पुणे : पुण्यातील कथित ड्रग्ज पार्टी प्रकरणी प्रांजल खेवलकर (Pranjal Khewalkar) यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. प्रांजल खेवलकर हे रक्षा खडसे यांचे पती आणि एकनात खडसे यांचे जावई आहेत. दीड महिन्यांपेक्षा अधिक वेळ प्रांजल खेवलकर तुरुंगात होते. त्यामुळं त्यांना मिळालेला जामीन मोठा दिलासा आहे. खेवलकर यांच्यासह इतर आरोपींना देखील जामीन मंजूर झाला आहे.
प्रांजल खेवलकर यांच्यासह इतरांना जामीन (Pranjal Khewalkar get Bail)
पुण्यातील खराडी भागातील एका पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला होता. त्या पार्टीत अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले होते. त्या पार्टीत काही महिला देखील होत्या. गंभीर मुद्दा हा अंमली पदार्थांचा होता. अंमली पदार्थाचं सेवन प्रांजल खेवलकर यांनी केलं हा कळीचा मुद्दा होता. त्याच मुद्यावर आजचा जामीन त्यांना मिळालेला आहे. दीड महिन्यांहून अधिक काळ तुरुंगात राहिल्यानंतर पुणे सत्र न्यायालयानं त्यांना जामीन मंजूर केला आहे. उद्या त्यांची येरवडा कारागृहातून सुटका होईल, अशी अपेक्षा आहे.
पुण्यातील खराडी भागात सुरु असलेल्या एका खोलीतील पार्टीवर पोलिसांनी 27 जुलै रोजी छापा टाकला होता. त्या कारवाईदरम्यान प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर प्रांजल खेवलकरांसह इतर आरोपींना पुणे सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. प्रांजल खेवलकर सहभागी असलेल्या पुण्यातील पार्टीत अंमली पदार्थ सापडल्याने त्यांना अटक करण्यात आली होती.
पुणे पोलिसांनी 27 जुलै रोजी छापा टाकून प्रांजल खेवलकर आणि इतर सात जणांना अटक केली होती. पोलिसांनी खराडीतील त्या खोलीत 25 जुलै रोजी देखील पार्टी झाल्याचा दावा केला होता.
प्रांजल खेवलकर हे एकनाथ खडसे यांचे जावई आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती असल्यानं या प्रकरणाची राज्यभरात चर्चा झाली होती. त्यानंतर प्रांजल खेवलकर यांच्या संदर्भात बीडच्या एका स्वयंसेवी संस्थेच्यावतीनं राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रांजल खेवलकर यांच्यावर आरोप केले होते.
दरम्यान, पुणे सत्र न्यायालयानं प्रांजल खेवलकरांसह इतरांना जामीन मंजूर केला आहे. हा प्रांजल खेवलकरांना मोठा दिलासा आहे. आता सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रांजल खेवलकर यांची जामीनावर उद्या सुटका होऊ शकते.