पुणे : पुणे (Pune News) शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोयता (Koyata Gang) बाळगून मध्यवर्ती भागात दहशत माजवण्याचे कृत्य सर्रास सुरू आहे. आता या कोयत्याचे लोण शाळांपर्यंत पोहचले आहे.  पुण्यातील नुतन मराठी विद्यालयात (नुमवि) या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोयत्याने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.   17  वर्षीय विद्यार्थ्यांवर दोन तरुणांनी हल्ला  केला आहे. 


एकमेकांच्या अंगावर धाऊन जात मारहाण केल्याचं आतापर्यंत आपण चित्रपटात बघितलं आहे. मात्र पुण्यात चित्रपटाप्रमाणेच कोयता गॅंग दहशत माजवताना दिसत आहे. आता तर थेट विद्यार्थ्यांवर कोयत्याने हल्ला झाल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हल्ला झालेल्या विद्यार्थी जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल केले आहे. विशेष म्हणजे कालच पोलिसांनी या शाळेत जाऊन या गुन्हेगारीबद्दल समुपदेशन केले होते.  


समीर पठाण आणि विजय आरडे अशी या 17 वर्षीय विद्यार्थ्यांची नावे आहेत.  विजय आरडे हा बारावीमध्ये शिकत असून पद्मवती भागात राहायला आहे तर समीर पठाण हा तुळशीबागेत काम करतो. पठाण याच्या मैत्रिणीशी विजय बसस्टॉपवर  बोलत होता. आपल्या मैत्रिणीशी बोलतो याचा राग पठाणला आला आणि त्याने विजयवर कोयता उगारला. या हल्ल्यात शेजारी असलेल्या  विद्यार्थ्याला देखील जखमी झाला. वार झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली त्यानंतर जवळच असलेल्या वाहतूक पोलिसांनी जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल केले. 


सांस्कृतिक राजधानी म्हणवणाऱ्य पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कोयता संस्कृती उदयास आल्याच पहायला मिळत आहे.  छोट्या मोठ्या कारणांवरून आणि कित्येकद तर विनाकारण कोयत्याने दहशत निर्माण केली जात असल्याच्या घटना शहराच्या वेगवेगळ्या भागता घडताना दिसतात . त्यामुळे कोयता गॅंगची रुजू पहात असलेली संस्कृती मुळापासून उखडून टाकण्याची गरज आहे. 


कोयता घेऊन दहशत निर्माण करणारे बहुतेक तरुण 20 ते 22 वयोगटातील आहेत.  कित्येक तर अल्पवयीन आहेत.  मात्र म्हणून त्यांना. गुन्हेरीकडे वळणाऱ्या या तरुणांना रोखण्याची जबाबदारी फक्त पोलीसांवर टाकून चालणार नाही तर समाजानेही आपली जबाबदारी उचलायला हवी असं म्हणत काही सामाजिक संघटना त्यासाठी पुढाकार घ्यायला तयार झाल्या आहेत


 पुण्यातील महाविद्यालये, खाद्यपदार्थाची दुकाने अशा सार्वजनिक ठिकाणी उघडपणे होत असलेल्या कोयत्याच्या दर्शनामुळे पुणेकर भयभीत झाले आहेत.  सांस्कृतिक राजधानी म्हणवणाऱ्या पुण्यातील हे बदल ज्याला कोयता संस्कृती म्हटल जातय गंभीर आहेत.  त्यासाठी फक्त पोलीसांना जबाबदार धरुन चालणार नाही.  तर या मुलांचे पालक, जिथे ती शिकतात ती महाविद्यालये आणि काम करत असतील ती ठिकाणे अशा सर्वाचीच जबाबदारी आहे. कारण कोणती एक अशी कोयता गॅंग पुण्यात सक्रिय नाही तर कोयता गॅंगची मानसिकता सक्रिय झालीय.  त्यावर सगळ्यांना काम करावे लागणार आहे