पुणे : कल्याणीनगर येथील चर्चित पोर्शे कार अपघात प्रकरणात महत्त्वाची घडामोड घडली असून या प्रकरणातील आरोपी आणि बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून (Supreme Court of India) जामीन मंजूर करण्यात आला आहे. अपघातावेळी कार चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाचे वडील असलेले अग्रवाल गेल्या दोन वर्षांपासून येरवडा केंद्रीय कारागृह येथे न्यायालयीन कोठडीत होते. अखेर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिलासा देत जामीन मंजूर केला आहे. अल्पवयीन आरोपीच्या वडिलांच्या आधी रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरलासुद्धा जामीन देण्यात आला होता. 'हिट अँड रन' प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने बदलण्याचा आरोप ससून रुग्णालयातील तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अजय तावरे याच्यावर होते. सर्वोच्च न्यायालयाने डॉक्टर तावरेला जामीन यापूर्वी मंजूर केला होता.

Continues below advertisement

गेल्या २२ महिन्यांपासून विशाल अग्रवाल तुरुंगात आहे. कल्याणीनगरमध्ये १९ मे २०२४ रोजी रात्री भरधाव पोर्शे कारने दुचाकीला उडवलं होतं. यात तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता. पोर्शे कार अपघातानंतर आरोपी अल्पवयीन तरुणाच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. रक्ताचे नमुने बदलल्याच्या प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांना २१ मे रोजी पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली होती.

पुण्यातील कल्याणीनगर परिसरात झालेल्या या भीषण अपघाताने देशभरात मोठी खळबळ उडाली होती. अल्पवयीन मुलाने चालवलेल्या पोर्शे कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पुण्यात तसेच राज्यभर संतापाची लाट उसळली होती. अपघातानंतर पोलिसांनी व्यापक तपास सुरू करत अनेकांना ताब्यात घेतले होते. या प्रकरणात अल्पवयीन चालकाला मद्यप्राशनासाठी मदत केल्याचा तसेच पुरावे लपवण्याचा आरोप करत पोलिसांनी त्याचे वडील विशाल अग्रवाल यांच्यावरही गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती आणि तेव्हापासून ते येरवडा कारागृहात होते. या काळात अग्रवाल यांनी जामिनासाठी विविध न्यायालयात अर्ज दाखल केले होते.

Continues below advertisement

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करत न्यायालयाने अखेर त्यांना जामीन मंजूर केला. या निर्णयामुळे पोर्शे अपघात प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीविरोधात तसेच इतर संबंधितांवरही कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. 

कोण आहे विशाल अग्रवाल?

-ब्रम्हा कॉर्प या बांधकाम उद्योग समूहाचे विशाल अग्रवाल प्रमुख आहेत. - ब्रम्हा कॉर्प हे नाव पुण्यातील बांधकाम व्यवसायात मागील चाळीस वर्षांपासून आघाडीवर राहिलंय.- ब्रम्हदत्त अग्रवाल यांनी स्थापन केलेल्या या उद्योगसमूहांमध्ये अनेक कंपन्या आहेत. - पुण्यातील वडगाव शेरी, खराडी, विमान नगर या भागात अनेक मोठे गृहप्रकल्प या कंपनीने उभारले आहेत. - त्याचबरोबर पुण्यातील ली मेरिडियन हॉटेल , रेसिडेन्सी क्लब यासारखी मोठी बांधकामे देखील या कंपनीने केली आहेत. -यातील ब्रम्हा मल्टीस्पेस , ब्रम्हा मल्टीकॉन या कंपन्यांची जबाबदारी ब्रह्मदत्त अग्रवाल यांचा मुलगा सुरेंद्र अग्रवाल आणि त्यानंतर सुरेंद्र अग्रवाल यांचा मुलगा विशाल अग्रवाल यांच्याकडे आली. - विशाल अग्रवाल यांच्या मालकीच्या विविध कंपन्यांची मालमत्ता 60,120,000 इतकी आहे . - विशाल अग्रवाल यांना आलिशान गाड्यांचा शॉक असून कल्याणी नगरमध्ये अल्पवयीन असलेल्या त्यांच्या लहान मुलाने वेगाने कार चालवून दोघांना बळी घेतला.