एक्स्प्लोर

Pune News: भाजपच्या आमदारांचं बजेटसाठी दबावतंत्र? पिंपरी पालिका आयुक्त कोणाला झुकतं माप देणार!

Pune News: आयुक्त कोणा एका आमदाराच्या ऐकण्यावर निर्णय घेत नाहीत. त्यामुळं भोसरी, चिंचवड आणि पिंपरी या तिन्ही विधानसभेत ते समप्रमाणात निधी वाटप करतील, असा ठाम विश्वास गोरखेंनी व्यक्त केला आहे.

पुणे: पिंपरी चिंचवड मधील भाजपच्या चार आमदारांमध्ये बजेटसाठी रस्सीखेच सुरु झाल्याचं चित्र आहे. भाजपचे आमदार पालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यासोबत स्वतंत्र बैठका घेत आहेत, एका अर्थाने हे आमदार निधीसाठी दबावतंत्र अवलंबत आहेत. अशातचं यंदा भोसरी आणि चिंचवडपेक्षा पिंपरी विधानसभेला निधीच्या बाबतीत झुकतं माप मिळेल, असा दावा भाजपाचे विधानपरिषद आमदार अमित गोरखेंनी केलं आहे. भोसरीचे महेश लांडगे आणि चिंचवडचे शंकर जगताप या भाजपच्या आमदारांनी निधीसाठी मोठी फिल्डिंग लावली आहे. आयुक्त कोणा एका आमदाराच्या ऐकण्यावर निर्णय घेत नाहीत. त्यामुळं भोसरी, चिंचवड आणि पिंपरी या तिन्ही विधानसभेत ते समप्रमाणात निधी वाटप करतील, असा ठाम विश्वास गोरखेंनी व्यक्त केला आहे. 

काय म्हणालेत गोरखे?

पिंपरी चिंचवड महापालिकेचे बजेट येत्या 20 फेब्रुवारीला सादर होणार आहे, याच बजेटमध्ये पिंपरी विधानसभेला अधिकाधिक निधी मिळावा यासाठी भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी आयुक्तांसोबत सोबत चर्चा केलेली आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना अमित गोरखे म्हणाले, विधानसभा क्षेत्रातील जवळपास 14 पेक्षा जास्त नगरसेवक होते आणि प्रत्येक ठिकाणी विकसनशील भाग आहे, आरक्षित भूखंड आहे. त्यासाठी आम्हाला निधी द्या असा आम्ही सांगितलं आहे. प्रत्येक प्रभागांमध्ये आणि प्रत्येक वॉर्ड मध्ये जनतेच्या सोयी सुविधांसाठी हा निधी जास्तीचा द्यावा, अशी मागणी आम्ही केली आहे, अशी माहिती गोरखे यांनी दिली आहे. 

आम्ही सगळे आमदार समन्वयाने काम करतो. आज भोसरीचे आमदार चिंचवडचे आमदार हे आमच्यासाठी सीनियर आहेत. निधी कसा आणायचा ते आम्ही त्यांच्याकडून शिकतो आहे. त्यामुळे आम्ही समन्वयाने वागतो आहे, त्यामुळे नक्कीच चांगल्या प्रकारे आम्ही निधी आणू असा विश्वास यावेळी बोलताना गोरखे यांनी व्यक्त केला आहे. भाजपच्या चार आमदारांचं बजेटसाठी दबावतंत्र? आहे का याबाबत बोलताना गोरखे म्हणाले, या सर्वांमध्ये दबावाची आवश्यकता नाही. ज्या भागात निधीची आवश्यकता आहे, ज्या ठिकाणी रस्ते पाणी किंवा इतर सुविधा यांची कमी आहे. त्या ठिकाणी काही भागांमध्ये विकासाची गरज आहे, त्या ठिकाणी आयुक्त नक्कीच निधी जास्त देतील असा मला वाटतंय, असेही गोरखे यांनी म्हटलं आहे.

तीन आमदारांमध्ये बजेटसाठी चढाओढ सुरु?

बजेट आलं की आपल्या मतदारसंघाला झुकतं माप मिळावं, यासाठी चढाओढ पहायला मिळते आहे. पिंपरी चिंचवडमधील भाजप आमदारांमध्ये अशीच काहीशी चढाओढ सुरु झाली आहे. चिंचवडचे शंकर जगताप, भोसरीचे महेश लांडगे आणि पिंपरीतील अमित गोरखे या तिन्ही आमदारांमधील समन्वयाचा अभाव दिसून येतो आहे. या तिघांनी पालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यासोबत स्वतंत्र बैठका घेतल्या आणि स्वतःच्या मतदारसंघात अधिकचा निधी मिळावा यासाठी पाठपुरावा केला. मात्र, आमच्यात समन्वय आहे आणि आमच्यात कोणतीही चढाओढ नाही, असा दावा जगतापांनी केला आहे.

एबीपी माझा सोबत 7 वर्षांपासून, 13 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव...
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?

व्हिडीओ

BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय
Election Commission PC :पाडू यंत्र हे 2004 पासून हे यंत्र आम्ही नवीन आणलेलं नाही, आयोगाचं स्पष्टीकरण
Geeta Gawali Mumbai : अरुण गवळीची लेक निवडणुकीच्या रिंगणात, गीता गवळींनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
Kolhapur Municipal Corporation Election: राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
BMC Election : बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
पुण्यात भाजप निवडणूक प्रमुखाच्या वार्डात बोगसगिरी; आरोपी तरुंगात, इकडे केंद्रावर झालं बोगस मतदान
पुण्यात भाजप निवडणूक प्रमुखाच्या वार्डात बोगसगिरी; आरोपी तरुंगात, इकडे केंद्रावर झालं बोगस मतदान
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
Embed widget