एक्स्प्लोर

सिंधुताईंच्या आश्रमातील मुली लग्नासाठी देतो म्हणत पैशांची मागणी; फसवणूक करणाऱ्या भामट्यांविरुद्ध गुन्हा

एबीपी माझाच्या बातमीनंतर सिंधुताई सपकाळ यांच्या नावाचा गैरवापर करत मुलगी लग्नाला देतो म्हणणाऱ्या भामट्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

पुणे : अनाथांची माय म्हणून महाराष्ट्रासह देशाला परिचित असलेल्या दिवंगत सिंधुताई सपकाळ (sindhutai sapkal) यांच्या नावाचा गैरवापर करुन तरुणाईला फसवण्याचा प्रकार समोर आला आहे. सिंधुताई सपकाळ यांच्या पुण्यातील आश्रमात लग्नासाठी मुली आहेत असं म्हणत अनेकांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. लग्नासाठी (Marriage) इच्छुक असलेल्यांना फोन करून या सगळ्या संदर्भातली माहिती दिली जाते आणि त्यानंतर रजिस्ट्रेशन म्हणून 15,000 रुपये फोन पे ने किंवा google पे ने मागवले जातात. या सगळ्या संदर्भात दोन दिवसांपूर्वी सपकाळ यांनी सासवडमध्ये तक्रार दिली होती. मात्र, दोन दिवसांनी सासवड पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. एबीपी माझाने यासंदर्भात वृत्त दाखवल्यानंतर पोलिसांनी आता गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, लग्नाळू मुलांच्या पालकांची व नातेवाईकांची होणारी ही फसवणूक गंभीर असल्याचे पाहायला मिळत आहे.  

एबीपी माझाच्या बातमीनंतर सिंधुताई सपकाळ यांच्या नावाचा गैरवापर करत मुलगी लग्नाला देतो म्हणणाऱ्या भामट्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. सिंधुताई सपकाळ यांच्या आश्रमात लग्नासाठी मुली आहेत असं म्हणत अनेकांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. फोन करून या सगळ्या संदर्भातली माहिती दिली जाते आणि त्यानंतर रजिस्ट्रेशन म्हणून 15,000 रुपये फोन पे ने किंवा google पेने मागवले जातात. या सगळ्या संदर्भात दोन दिवसांपूर्वी सपकाळ यांनी सासवडमध्ये पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र, याप्रकरणी दोन दिवसांनी सासवड पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, 319 (4), 318 (4), 356 (2), आयटी ऍक्ट 66 या कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, समाजात मुलांच्या लग्नासाठीची गंभीर प्रश्न असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. मुलांच्या लग्नासाठी पालक, नातेवाईक मुलगी मिळावी म्हणून मोजेल ती किंमत मोजायला तयार असल्याचं दिसून येत आहे. 

एबीपी माझाने ही बातमी दाखवली आणि त्यानंतर या सोशल मीडियावर हा प्रकार करणाऱ्या भामट्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, ज्या सिंधुताईंनी आपलं संपूर्ण आयुष्य अनाथ, व गोरगरिबांच्या लेकरांसाठी व्यतित केलं. त्या सिंधुताईंच्या आश्रमासंदर्भात एवढा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर गुन्हा दाखल करायला दोन दिवस का लागले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

हेही वाचा

जनगणनेला कधी सुरुवात? तारीख आली समोर; देशातील डोंगराळ प्रदेशातील 4 राज्यात सर्वप्रथम होणार

 

शिवानी पांढरे
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Harshvardhan Sapkal : बारामतीमधून माघार, पण आमचा कुणालाही पाठिंबा नाही; काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची भूमिका, भाजपवर टीका
बारामतीमधून माघार, पण आमचा कुणालाही पाठिंबा नाही; काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची भूमिका, भाजपवर टीका
Pune Crime News: पुण्यातील 'रील स्टार' सोनाली हिंगे अन् दोन पोलिसांचे अखेर निलंबन, प्राचार्यांकडून उकळली होती सात लाखांची खंडणी
पुण्यातील 'रील स्टार' सोनाली हिंगे अन् दोन पोलिसांचे अखेर निलंबन, प्राचार्यांकडून उकळली होती सात लाखांची खंडणी
Chhagan Bhujbal Helicopter Pune: छगन भुजबळांचं हेलिकॉप्टर लँड करताना पायलटची मोठी चूक, पुण्यात अपघात थोडक्यात टळला
छगन भुजबळांचं हेलिकॉप्टर लँड करताना पायलटची मोठी चूक, पुण्यात अपघात थोडक्यात टळला
Pune Crime News: कोचिंग क्लासच्या ऑफिस बॉयचा काळा कारनामा, आठवीतल्या मुलाला स्टोअर रूममध्ये नेऊन नको ते केलं, पुण्यातील संतापजनक प्रकार
कोचिंग क्लासच्या ऑफिस बॉयचा काळा कारनामा, आठवीतल्या मुलाला स्टोअर रूममध्ये नेऊन नको ते केलं, पुण्यातील संतापजनक प्रकार

व्हिडीओ

Earthquake in Marathwada : हिंगोली, परभणी, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, घरांना तडे
Police Bharti Special Report : फाटक्या चपलातली दांडगी जिद्द, पोलिस भरतीवेळी थक्क करणारी घटना
Ashok Kharat Special Report : खरातविरोधात 160 जीबीचे पुरावे, त्या 19 फोल्डर्समध्ये काय दडलंय?
Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हे तर इस्त्रायल फर्स्ट धोरण! ट्रम्प यांच्या MAGA चळवळीत मोठी फूट; खंद्या शिलेदारांकडून बाह्य शक्तींचे 'गुलाम' झाल्याचा बोचरा वार, इराणची जिवितहानी करणारे आदेश सैनिकांनी पाळू नयेत, असाही दिला सल्ला
हे तर इस्त्रायल फर्स्ट धोरण! ट्रम्प यांच्या MAGA चळवळीत मोठी फूट; खंद्या शिलेदारांकडून बाह्य शक्तींचे 'गुलाम' झाल्याचा बोचरा वार, इराणची जिवितहानी करणारे आदेश सैनिकांनी पाळू नयेत, असाही दिला सल्ला
US Iran Islamabad Talks:चर्चेच्या पहिल्या फेरीत इराण वरचढ ठरला, पण अमेरिकेची पहिली मागणी काय? पाकिस्तानने सुद्धा 'रामबाण' उपाय शोधत ताकद लावली!
चर्चेच्या पहिल्या फेरीत इराण वरचढ ठरला, पण अमेरिकेची पहिली मागणी काय? पाकिस्तानने सुद्धा 'रामबाण' उपाय शोधत ताकद लावली!
Gold Jewellery : 24, 22 की 18 कॅरेट, दैनंदिन वापरासाठी किती कॅरेटचे सोने सर्वात टिकाऊ? खरेदीपूर्वी 'हे' नक्की वाचा!
24, 22 की 18 कॅरेट, दैनंदिन वापरासाठी किती कॅरेटचे सोने सर्वात टिकाऊ? खरेदीपूर्वी 'हे' नक्की वाचा!
America Iran Islamabad Talks: पाकिस्तानातील अमेरिकेसोबतच्या चर्चेत सुरुवातीलाच इराणनं सर्वात मोठी बाजी मारली! इस्त्रायलला सुद्धा तगडा झटका; तब्बल 48 वर्षाच्या लाॅकडाऊनमधून सुटकेची चिन्हे
पाकिस्तानातील अमेरिकेसोबतच्या चर्चेत सुरुवातीलाच इराणनं सर्वात मोठी बाजी मारली! इस्त्रायलला सुद्धा तगडा झटका; तब्बल 48 वर्षाच्या लाॅकडाऊनमधून सुटकेची चिन्हे
Virat Kohli on Vaibhav Sooryavanshi: चिमुरड्या वैभवने चौफेर कुटाई करूनही आरसीबीच्या किंग कोहलीकडून 'स्पेशल' यादगार गिफ्ट!
चिमुरड्या वैभवने चौफेर कुटाई करूनही आरसीबीच्या किंग कोहलीकडून 'स्पेशल' यादगार गिफ्ट!
America Iran Islamabad Talks: पाकिस्तानी पासपोर्टवर असं काय छापलंय ज्यामुळे कोणताच पाकिस्तानी इस्त्रायलला कधीच जाऊ शकत नाही! पासपोर्टवर 'ते' वाक्य आहे तरी काय?
पाकिस्तानी पासपोर्टवर असं काय छापलंय ज्यामुळे कोणताच पाकिस्तानी इस्त्रायलला कधीच जाऊ शकत नाही! पासपोर्टवर 'ते' वाक्य आहे तरी काय?
America Iran Islamabad Talks: इराणच्या प्रतिकारात भंबेरी उडताच ट्रम्पनी जगातील रथी महारथी सोडत शांती वार्तासाठी इस्त्रायल अन् भारताचा कट्टर दुश्मन फक्त पाकिस्तान का निवडला? चकित करणारी इन साईड स्टोरी!
इराणच्या प्रतिकारात भंबेरी उडताच ट्रम्पनी जगातील रथी महारथी सोडत शांती वार्तासाठी इस्त्रायल अन् भारताचा कट्टर दुश्मन फक्त पाकिस्तान का निवडला? चकित करणारी इन साईड स्टोरी!
Uddhav Thackeray Shivsena: एकनाथ शिंदे अन् ठाकरे गटाच्या खासदारांच्या गुप्त बैठकीची अफवा, उद्धव ठाकरेंनी अरविंद सावंतांना मातोश्रीवर बोलावून घेतलं, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे अन् ठाकरे गटाच्या खासदारांच्या गुप्त बैठकीची अफवा, उद्धव ठाकरेंनी अरविंद सावंतांना मातोश्रीवर बोलावून घेतलं, नेमकं काय घडलं?
Embed widget