पुणे: राज्यातील महानगरपालिका निवडणुकांची (mahanagar palika election) तयारी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे, राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या अनुषंगाने हालाचाली सुरू केल्या आहेत, इच्छुकांच्या मुलाखती, चर्चा, युती, जागावाटप यासंबंधीच्या चर्चा सुरू आहेत, अशातच महायुतीत मित्रपक्ष काही ठिकाणी सोबत तर काही ठिकाणी एकमेकांच्या विरोधात लढणार असं चित्र निर्माण झालं आहे, जागावाटपासाठी बैठकांना देखील वेग आला आहे. अशातच काल पुण्यात महायुतीतील शिवसेना आणि भाजपची (Shivsena And BJP) एक बैठक पार पडली आहे. या बैठकीआधी शिवसेनेचे नेते रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) १६५ जागांवर उमेदवार देण्यासाठी ठाम होते, तर शहरप्रमुख नाना भानगिरे महायुतीसोबत (mahanagar palika election) युती करण्यावर ठाम होते आणि त्यांनी भाजपकडे ३५-४० जागा मागणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे पुण्यातील शिवसेनेत ताळमेळ नसल्याचा चर्चांना उधाण आलं होतं. अशातच काल शिवसेना आणि भाजप नेत्यांची पुण्यात बैठक पार पडली. यानंतर आता शिवसेना शिंदे गटाला पुण्यात 35 ते 40 जागा हव्या असल्याची माहिती समोर आली आहे.(mahanagar palika election)
Pune Shivsena: उदय सामंत यांची रात्री उशिरा धंगेकरांनी भेट घेतली
शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत रात्री पुण्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. येत्या तीन-चार दिवसात जागा वाटपाबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुण्यात काल रात्री उशिरा शिवसेना शिंदे गटाची बैठक पार पडली. महानगरपालिका निवडणूक पार्श्वभूमीवर ही बैठक पार पडली असल्याची माहिती आहे. काल दुपारी भाजप आणि शिवसेनेची बैठक पार पडल्यानंतर रात्री उशिरा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पुण्यातील पदाधिकाऱ्यासोबत महानगरपालिका निवडणुकीबाबत चर्चा केली. काल दुपारच्या बैठकीला रवींद्र धंगेकर उपस्थित होते. मात्र उदय सामंत यांची रात्री उशिरा धंगेकरांनी भेट घेतली. पुणे महापालिकेत भाजप आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढणार आहेत. बैठकीला उपनेते रवींद्र धंगेकर शहराध्यक्ष नाना भानगिरे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थितीत होते अशी माहिती समोर आली आहे.
Pune BJP : पुणे महापालिकेत भाजपचा किमान १२५ जागा जिंकण्याचा दावा
तर मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून पुणे महापालिकेत किमान १२५ जागा जिंकण्याचा दावा करण्यात येत आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे दौऱ्यात भाजप आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढवणार असल्याची अधिकृत घोषणा केल्यानंतर जागावाटपाबाबत हालचालींना वेग आला आहे. एका मराठी वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार भाजपकडे सध्या १०५ माजी नगरसेवकांचे संख्याबळ आहे. गेल्या वेळी दुसऱ्या स्थानावर राहिलेल्या उमेदवारांना भाजप संधी देणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे भाजप १२५ जागा निवडून आणण्यासाठी चांगले प्रयत्न करणार आहे. १२५ व्यतिरिक्त जागांवरच महायुतीच्या वाटाघाटी होणार असल्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत. भाजपने मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने जिंकलेल्या सुमारे ५० जागांवर लक्ष केंद्रित केले असून त्या ठिकाणी तगडे उमेदवार देण्यासाठी चाचपणी सुरू आहे.