लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता बंद राहणार आहे. मात्र वाहन चालकांसाठी पर्यायी मार्गायी मार्गाची सोय करुन देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी केले आहे.जिजामाता चौक येथुन शिवाजी रस्ता वरुन स्वारगेटला जाणारे वाहन चालकांनी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्याने खंडोजीबाबा चौक टिळक चौक ते टिळक रस्त्याने इच्छित स्थळी जावे. गणेश रस्ता - दारुवाला पुलाकडुन फडके हौद चौक, जिजामाता चौकाकडे येणारी वाहतुक - दारुवाला पुल चौकातुन वाहचालकांना इच्छितस्थळी जाता येईल. केळकर रस्त्याने अप्पा बळवंत चौकातून जोगेश्वरी मंदीर चौक मार्गे बुधवार चौकाकडे येणारी वाहतुक आवश्यकते नुसार वळविण्यात येणार आहे