एक्स्प्लोर

आईसह दोन चिमुकल्यांना संपवलं, पुण्याच्या रांजणगावमधील हत्याकांडाचं गुढ उलगडलं; 10 दिवसांनी आरोपीला बेड्या

जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील रांजणगावमध्ये 25 मे रोजी एक महिला आणि तिच्या अनुक्रमे एक आणि दोन वर्षांच्या मुलांचे मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळले होते.

पुणे : जिल्ह्यातील रांजणगावमध्ये 10 दिवसांपूर्वी आढळून आलेल्या तीन मृतदेहांचे गुढ उकलण्यात पोलिसांनी (Police) यश आलं आहे. एका 25 वर्षीय महिलेसह तिच्या लहान दोन मुलांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. मात्र, संबंधित महिला या परिसरातील कोणाच्याही परिचयाची नव्हती. त्यामुळे, पोलिसांना या घटनेचा तपास करण्यासाठी अधिक वेळ लागला. अखेर, 10 दिवसांनी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून अनैतिक संबंधातूनच हे तिहेरी हत्याकांड घडल्याचं तपासातून समोर आलं आहे. संबंधित महिला बीड (Beed) जिल्ह्यातील माजलगावची असल्याचे तपासातून निष्पन्न झालं आहे. याप्रकरणी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी स्वतः गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष 6 तपास पथकांची नेमणूक केली होती. राज्यभरातील 33 पोलिस ठाण्यांतील अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा, आशा वर्कर्स, आरोग्य सेविका यांच्या मदतीने सुमारे 16,500 भाडेकरूंना विचारपूस करुन आणि 250 सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण करुन पोलिसांनी हत्याकांडाचा तपास उलगडला. 

जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील रांजणगावमध्ये 25 मे रोजी एक महिला आणि तिच्या अनुक्रमे एक आणि दोन वर्षांच्या मुलांचे मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळले होते. अनेक दिवस तपास करुनही पोलिसांना हत्या झालेल्या महिलेची ओळख पटवणे शक्य होत नव्हते. त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण राज्यातील बेपत्ता महिलांची माहिती गोळा केली असता बीड जिल्ह्याची माजलगाव तालुक्यातील वाघोरे गावातील स्वाती केशव सोनवणे ही 25 वर्षांची महिला बेपत्ता असल्याच स्पष्ट झालं होतं. माजलगाव पोलिस ठाण्यातील महिला मिसिंग प्रकरणाशी ही माहिती जुळली. तिचे केशव सोनावणे याच्याबरोबर लग्न झाले होते. त्यांना स्वराज हा 2 वर्षाचा तर विराज हा 1 वर्षाचा मुलगा होता. पोलिसांनी या केशवची चौकशी केली. त्यात त्याने आपली आणि पत्नीची भांडणे असल्याचं सांगितलं. तसेच, ती आपल्या बरोबर राहात नसल्याचंही त्याने सांगितलं. ती आता आपल्या आई-वडिलांसोबत आळंदीत राहात असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. त्यानंतर तपासाची चक्रे फिरू लागली, अखेर 10 दिवसांनी पोलिसांना आरोपीला बेड्या ठोकल्या. 

स्वातीचे तिच्या नवऱ्यासोबत पटत नव्हते. त्यातून तिचे गोरख बोखारेसोबत अनैतिक संबंध निर्माण झाले होते. त्यानंतर, ती गोरखकडे सातत्याने लग्नाची मागणी करत होती. त्यामुळे, या भागातून गोरखने स्वातीला घर सोडण्याच्या कारणाने गाडीवर बसवले आणि आळंदीहून रांजणगावला आणले. त्यानंतर, स्वातीच्याच ओढणीने तिचा गळा आवळून खून केला. तर, या धराधमाने तिच्या दोन लहान मुलांचीही हत्या केली. याप्रकरणी, पुण्यातील शिरुर पोलिसांनी अखेर आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. 

हेही वाचा

सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री बसलाय; नितेश राणेंचा शिवसेनेलाच इशारा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
रोहित पवार म्हणाले, अपघातापूर्वी विमानतळाची रेकी झाली; धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, काल उठून...
रोहित पवार म्हणाले, अपघातापूर्वी विमानतळाची रेकी झाली; धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, काल उठून...
मोठी बातमी ! बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक एकत्रच; सुजय विखेंनी सांगितलं राहुरीतील उमेदवाराचं नाव
मोठी बातमी ! बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक एकत्रच; सुजय विखेंनी सांगितलं राहुरीतील उमेदवाराचं नाव
Heat Alert: थंडी संपली; महाराष्ट्रात तापमान वाढायला सुरूवात; पुण्यासह सोलापूर तापलं, प्रशासनाकडून अलर्ट
थंडी संपली; महाराष्ट्रात तापमान वाढायला सुरूवात; पुण्यासह सोलापूर तापलं, प्रशासनाकडून अलर्ट

व्हिडीओ

Jalgaon Banana : केळीचे दर 2.500 रुपयांवरुन 1500 रुपयांवर, युद्धाचा उत्पादकांना फटका
Ajit Pawar plane crash spot Baramati : AIB च्या अहवालात विमान झाडाला धडकल्याचा उल्लेख, फॅक्ट काय?
Jayant Patil on NCP Merger : विलिनीकरणाची चर्चा थांबली, ज्यांच्याशी चर्चा केली ते दादाच नाहीत
Sanjay Raut Mumbai PC : जे काय होईल ते एकमतानेच होईल सातवी जागा मविआ म्हणूनच जिंकू
Raj Thackeray MNS On BMC Ward Committees Election:उद्धव ठाकरेंच्या त्या निर्णयामुळे राज ठाकरे नाराज?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran vs America : भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू, व्हिडीओ जारी  
भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू
Rajya Sabha Election : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
Iran Israel Conflict : पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
Gold Rate : युद्ध लांबल्यास सोनं 2 लाखांवर जाण्याची शक्यता, सोन्यातील गुंतवणुकीची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या
युद्ध लांबल्यास सोनं 2 लाखांवर जाण्याची शक्यता, सोन्यातील गुंतवणुकीची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या
Who is Ali Larijani: अवघं नेतृत्व संपलं, मृत्यू अवघा छाताडावर नाचत असतानाही अमेरिका- इस्रायलला 'कधीही न विसरता येण्यासारखा धडा' शिकवणारा पडद्यामागचा इराणी 'सेनापती'
अली लारीजानी: अवघं नेतृत्व संपलं, मृत्यू अवघा छाताडावर नाचत असतानाही अमेरिका- इस्रायलला 'कधीही न विसरता येण्यासारखा धडा' शिकवणारा पडद्यामागचा इराणी 'सेनापती'
Embed widget