पुणे:  पुण्यात सध्या पब (Pune Pub) कल्चर वाढताना दिसत आहे. अनेक परिसरात मोठ्या प्रमाणात पब आहेत.  शहरात (Pune News)  मध्यरात्री उशीरापर्यंत मोठ्या आवाजात पार्टी सुरू असणाऱ्या हॉटेलवर कारवाई (Pune Hotels)  करण्यात आली आहे. नियमबाह्य पद्धतीने रात्री हॉटेलमध्ये मोठ्या आवाजात साऊंड सिस्टीम सुर ठेवल्याप्रकरणी पुण्यातील तब्बल 10 नामांकित हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली आहे. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात तसेच उपनगरात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हॉटेलवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई   केली आहे.    


शहरातील हॉटेल, पब, बारमध्ये उशीरापर्यंत पार्टी सुरू असल्याच्या तक्रारी गुन्हे शाखेकडे आल्या होत्या. या पार्श्वभूमीव रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हॉटेलवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई   केली आहे.  रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवणे, मद्य परवानाचे रजिस्टर न भरणे आणि विना परवाना मद्य विक्री करणाऱ्या पुण्यातील तब्बल 10 नामांकित हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे.  दहा हॉटेल आणि पबवर  दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. 


मागील आठ दिवसात पुण्यातील दहा  हॉटेल्स आणि पबवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे.  तसेच पोलिसांनी शहरतील गस्त देखील वाढवली आहे. 


- प्लंज, कोरेगाव पार्क
- लोकल गॅस्ट्रो बार
- एलरो
- युनिकॉर्न 
- आर्यन बार, बालेवाडी
- नारंग वेंचर
- हॉटेल मेट्रो
- लेमन ग्रास, विमाननगर
- बॉलर
- हॉटेल काकाज


पब कल्चरमध्ये वाढ


कोरेगाव पार्क, मुंढवा, बंडगार्डन, बाणेर, बालेवाडी या परिसरात मोठ्या प्रमाणात पब आहेत. पबमध्ये प्रवेश घेण्यासाठी अनेक प्रकारच्या सवलती दिल्या जातात. कपल एन्ट्री, फ्रि ड्रिंक शिवाय गर्ल्स नाईट यांसारख्या सवलतींना तरुणाई भाळून सध्या पब संस्कृतीकडे वळत आहे.  


पार्ट्यांसाठी विद्यार्थ्यांचा वापर 


पुण्याला शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. याच पुण्यात अनेक विद्यार्थी महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून शिक्षणासाठी येतात. विविध मोठ्या शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतात. शिक्षणासाठी हजारोंनी पैसे भरतात. पुण्यात अव्वल दर्जाचं शिक्षण दिलं जातं आणि शिवाय मोठमोठ्या शिक्षण संस्थादेखील आहेत. त्यामुळे पालकही मोठ्या उमेदीने आपल्या पाल्याला पुण्यात शिक्षणासाठी पाठवतात मात्र याच पुण्यात या विद्यार्थ्यांचा पार्टी फिलर म्हणून वापर करण्यात येत आहे. 


हे ही वाचा :


Party Filler Pune: पुण्यातील तरुणाईचा 'पार्टी फिलर' म्हणून वापर; कमी किंमतीत देतात पबमध्ये एन्ट्री