पुणे: विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं होतं. त्यानंतर महाविकास आघाडीने इव्हीएम मशीनमध्ये घोटाळा असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर राज्यातील अनेक ठिकाणी मविआच्या पराभूत उमेदवारांनी फेर मतमोजणी घेण्याची मागणी केली होती. यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे आमदार जास्त होते. त्यात माळशिरस विधानसभा मतदारसंघात विजय मिळवलेले आमदार उत्तम जानकर यांनी मरकडवाडी गावात आपल्याला लोकांनी मतदान केलं पण ईव्हीएममुळे ते आपल्यापर्यंत पोहचलं नसल्याचा आरोप केला होता. त्यानंतर या विषयामुळे वातावरण तापलं होतं, त्यानंतर आज अनेक पराभूत उमेदवारांनी फेर मतमोजणीची मागणी केली होती. आज (25 जुलै) पुण्यातील खडकवासला मतदारसंघात फेरमतमोजणी सुरू आहे.

त्याचबरोबर खडकवासला विधानसभा मतदार संघाच्या ईव्हीएम पडताळणीला सकाळी 11 वाजण्याच्या सुरवात झाली होती.राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सचिन दोडके यांनी आक्षेप घेतला होता. खडकवासला मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार भीमराव तापकीर 1 लाख 61 हजार मते घेऊन विजयी झाले होते तर सचिन दोडके यांना 1 लाख 10 हजार मते मिळाली होती. मतमोजणी दरम्यान 2 ईव्हीएम (evm) मशीन द्वारे झालेल्या मोजणीवर आक्षेप घेतला होता. 

व्हीएम पडताळणी थांबवली, सचिन दोडकेंचा व्हीव्हीपॅटमधील स्लिप मोजण्याचा आग्रह

खडकवासला विधानसभा निवडणुकीवेळी वापरण्यात आलेल्या दोन ईव्हीएम मशीनची पडताळणी थांबवण्यात आलेली आहे. शरद पवार गटाचे उमेदवार सचिन दोडकेंनी पडताळणीच्या प्रक्रियेवर आक्षेप घेतला आहे. नोव्हेंबर 2024ला झालेल्या मतदानावेळचं मतदान आणि व्हीव्हीपॅट स्लिप अशी पडताळणी करावी आणि यासाठीच आम्ही पैसे भरलेत. मात्र प्रत्यक्षात आज दोन ईव्हीएम मशीनमध्ये 1400 मतं नोंदवली जातायेत, ती मतं आणि व्हीव्हीपॅट स्लीपची पडताळणी राज्य निवडणूक आयोगाकडून केली जाणार आहे. म्हणूनच दोडकेंनी आक्षेप नोंदवले आहेत, त्यामुळं पडताळणी थांबलेली आहे. 

दोडकेंनी घेतलेल्या आक्षेपांवर निवडणूक निर्णय अधिकारी निरुत्तर

विधानसभांचा निकाल नोव्हेंबर 2024मध्ये लागला, तेंव्हापासून ईव्हीएम मशीनवर पराभूत उमेदवारी प्रश्न उपस्थित केलेत. याचं प्रश्नाची उत्तरं शोधण्यासाठी आज खडकवासला विधानसभेतील दोन ईव्हीएम मशीनची पडताळणी केली जातीये. मात्र या पडताळणीवर शरद पवार गटाचे खडकवासला विधानसभेचे पराभूत उमेदवार सचिन दोडकेंनी आक्षेप नोंदवलेत, त्यामुळं बराच वेळ पडताळणी थांबवण्यात आली. दोडकेंनी घेतलेल्या आक्षेपांवर निवडणूक निर्णय अधिकारी निरुत्तर झालेत. ईव्हीएम मशीनमधील मतदानाची आकडेवारी आणि व्हीव्हीपॅटमधील स्लिपची खातरजमा करावी, अशी मागणी दोडकेंनी केली होती. दोडकेंप्रमाणे अनेक उमेदवारांनी ईव्हीएम हॅक झाल्याची शंका उपस्थित केली होती. मात्र राज्य निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीनमधील आकडेवारीची पडताळणी करु, अशी भूमिका घेतल्यानं पराभूत उमेदवारांनी याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. दोडकेंनी मात्र न्यायालयात याचिका दाखल केली नसल्यानं त्यांच्या मतदारसंघातील ईव्हीएमची पडताळणी केली जाती आहे. पण नोव्हेंबर 2024च्या मतदानावेळी दोन ईव्हीएम मशीनमध्ये पडलेल्या मतांची आकडेवारी दाखवली जाईल आणि मग मशील रिसीट करण्यात येईल, मात्र व्हीव्हीपॅट स्लीपची पडताळणी मात्र केली जाणार नाही. त्यामुळंच दोडकेंनी हा आक्षेप नोंदवत , पडताळणी प्रक्रियेवर बहिष्कार घालण्याची तयारी दर्शवली आहे. या आक्षेपानंतर राज्य निवडणूक आयोग निरुत्तर झालंय. आयोगाच्या नियमानुसार आम्ही आज या दोन ईव्हीएम मशीनमध्ये 1400 मते नोंदवू, त्यानंतर उमेदवारांना झालेलं मतदान व्हीव्हीपॅट स्लीपची पडताळणी करु. असं स्पष्टीकरण आयोगाने दिलंय. विधानसभा निकालावेळी पाच ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट स्लिपची खातरजमा केल्याचं कारण निवडणूक आयोगाने पुढं केलं. मग तीच पडताळणी करण्यासाठी आज या दोन ईव्हीएम मधील तेंव्हाची आकडेवारी आणि व्हीव्हीपॅटमधील स्लिपची खातरजमा का केली जात नाही? याचं उत्तर देणं निवडणूक आयोगाने टाळलं आहे.