Vilas Lande Meet Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला काल पिंपरी-चिंचवडमध्ये मोठं खिंडार पडलं. पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या अनेक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. ४ पदाधिकाऱ्यांसह एकूण २४ जणांनी काल(बुधवारी) शरद पवार (Sharad Pawar) गटात प्रवेश केला. त्यानंतर अजित पवार अॅक्शन मोडमध्ये आल्याचं दिसून आलं. त्यांनी आज पिंपरी चिंचवडमध्ये बैठक बोलावली. या बैठकीवेळी माजी आमदार विलास लांडे उपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. 


माजी आमदार विलास लांडेंनी त्यांचे निकटवर्तीय अजित गव्हाणेंना शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादीत पाठवलं, पण चोवीस तास उलटायच्या आतच विलास लांडे स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बैठकीसाठी हजर झाले. त्यांच्या उपस्थितीमुळे राजकीय वर्तुळातील नेत्यांनी भुवया उंचावल्या आहेत. आम्ही विलास लांडेंच्या मार्गदर्शनानेचं अजित पवारांची साथ सोडतोय, असं म्हणणारे अजित गव्हाणे आणि त्यांचे समर्थक आता बुचकळ्यात पडल्याचं चित्र दिसून येत आहे.


अजित गव्हाणेंनी समर्थकांसह तुतारी फुंकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अजित पवारांनी (Ajit Pawar) आज पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये पिंपरी चिंचवडमधील माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलावली आहे. त्याच बैठकीला विलास लांडेंनी हजेरी लावल्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. विलास लांडेंच्या डोक्यात नेमकं काय शिजतंय असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. तर अजित गव्हाणे आणि समर्थकांची यानिमित्ताने कोंडी होणार अशी चर्चा देखील आता रंगू लागली आहे.


पिंपरी चिंचवडमधील नगरसेवकांची बैठक अजित पवारांनी बोलावली आहे. जवळपास १२ ते १३ नगरसेवक या बैठकीसाठी उपस्थित राहिले आहेत. या सर्वात विलास लांडेंच्या एंट्रीने चर्चा सुरू झाल्या. ते नेमके कोणाच्या बाजूने आहेत त्याबाबत संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. कालच (बुधवारी) माजी आमदार विलास लांडेंनी त्यांचे निकटवर्तीय अजित गव्हाणेंनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला. यावेळी एबीपी माझाशी बोलताना 'आम्ही विलास लांडेंच्या मार्गदर्शनानेचं अजित पवारांची साथ सोडतोय' असं अजित गव्हाणेंनी म्हटलं होतं. त्यामुळे आता चर्चांना उधाण आलं आहे. 


बालेकिल्ल्यात धक्का बसल्यानंतर अजित पवार अॅक्शन मोडमध्ये


पिंपरी चिंचवडमध्ये मोठा धक्का बसल्यावर अजित पवार (Ajit Pawar) खडबडून जागे झाल्याचं चित्र आहे. शहराध्यक्ष अजित गव्हाणेंनी घड्याळ सोडून शरद पवारांची तुतारी फुंकल्यानंतर अजित पवारांनी (Ajit Pawar) तातडीने उर्वरित पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. आज (गुरूवारी) सकाळी पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये ही बैठक पार पडली आहे. 


 


VIDEO - विलास लांडेंचे डोक्यात काय शिजतंय? पाहा व्हिडिओ



 


संबधित बातम्या - Ajit Pawar: बालेकिल्ल्यात धक्का बसल्यानंतर अजित पवार अॅक्शन मोडमध्ये! तातडीने बोलावली बैठक, काय असणार पुढची रणनीती