एक्स्प्लोर

मस्तवाल दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये आमदाराच्या पीएच्या पत्नीचा जीव जाताच सरकारला जाग आली; चौकशीसाठी चार सदस्यीय समितीची स्थापना

Dinanath Mangeshkar Hospital : भाजपचे विधान परिषद आमदार अमित गोरखे यांचे पीए सुशांत भिसे यांच्या पत्नीचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.

Dinanath Mangeshkar Hospital : भाजपचे विधान परिषद आमदार अमित गोरखे यांचे पीए सुशांत भिसे यांच्या पत्नीचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या (Dinanath Mangeshkar Hospital) आडमुठेपणामुळे तनिषा भिसे यांना प्राण गमवावे लागल्याचा आरोप होत आहे. तनिषा यांनी सातव्या महिन्यात जुळ्या मुलींना जन्म देऊन जगाचा निरोप घेतला. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात जो प्रकार घडला आहे त्याबाबतीत चौकशी केली जाणार आहे. आरोग्य उपसंचालक राधाकिसन पवार यांनी या प्रकरणात चार सदस्य समिती नियुक्ती करण्यात आली. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांनी दिल्या आरोग्य उपसंचालकांना याबाबत सूचना दिल्या आहेत. तर अल्पसंख्याक आणि वैद्यकीय शिक्षण राज्य मंत्री माधुरी मिसाळ (Madhuri Misal) यांनी आता प्रत्येक रुग्णालयात आरोग्यदूतची नेमणूक केली जाणार असल्याची माहिती दिली आहे. 

प्रत्येक रुग्णालयात आरोग्यदूत नेमणार

माधुरी मिसाळ यांनी नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलंय की, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात जो प्रकार घडला आहे, त्याबाबत चौकशी केली जाणार आहे. आता प्रत्येक रुग्णालयात आरोग्य दूतची नेमणूक केली जाणार आहे. धर्मादाय आयुक्त कार्यालयांतर्गत असणारा आरोग्यदूत रुग्णालयाच्या कामकाजावर लक्ष ठेवणार आहे. धर्मादाय रुग्णालयात सेवा मिळत नाही, त्यामुळे धर्मदाय समिती अंतर्गत रुग्णालयात आरोग्य दूत नेमणार आहे. धर्मदाय आयुक्त कार्यालयांतर्गत समिती असते, ती याबाबत देखरेख ठेवेल, असे त्यांनी म्हटले.  

दीनानाथ हॉस्पिटलच्या चौकशीसाठी चार सदस्यीय समितीची स्थापना

तर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रकरणी आरोग्य उपसंचालक राधाकिसन पवार यांनी चार सदस्य समिती नियुक्ती केली आहे. दीनानाथ हॉस्पिटलची चार सदस्य समिती चौकशी करणार आहे.  यामध्ये एक स्त्री रोग तज्ञांचाही समावेश करण्यात आला आहे.  आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आरोग्य उपसंचालकांना समिती स्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. समिती आज दिनानाथ हॉस्पिटलची पाहणी करणार असून  राधाकिसन पवार यांच्या अहवालावरून दीनानाथ हॉस्पिटलवर कारवाई केली जाणार आहे. आता दिनानाथ हॉस्पिटलवर नेमकी काय कारवाई होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Pune News: वहिनी ब्लिडिंग आणि वेदनेने विव्हळली, मंगेशकर रुग्णालयात निर्दयीपणा चव्हाट्यावर, कुटुंबीयांनी हादरवणारा घटनाक्रम सांगितला

Pune News: पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला पैशामुळं गेला 'ती'चा जीव; गर्भवतीच्या उपचारासाठी मागितले 10 लाख रूपये, रूग्णालयाची रिसीट आली समोर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Baramati And Rahuri Assembly By Election 2026: बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; 3.84 लाख मतदार 478 केंद्रांवर आपला हक्क बजावणार, मतदारांचा कौल कोणाला, वाचा सर्व अपडेट्स
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; 3.84 लाख मतदार 478 केंद्रांवर आपला हक्क बजावणार, मतदारांचा कौल कोणाला, वाचा सर्व अपडेट्स
Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात पुढील चार दिवस पावसाचे, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याला यलो अलर्ट; पुणे आणि साताऱ्यात गारपीट
राज्यात पुढील चार दिवस पावसाचे, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याला यलो अलर्ट; पुणे आणि साताऱ्यात गारपीट
करुणा शर्मांनी पतीराजाला विचारुन फॉर्म भरला, ही भानगड काय? बारामती पोटनिवडणुकीवरुन बजरंग सोनवणेंचा सवाल
करुणा शर्मांनी पतीराजाला विचारुन फॉर्म भरला, ही भानगड काय? बारामती पोटनिवडणुकीवरुन बजरंग सोनवणेंचा सवाल
Pimpri-Chinchwad : 27 तास अन् 12 लाख, ज्येष्ठ नागरिकाला ‘डिजिटल अरेस्ट’ करण्याचा डाव फसला; सतर्कता कामी, नेमकं काय घडलं?
27 तास अन् 12 लाख, ज्येष्ठ नागरिकाला ‘डिजिटल अरेस्ट’ करण्याचा डाव फसला; सतर्कता कामी, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Mumbai Worli Traffic : मुंबईत ट्रॅफिकला ब्रेक, महिलेचा उद्रेक Special Report
Beed Walmik Karad News Audio Clip : वाल्मिक कराड गँगची तुरुंगात पुन्हा दहशत?
Amol Mitkari On Murlidhar Mohol :ब्लॅक बॉक्स कुठे? विमानाचा CCTV कुठे? मोहोळांनी माफी मागावी-मिटकरी
Nashik TCS Case : निर्लज्जपणाचा कहर नराधमांच्या हाती पदर Special Report
Sanjay Dutt Movie : काँग्रेसच्या भुमिकेमुळे संजय दत्तच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime news: मोठी बातमी: महिला क्रिकेटरने मुंबईतील उद्योगपतीला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवलं, 63 लाख उकळले, पोलिसांकडून अटकेची कारवाई
मोठी बातमी: महिला क्रिकेटरने मुंबईतील उद्योगपतीला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवलं, 63 लाख उकळले, पोलिसांकडून अटकेची कारवाई
Maharashtra Live blog updates: बारामतीत पोटनिवडणुकीसाठी मतदान; मात्र, शरद पवार मतदानाचा हक्क बजावू शकणार नाहीत
Maharashtra Live blog updates: बारामतीत पोटनिवडणुकीसाठी मतदान; मात्र, शरद पवार मतदानाचा हक्क बजावू शकणार नाहीत
Ulhasnagar Clash : उल्हासनगरमध्ये शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष, केवळ एक नगरसेवक असलेल्या काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद दिल्याने गोंधळ
उल्हासनगरमध्ये शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष, केवळ एक नगरसेवक असलेल्या काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद दिल्याने गोंधळ
Sukanya Samriddhi Yojana: सुकन्या समृद्धी योजनेतून 21 वर्ष पूर्ण होण्याअगोदर पैसे काढता येतात का?  जाणून घ्या कधी पैसे काढता येतात? प्रक्रिया काय असते? 
सुकन्या समृद्धी योजनेतून 21 वर्ष पूर्ण होण्याअगोदर पैसे काढता येतात का? प्रक्रिया काय असते? 
Sukesh Chandrashekhar : प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ, तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करतोय; माफीची साक्षीदार होण्याऱ्या जॅकलिनला सुकेशचे तुरुंगातून पत्र
प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ, तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करतोय; माफीची साक्षीदार होण्याऱ्या जॅकलिनला सुकेशचे तुरुंगातून पत्र
विवस्त्र व्हिडीओ कॉल करते, 20 हजार दे; प्रसिद्ध अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे 'नको ते चॅट्स' व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
विवस्त्र व्हिडीओ कॉल करते, 20 हजार दे; प्रसिद्ध अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे 'नको ते चॅट्स' व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Madha Clash : ओळखपत्र मागितल्याने उत्पादन शुल्क अधिकारी चिडले, धाबेवाल्याला मारहाण; नंतर ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना चांगलंच चोपलं
ओळखपत्र मागितल्याने उत्पादन शुल्क अधिकारी चिडले, धाबेवाल्याला मारहाण; नंतर ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना चांगलंच चोपलं
राहुरीत मतदानाच्या काही तास आधी प्राजक्त तनपुरेंचं निवेदन; म्हणाले, कार्यकर्त्यांशी चर्चा, दिशा निश्चित
राहुरीत मतदानाच्या काही तास आधी प्राजक्त तनपुरेंचं निवेदन; म्हणाले, कार्यकर्त्यांशी चर्चा, दिशा निश्चित
Embed widget