Maharashtra Municipal Corporation Reservation 2026: राज्यातील 29 महानगरपालिकेतील महापौरपदासाठी आज आरक्षण जाहीर (Mayor Reservation Mahanagarpalika Marathi News) करण्यात आलं आहे. आज महापौर पदासाठीचं आरक्षणाचं चित्र आज स्पष्ट झाल्याने आता नावाची चर्चा सुरू झाली आहे. पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये सर्वसाधारण प्रवर्गातून आरक्षण सोडत निघाली आहे, पुण्यात महिलांसाठी राखीव सर्वसाधारण प्रभागाची सोडत निघाली आहे, तर पिंपरी चिंचवडमध्ये आता महिला किंवा पुरूष महापौर दिसून येणार आहे, या ठिकाणी पुण्यात भाजपच्या सर्वसाधारण प्रवर्गातील महिला महापौर होणार आहेत, यावरती शिक्कामोर्तब झालं आहे. आता पुण्यात महिला राज दिसून येणार असल्याचं समोर आलं आहे. या सोडतीमुळे पुण्यामध्ये दिग्गज पुरुष नेत्यांची महापौरपदी विराजमान होण्याची इच्छा अपूर्ण राहणार आहे.

पिंपरी चिंचवडच्या महापौर पदावर खुल्या प्रवर्गाचा नगरसेवक विराजमान होणार आहे. त्यामुळं भाजपच्या 84 म्हणजे प्रत्येक नगरसेवकाला महापौर होण्याची संधी उपलब्ध आहे? प्रत्यक्षात हा बहुमान कोणाला मिळणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.पिंपरी चिंचवडसाठी सुरुवातीला खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण पडल्याचं समोर आलं होतं. मात्र प्रत्यक्षात शासनाच्या अधिकृत यादीत खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण पडल्याचं दिसून येतंय. उडालेल्या या गोंधळामुळं बराच वेळ उलटसुलट चर्चा ही रंगल्या.

पुण्यातून या महिलांच्या नावांची चर्चा

- रंजना टिळेकर- रंजना टिळेकर यांनी प्रभाग क्रमांक ४० (कोंढवा बुद्रुक - येवलेवाडी) मधून विजय मिळवला आहे. त्यांनी या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते वसंत मोरे यांचे पुत्र रुपेश मोरे यांचा पराभव केला.

- रोहिणी चिमटे- या प्रभाग क्रमांक २९ (खराडी - मांजरी बुद्रुक) मधून भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर निवडून आल्या आहेत.

- मंजुषा नागपुरे या अनुभवी नेत्या असून त्यांनी यापूर्वीही पुणे महानगरपालिकेत नगरसेविका म्हणून काम केले आहे. सिंहगड रोड परिसरात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. त्या इथून बिनविरोध निवडून आल्या आहेत.

- वीणा घोष या प्रभाग क्रमांक ३६ (धायरी - नऱ्हे) मधून भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर निवडून आल्या आहेत.

- प्राची आल्हाट या प्रभाग क्रमांक ४१ (महंमदवाडी - कौसरबाग) मधून भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत.

- मृणाल कांबळे या प्रभाग क्रमांक २२ (काशेवाडी - डायस प्लॉट) मधून भाजपच्या तिकीटावर निवडून आल्या आहेत. त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या सून आणि अविनाश बागवे यांच्या पत्नी इंदिरा बागवे यांचा पराभव केला.

- वर्षा तापकीर यांच्या नावाचीही चर्चा आहे. त्यांनी धनकवडी – कात्रज डेअरी प्रभाग क्रमांक 37 ब मधून त्या नगरसेविका झाल्या आहेत.

- मानसी मनोज देशपांडे प्रभाग क्र.20 (क) शंकर महाराज मठ" बिबवेवाडी या प्रभागातून त्या नगरसेविका झाल्या आहेत.

पिंपरी चिंचवडमध्ये कोण होणार महापौर? आरक्षण - सर्वसाधारण खुला प्रवर्ग- पिंपरी चिंचवड 

राहुल कलाटे - भाजपशत्रुघ्न काटे - भाजप ज्ञानेश्वर उर्फ माऊली जगताप - भाजप

रवी लांडगे - भाजपजालिंदर शिंदे - भाजप

29 महापालिकांचं महापौर पदाचं आरक्षण

1. छत्रपती संभाजीनगर:  सर्वसाधारण2. नवी मुंबई:  सर्वसाधारण (महिला)3. वसई- विरार: सर्वसाधारण4. कल्याण- डोंबिवली: अनुसूचित जमाती5. कोल्हापूर: ओबीसी6. नागपूर:  सर्वसाधारण  (महिला)7. बृहन्मुंबई:  सर्वसाधारण (महिला)8. सोलापूर:  सर्वसाधारण9. अमरावती:   सर्वसाधारण10. अकोला: ओबीसी  (महिला)11. नाशिक:  सर्वसाधारण  (महिला)12. पिंपरी- चिंचवड:  सर्वसाधारण (महिला)13. पुणे:  सर्वसाधारण (महिला)14. उल्हासनगर: ओबीसी15. ठाणे: अनुसूचित जाती16. चंद्रपूर:  ओबीसी (महिला)17. परभणी: सर्वसाधारण (महिला ) (आक्षेप)18. लातूर: अनुसूचित जाती (महिला )19. भिवंडी- निजामपूर: सर्वसाधारण (महिला)20. मालेगाव: सर्वसाधारण21. पनवेल:  ओबीसी22. मीरा- भाईंदर:  सर्वसाधारण  (महिला)23. नांदेड- वाघाळा: सर्वसाधारण  (महिला)24. सांगली- मिरज- कुपवाड:  सर्वसाधारण25. जळगाव:  ओबीसी (महिला)26. अहिल्यानगर: ओबीसी (महिला)27. धुळे: सर्वसाधारण  (महिला)28. जालना: अनसूचित जाती (महिला)29. इचलकरंजी:  ओबीसी