Maharashtra Vidhan Parishad: पुणे शिक्षक विधानसभा मतदारसंघ भाजपला सुटला; उमेदवार सुद्धा जाहीर
Maharashtra Vidhan Parishad: पुणे शिक्षक मतदार संघातील महायुती मधील जागा वाटपाचा तिढा अखेर सुटला आहे.

पुणे : पुणे शिक्षक मतदार संघातील महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. पुणे शिक्षक मतदार संघाची जागा भाजपच्या वाट्याला गेली आहे. भाजपकडून कौस्तुभ गावडे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. श्री विवेकानंद स्वामी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कौस्तुभ गावडे यांनी पुणे शिक्षक मतदार संघामध्ये काम केले आहे. शिक्षक मतदार संघातील मतदारांना आश्वासन नाही तर जाहीरनामा देणार आहे.जुन्या पेन्शन योजनेबरोबरच अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ते प्रश्न सोडवण्यावर माझा भर असून गेल्या सहा वर्षांमध्ये जे काम झाले नाही ते काम करू असा विश्वास कौस्तुभ गावडे यांनी व्यक्त केला आहे.(Maharashtra Vidhan Parishad)
विधान परिषदेच्या आगामी पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जागावाटपावरून महायुतीत मोठा पेच निर्माण झाला होता. महायुतीत पुणे शिक्षक मतदारसंघावरुन घोडं अडलं होतं. पुणे शिक्षक मतदारसंघावर महायुतीतील तिन्ही पक्षांचा दावा होता. पुणे आणि नागपूर पदवीधर भाजपकडे तर संभाजीनगर राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार असल्याची माहिती आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघ शिवसेना लढवणार आहे. पुणे शिक्षक मतदारसंघावर तिन्ही पक्षांचा दावा असल्याने नेमकं कोण ही जागा लढवणार याबाबतचा प्रश्न उपस्थित झाला होता. विधान परिषदेच्या 5 जागांच्या निवडणुकांसाठी 6 ऑक्टोबर रोजी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे.(Maharashtra Vidhan Parishad)
Maharashtra Vidhan Parishad: पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा, मतदान अन् निकाल कधी?
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या (Maharashtra Vidhan Parishad) 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा झाली आहे. 23 ऑक्टोबर 2026 रोजी मतदान होणार असून 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी (Counting of Votes) होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. 2
Election Schedule: निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक
अधिसूचना जारी (Notification Date): 29 सप्टेंबर 2026
उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख (Nomination Last Date): 6 ऑक्टोबर 2026
अर्जांची छाननी (Scrutiny): 7 ऑक्टोबर 2026
अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख (Withdrawal Last Date): 9 ऑक्टोबर 2026
मतदानाची तारीख व वेळ (Poll Date & Time): 23 ऑक्टोबर 2026 (सकाळी 8 ते दुपारी 4)
मतमोजणी व निकाल (Counting Date): 27 ऑक्टोबर 2026
Graduate and Teachers constituency election maharashtra: कोणत्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांमध्ये निवडणूक होणार?
1. औरंगाबाद पदवीधर: सतीश भानुदास चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस - शरद पवारांची राष्ट्रवादी / मविआ)- माजी आमदार
2. पुणे पदवीधर: अरुण गणपती लाड (राष्ट्रवादी काँग्रेस - शरद पवारांची राष्ट्रवादी / मविआ)- - माजी आमदार
3. नागपूर पदवीधर: अभिजीत गोविंदराव वंजारी (काँग्रेस)- माजी आमदार
4. अमरावती शिक्षक: किरण रामराव सरनाईक (शिवसेना - शिंदे गट)- माजी आमदार
5 पुणे शिक्षक: जयंत दिनकर आसगावकर (काँग्रेस)- माजी आमदार
Before You Go
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं






















