Pune Temperature Forecast : जानेवारी महिनाअखेर सुरू झाला, म्हणजे आता थंडी संपली, असा विचार पुणेकर (Pune News) करत असताना, मंगळवारी पुण्यातील पारा (Pune Temperature) घसरला. शिवाजीनगरमध्ये (Shivaji nagar pune) 9.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर हवेलीमध्ये 8.7 वर तापमान घसरलेय. त्यामुळे कपाटात ठेवलेले स्वेटर लोकांनी पुन्हा एकदा बाहेर काढले. पुढील दोन दिवस थंडीचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.

पुणे जिल्ह्यात कडाक्याची थंडीमध्ये वाढ झाली आहे. गेल्या दोन दिवसांत पुणे शहराच्या तापमान सातत्याने घट होत आहे. पुण्यातील अनेक ठिकाणावरील तापमान  10 ते 14 अंश सेल्सिअस दरम्यान आले आहे. वाढत्या थंडीमुळे ग्रामीण भागासह शहरी भागातही शेकोट्या पेटविल्या जात आहे. थंडीसोबत धुक्याचे प्रमाणही वाढलेय. हडपसर, खेड,चिंचवड, आबेगाव,  बालेवाडी, इंदापूर, पाषाण, माळीण, एनडीएसह अनेक ठिकणाचा पारा प्रचंड घसरलाय. हुडहुडी लागल्यामुळे पुणेकरांनी कपटात ठेवलेले स्वेटर बाहेर काढले आहेत. ग्रामीण भागासह शहरी भागात शेकोट्या पेटवल्या जात आहेत. 

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे पुण्यातील किमान आणि कमाल तापमानात वाढ झाली होती. शहराचे किमान तापमान 18 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यामुळे थंडी गायब झाली होती. मात्र मागील आठव्यापासून तापमानात हळूहळू घट झाली. सध्याच्या घडीला पुण्यातील तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली आलेय. एनडीए, पाषाण आणि हवेली भागातील तापमान 9 च्या आसपास आहे. 

पुणे जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी किती तापमान ?

वडगावशेरी 17.5मगरपट्टा 16.8लव्हाळे  16.6खेड 15.5चिंचवड 15.5आंबेगाव 14.9गिरीवन 13.4दापोडी 13.3बालेवाडी 12.9नारायणगाव 12.9हडपसर 12.8शिरुर 12.8डुडुळगाव 12.4भोर 12.4लोणावळा 12.3तळेगाव 11.9ढमढेरे 11.1पुरंदर 11.0दौंड 10.9लवासा 10.8इंदापूर 10.5पाषाण 10.1निमगिरी 9.9बारामती 9.8राजगुरुनगर 9.7शिवाजी नगर 9.7हवेली 8.7एनडीए 8.2माळीण 8.2

उत्तर भारतात थंडीची लाट

पर्वतीय भागात पारा सतत घसरत असल्याने संपूर्ण उत्तर भारतात तसेच देशाच्या मध्य आणि पूर्व भागात थंडीची लाट कायम आहे. बिहारमध्ये कडाक्याच्या थंडीची लाट आली आहे. हिवाळ्याची स्थिती कायम असून काही भागात सूर्यकिरणं अधूनमधून बाहेर पडताना पाहायला मिळत असून काही भागात सूर्यदर्शन होणं कठीण आहे. त्यामुळे राज्याच्या बहुतांश भागात नागरिक त्रस्त झाले आहेत. हरियाणा आणि उत्तर प्रदेशातही कडाक्याची थंडी जाणवत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, बुधवारी सकाळी दिल्ली आणि आसपासच्या परिसरात हलका पाऊस झाला. दिल्लीत बुधवारी दाट धुक्यापासून दिलासा मिळण्याची आशा आहे.

आणखी वाचा :

Weather Update : महाराष्ट्रात पावसाची शक्यता, उत्तर भारतात तापमानात आणखी घट होणार