एक्स्प्लोर

Sanjay Jagtap: संजय जगताप यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश; आगामी निवडणुकीआधी काँग्रेसला मोठा धक्का; रवींद्र चव्हाणांची उपस्थिती

Sanjay Jagtap: भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत संजय जगताप यांचा पक्षप्रवेश पार पडला आहे, या पक्षप्रवेशामुळे आगामी निवडणुकीआधी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

पुणे: काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप यांचा आज भाजपमध्ये पक्षप्रवेश पार पडला. पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजय जगताप (Sanjay Jagtap) भाजपच्या वाटेवर असल्याची काही दिवसांपासून चर्चा होती. सासवड आणि जेजुरी येथील काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी संजय जगताप यांना भेटून भाजपमध्ये प्रवेश करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आज सासवडमध्ये भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत संजय जगताप यांचा पक्षप्रवेश पार पडला आहे, या पक्षप्रवेशामुळे आगामी निवडणुकीआधी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. 

पक्षप्रवेशानंतर बोलताना संजय जगताप म्हणाले, पक्षप्रवेशाला वेळ झाला आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहायला उशीर झाला त्यासाठी दिलगीरी व्यक्त करतो, उर्वरीत पक्षप्रवेश काही वेळाने पूर्ण होतील. मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो असंही जगताप म्हणालेत. माझ्या स्वभावात दोष आहे मी कायम उशीरा पोहोचतो त्यासाठी यावेळी जगताप यांनी दिलगिरी व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व आणि भाजपची साथ आपल्याला लाभली आहे, असंही यावेळी कार्यक्रमात संजय जगताप यांनी म्हटलं आहे. तिथे विकास आहे, तिथे राजकारण नाही, इथे कोणत्याही शेतकऱ्याच्या डोक्यावर पाय देऊन विकास होत नाही, इथे विकास होतो. या विचाराकडे येण्याचं माझं हेच कारण आहे. भाजपचा कार्यकर्ता म्हणून मी आज पक्षप्रवेश केला आहे.

सामाजिक समरसतेचे विचार मला भावला

आज 3 हजार प्रवेश आपल्याला करायचे होते. पण, यादी कमी करून 378 प्रवेश आहेत. फक्त संजय जगताप प्रवेश करत नाहीत तर प्रत्येक कार्यकर्ता या ठिकाणी प्रवेश करतो आहे. माझ्या स्वभावामध्ये दोष आहे मी कधीच वेळेवरती येत नाही. माझे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, पाण्याचे प्रश्न प्रलंबित आहेत, विमानतळाचा मोठा प्रश्न आहे. विमानतळ हे पुरंदर तालुक्यातच होणार आणि योग्य ठिकाणी होणार असा मी तुम्हाला शब्द देतो. कुठलाही प्रकल्प शेतकऱ्यांच्या डोक्यावर पाय देऊन होत नाही. सर्वसामान्यांच्या खात्यात पैसे देण्याचे काम नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाने केलं आहे. सामाजिक समरसतेचे विचार मला भावला त्यामुळे मी पक्षप्रवेश करत आहे. एखाद्याला पक्षात घेताना खूप अडचणी तयार होतात. तुम्ही मला सामावून घेतले असंही पुढे संजय जगताप यांनी म्हटलं आहे.

पंचायत समिती, जिल्हा परिषद, पुणे महानगरपालिका या ठिकाणी आपल्या कुठल्याही पैलवानाची पाठ मातीला लागणार नाही असा विश्वास देतो. येणाऱ्या काळात आम्ही भाजपाचा प्रचार आणि प्रसार करू. जी जबाबदारी द्याल, ती जबाबदारी तळमळीने शेवटपर्यंत पार पाडण्याचं काम करेन. परंतु येणाऱ्या काळामध्ये मला माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी पुरंदर हवेलीच्या जनतेला आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक परिवाराला सांगायचे कुठल्याही अन्यायाला त्या ठिकाणी ठोसपणे आणि ताकतीने त्या ठिकाणी आपण उभं राहण्याचे काम संजय जगताप प्रत्येक भारतीय जनता पक्षाच्या परिवाराच्या मागे राहील प्रत्येक शेतकऱ्याच्या मागे राहील, विकासाच्या बाबतीत कोणालाही राजकारण करून देणार नाही. मागच्या दोन वर्षात साडीने आमच्या पुरंदरला गुंडाळून टाकले असं म्हणत नाव न घेता विजय शिवतारे यांना संजय जगतापांनी टोला लगावला आहे.

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : स्टेट बँक ऑफ इंडिया ते कॅनरा बँक, 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता
स्टेट बँक ऑफ इंडिया ते कॅनरा बँक, 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता
Maharashtra Live Updates: वसईत हार्पिक–डेटॉलसह नामांकित कंपन्यांचा बनावट माल मोठ्याप्रमाणावर जप्त
Maharashtra Live Updates: वसईत हार्पिक–डेटॉलसह नामांकित कंपन्यांचा बनावट माल मोठ्याप्रमाणावर जप्त
Santosh Bangar : निवडणूक आयोगानं संतोष बांगर यांची आमदारकी रद्द करावी, ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाची मागणी
निवडणूक आयोग जिवंत असेल तर आमदार संतोष बांगर यांच्यावर कारवाई करेल, ठाकरेंची शिवसेना आक्रमक
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2025 | मंगळवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Santosh Banger Hingoli : बांगरांचा कारनामा, बातमीनंतर गुन्हा Special Report
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : चांदा ते बांदा; जिल्ह्यात कुठे कुठे राडा? Special Report
Maharashtra Local Body Election Result :निवडणुकांच्या निकालाचा नवा' कायदेशीर मुहूर्त' Special Report
Zero Hour Full : आधी निवडणुका, आता निकालही पुढे ढकललं, राजकीय आरोप-प्रत्यारोप
Nagar Panchayat Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : स्टेट बँक ऑफ इंडिया ते कॅनरा बँक, 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता
स्टेट बँक ऑफ इंडिया ते कॅनरा बँक, 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता
Maharashtra Live Updates: वसईत हार्पिक–डेटॉलसह नामांकित कंपन्यांचा बनावट माल मोठ्याप्रमाणावर जप्त
Maharashtra Live Updates: वसईत हार्पिक–डेटॉलसह नामांकित कंपन्यांचा बनावट माल मोठ्याप्रमाणावर जप्त
Santosh Bangar : निवडणूक आयोगानं संतोष बांगर यांची आमदारकी रद्द करावी, ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाची मागणी
निवडणूक आयोग जिवंत असेल तर आमदार संतोष बांगर यांच्यावर कारवाई करेल, ठाकरेंची शिवसेना आक्रमक
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2025 | मंगळवार
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, राज्यसभेत पेन्शनवर प्रश्न, केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, राज्यसभेत पेन्शनवर प्रश्न, केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
Nashik Nagarparishad Election: नाशिक जिल्ह्यात मतदानादरम्यान जोरदार राडा; मनमाडमध्ये भाजप, शिंदे गटाचे समर्थक भिडले, त्र्यंबकमध्ये पोलीस अन् उमेदवार प्रतिनिधींची बाचाबाची
नाशिक जिल्ह्यात मतदानादरम्यान जोरदार राडा; मनमाडमध्ये भाजप, शिंदे गटाचे समर्थक भिडले, त्र्यंबकमध्ये पोलीस अन् उमेदवार प्रतिनिधींची बाचाबाची
Nilesh Rane: निवडणूक आयोगाला देखील कोर्टात खेचणार, अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर निलेश राणेंचा मोठा निर्णय; म्हणाले,  'ज्यांचा हातभार असेल त्यांच्यावर मी...'
निवडणूक आयोगाला देखील कोर्टात खेचणार, अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर निलेश राणेंचा मोठा निर्णय; म्हणाले, 'ज्यांचा हातभार असेल त्यांच्यावर मी...'
Hardik Pandya :  हार्दिक पांड्याकडून व्याजासह परतफेड, 7 चौकार, 4 षटकारांसह नाबाद 77 धावा,  बडोद्याचा पंजाबवर दणदणीत विजय
हार्दिक पांड्याकडून व्याजासह परतफेड, 7 चौकार, 4 षटकारांसह नाबाद 77 धावा,  बडोद्याचा पंजाबवर दणदणीत विजय
Embed widget