पुणे : विधानपरिषदेच्या पाच जागांच्या निवडणुकीची चुरस आता शिगेला पोहोचली आहे. अर्ज माघारी घेण्यासाठी फक्त दोन तास उरले आहेत. अशातच बंडखोर उमेदवारांची मनधरणी पक्षांकडून केली जात आहे, अशातच काही बंडखोर उमेदवार (Maharashtra Vidhan Parishad Election) नॉट रिचेबल झाल्याने पक्षांची डोकेदुखी वाढली आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. तर महायुतीमध्ये पाचही मतदारसंघामध्ये बंडखोरी झाली आहे. पाच जागांसाठी तब्बल 272 उमेदवार रिंगणात आहेत. तर पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे भैया माने यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे, त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मी अर्ज भरला होता पण मी नंतर अशी भूमिका घेतली की महायुतीच्या माध्यमातून ही सीट लढवतात आणि म्हणून मी माझा विड्रॉल या निमित्ताने मी केलेला आहे, सुनेत्रा पवारांशी काही बोलणं झालं का? यावर माने म्हणाले, आता काही बोलणं झालं नाही. पण मी फॉर्म भरायच्या अगोदर त्यांना एकदा बोललेलो होतो आणि महायुतीचं जे आमचे नीतिशास्त्र (Ethics) आहेत त्याच्याप्रमाणे मी माघार घेतली आहे.(Maharashtra Vidhan Parishad Election)
नेमकं कारण काय माघार घेण्याचं? शक्ती प्रदर्शन कार्यकर्त्यांची भावना होती, जिवंतपणा जो कार्यकर्ता असतो, त्याच्यातून ते शक्ती प्रदर्शन झालेलं होतं, दबाव काही नाही, पण महायुती म्हणून मला काल हसन मुश्रीफ भेटले, जनस्वराज्याचे विनय कोरे, सुमित कदम त्यांनी विनंती केली की या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण अपक्ष निवडणूक लढवून आपण महायुतीत थोडासा गोंधळ आणि त्यामुळे आपण माघार घ्यावी आणि त्यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत मी मागे घेतलं आहे. मी माघार घेतल्याने नक्कीच महायुतीला फायदा होईल, मला आश्वासन वगैरे काही दिलेलं नाही.
कार्यकर्त्यांची काय मीटिंग घेतली आज सकाळी, कार्यकर्ते नाराज आहात. आज सकाळी मीटिंग घेतली. कार्यकर्ते अनेक वर्षे राबलेले असतात, कार्यकर्त्यांनी वर्षभर नोंदणीसाठी काम केलेलं आहे, त्यामुळे त्यांची भावना होतीच, पण समजावून सांगण्याचा प्रयत्न त्यांना केला. आता मी माघार घेतली आहे. पुणे पदवीधरमध्ये स्मिता जाधव यांचा मार्ग मोकळा झालेला आहे. महायुतीमध्ये मोठा तिढा निर्माण झाला होता. भैया माने यांनी बंडखोरी केलेली होती, मात्र अखेर भैया माने यांची बंडखोरी शमवण्यात महायुतीला यश आलेला आहे भाजपाला यश आलेला आहे कारण भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे स्वतः पुण्यामध्ये आज सकाळपासूनच आहेत आणि पुण्यामध्येमहत्त्वाची घडामोड घडताना दिसते पुणे पदवीधर मध्ये महायुतीमध्ये भाजपाच्या स्मिता जाधव यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघातील बंडखोरी शमवण्यात महायुती आणि महाविकास आघाडीला यश आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे भैया माने यांनी पुणे पदवीधर मतदारसंघातून दाखल केलेला अर्ज मागे घेतलाय. आपण आता भाजपच्या उमेदवार स्मिता जाधव यांचा प्रचार करणार आहोत असं भैय्या माने यांनी म्हटलंय. तर शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या मंगेश चिवटे यांनी देखील त्यांच्या प्रतिनिधींच्या मार्फत त्यांचा निवडणूक अर्ज मागे घेतलाय. भाजपने उमेदवारी दिलेल्या कौस्तुभ गावडे यांच्यासमोरील अडचणी यामुळे दूर होणार आहेत. महाविकास आघाडीला देखील बंडखोरी शमवण्यात यश आलंय. शिक्षक मतदारसंघातुन कॉंग्रेसचे जयंत आसंगावकर उमेदवार असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अश्विनी कदम यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र अश्विनी कदम यांनी आज अर्ज माघारी घेत जयंत आसंगावकर यांच्यासाठी काय करणार असल्याचं म्हटलंय.
मंगेश चिवटेंची शिक्षक मतदारसंघातून माघार
तर एकनाश शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार मंगेश चिवटे देखील शिक्षक मतदारसंघातून माघार घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. चिवटेंचे प्रतिनिधी माघार घेण्यासाठी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात पोहोचले आहेत. शिक्षक मतदारसंघातून मंगेश चिवटे यांनी बंडखोरी केली होती. त्याचबरोबर एकनाथ शिंदेंनी मंगेश चिवटे हे अधिकृत उमेदवार असल्याचं सांगितलं होतं, त्याचबरोबर त्यांना एबी फॉर्म दिला होता. तर आता महायुतीला दोन्ही बंडखोरांची मनधरणी करण्यात यश आलं आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून ज्यांनी बंडखोरी केली होती. अश्विनी कदम यांनी देखील त्यांचा अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे हर्षदा देशमुख जाधव यांचा देखील मार्ग मोकळा झाला आहे, पुण्यात महायुती आणि महाविकास आघाडीला आपापले बंडखोर यांची मनधरणी करण्यात यश आलं आहे.
Maharashtra Vidhan Parishad Election: पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा, मतदान अन् निकाल कधी?
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या (Maharashtra Vidhan Parishad) 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा झाली आहे. 23 ऑक्टोबर 2026 रोजी मतदान होणार असून 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी (Counting of Votes) होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.
Election Schedule: निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक
अधिसूचना जारी (Notification Date): 29 सप्टेंबर 2026
उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख (Nomination Last Date): 6 ऑक्टोबर 2026
अर्जांची छाननी (Scrutiny): 7 ऑक्टोबर 2026
अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख (Withdrawal Last Date): 9 ऑक्टोबर 2026
मतदानाची तारीख व वेळ (Poll Date & Time): 23 ऑक्टोबर 2026 (सकाळी 8 ते दुपारी 4)
मतमोजणी व निकाल (Counting Date): 27 ऑक्टोबर 2026
Graduate and Teachers constituency election maharashtra: कोणत्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांमध्ये निवडणूक होणार?
1. औरंगाबाद पदवीधर: सतीश भानुदास चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस - शरद पवारांची राष्ट्रवादी / मविआ)- माजी आमदार
2. पुणे पदवीधर: अरुण गणपती लाड (राष्ट्रवादी काँग्रेस - शरद पवारांची राष्ट्रवादी / मविआ)- - माजी आमदार
3. नागपूर पदवीधर: अभिजीत गोविंदराव वंजारी (काँग्रेस)- माजी आमदार
4. अमरावती शिक्षक: किरण रामराव सरनाईक (शिवसेना - शिंदे गट)- माजी आमदार
5 पुणे शिक्षक: जयंत दिनकर आसगावकर (काँग्रेस)- माजी आमदार
