एक्स्प्लोर

Pune News: देवघरातील पेटत्या दिव्यामुळे गॅसचा भडका अन् सिलिंडरचा स्फोट, आयटी इंजिनिअरसह वृद्ध आई-वडिलांचा मृत्यू; पुण्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना

Pune News: घरात गॅस सिलिंडर जोडत असताना रेग्युलेटरमधून झालेल्या गॅस गळतीमुळे भीषण स्फोट झाल्याने वृद्ध आई-वडील आणि त्यांच्या तरुण मुलाचा होरपळून मृत्यू झाला आहे.

Pune News: पुण्यातील खराडी (Kharadi) परिसरातील खांदवेनगर येथील फॉर्च्युन सिटी (Fortune City) परिसरात एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. घरात गॅस सिलिंडर जोडत असताना रेग्युलेटरमधून झालेल्या गॅस गळतीमुळे (Gas Leakage) भीषण स्फोट झाला. या दुर्दैवी घटनेत घरातील वृद्ध आई-वडील आणि त्यांच्या तरुण मुलाचा होरपळून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत सून आणि अवघ्या 6 वर्षांची नात किरकोळ जखमी झाल्या असून, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Pune News: एकाच कुटुंबातील तिघांवर काळाचा घाला

विष्णू मुंजाजी गित्ते (वय 80), वृंदाविनी विष्णू गित्ते (वय 60) आणि पांडुरंग विष्णू गित्ते (वय 35, सर्व रा. खांदवेनगर, खराडी) अशी या भीषण स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. पांडुरंग गित्ते हे एका नामांकित आयटी कंपनीत अभियंता (IT Engineer) म्हणून कार्यरत होते. या घटनेत पांडुरंग यांची पत्नी राजश्री (वय 32) आणि मुलगी निहारिका (वय 6) या दोघी किरकोळ जखमी (Injured) झाल्या आहेत.

Pune News: गॅस गळतीनंतर रेग्युलेटरमधून भडका

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी स्वयंपाकघरातील गॅस सिलिंडर संपल्याने वृंदाविनी गित्ते या नवीन भरलेला सिलिंडर जोडत होत्या. त्यावेळी अचानक रेग्युलेटरमधून मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरू झाली. गॅस गळती होत असल्याचे लक्षात येताच पांडुरंग आणि विष्णू गित्ते हे देखील त्यांच्या मदतीला स्वयंपाकघरात धावले. मात्र, काही क्षणांतच तेथे गॅसचा भीषण स्फोट झाला आणि त्यात तिघेही गंभीररीत्या भाजले.

Pune News: आधी मुलगा, मग वडील, अखेर आईचाही मृत्यू

स्फोटाचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि अग्निशमन दल व पोलिसांना पाचारण केले. गंभीर जखमी झालेल्या तिघांनाही तातडीने ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना दुपारी 12 च्या सुमारास आधी मुलगा पांडुरंग गित्ते यांचा मृत्यू झाला. त्यानंतर दुपारी 3 वाजता वडील विष्णू गित्ते आणि सायंकाळी 5:30 वाजता आई वृंदाविनी गित्ते यांनीही उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. एकाच घरातील तिघांचा असा करुण अंत झाल्याने संपूर्ण खराडी परिसरात शोककळा पसरली आहे.

Pune News: देवघरातील पेटत्या दिव्याने घात केला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गॅस गळती झाल्याचे लक्षात येताच गित्ते कुटुंबीयांनी घर आणि कुटुंब वाचवण्यासाठी सिलिंडर सुरक्षित ठिकाणी नेण्याचा प्रयत्न केला. सिलिंडर गॅलरीतून (Gallery) बाहेर फेकून देण्याच्या उद्देशाने त्यांनी तो स्वयंपाकघरातून उचलून हॉलमध्ये आणला होता. मात्र, त्याच वेळी हॉलमधील देवघरात दिवा पेटता होता. तोपर्यंत संपूर्ण घरात एलपीजी गॅस पसरल्याने देवघरातील दिव्याच्या ज्योतीचा संपर्क येताच गॅसने पेट घेतला आणि सिलिंडरचा भीषण स्फोट झाला.

Pune News: बाथरूममध्ये असल्याने सून आणि नात थोडक्यात बचावल्या

या दुर्घटनेतून सुदैवाने बचावलेल्या राजश्री गित्ते यांचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. घटनेच्या वेळी राजश्री या बाथरूममध्ये अंघोळ करत होत्या. स्वयंपाकघरातून अचानक आरडाओरडा ऐकू आल्याने त्यांनी दरवाजा उघडून पाहिले, तेव्हा गॅस गळती झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. मात्र, त्या बाहेर येण्यापूर्वीच हॉलमध्ये भीषण स्फोट झाला, ज्यामुळे त्या आणि त्यांची मुलगी थोडक्यात बचावल्या.

Pune News: घराचे अतोनात नुकसान

या भीषण स्फोटामुळे गित्ते यांच्या घराचे प्रचंड नुकसान झाले आहे. घरातील किचन, स्वच्छतागृह, शौचालय, हॉलमधील गीझर, खिडक्या, दारे आणि सर्व फर्निचर जळून खाक झाले आहे. आगीच्या तीव्रतेमुळे घरातील जमिनीवरील फरशा उखडल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशामक दलाच्या पथकाने शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने सुरुवातीला बचावकार्यात काही अडथळे आले होते. 

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Cockroach Janta Party Abhijeet Dipke: मोठी बातमी: कॉक्रोच जनता पार्टीच्या जंतरमंतरवरील आंदोलनाला पोलिसांची परवानगी, अभिजीत दिपकेंनी भारतात पाऊल ठेवताच मोठं यश

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Drug Racket : पुण्यात जप्त केलेल्या 6 कोटींच्या ड्रग्स रॅकेटचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; नायजेरियातली बेनी मुख्य सूत्रधार, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
पुण्यात जप्त केलेल्या 6 कोटींच्या ड्रग्स रॅकेटचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; नायजेरियातली बेनी मुख्य सूत्रधार, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
Ketan Agrawal Pune Lohagad Case Siya Goyal: सिया बाहेर आली, पुढे तेच हॉटेल, त्याच रुममध्ये दुसरी मैत्रीण गेली; चेतनचे हॉटेलमधील कांड समोर, केतन अग्रवाल प्रकरणात सगळ्यात मोठी माहिती
सिया बाहेर आली, पुढे तेच हॉटेल, त्याच रुममध्ये दुसरी मैत्रीण गेली; चेतनचे हॉटेलमधील कांड समोर, केतन अग्रवाल प्रकरणात सगळ्यात मोठी माहिती
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा डॉक्टर, त्यांच्याशी ओळख, काम असल्यास करुन देऊ, व्हाटस ॲप ग्रुपवर मेसेज टाकणं पुण्यातील डॉक्टरला भोवलं, गुन्हा दाखल
तुकाराम मुंढेंचा डॉक्टर, काम असल्यास करुन देऊ, व्हाटस ॲप ग्रुपवर मेसेज टाकणाऱ्या डॉक्टरवर गुन्हा
Khalil Shaikh Ravindra Dhangekar : खलिल शेख आत्महत्या प्रकरणात रविंद्र धंगेकर अडचणीत, 10 जणांवर गुन्हा दाखल, अटकेची शक्यता 
खलिल शेख आत्महत्या प्रकरणात रविंद्र धंगेकर अडचणीत, 10 जणांवर गुन्हा दाखल, अटकेची शक्यता 
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मांतर केल्यानंतरही अनुसूचित जमातीचे लाभ; सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत, तब्बल 27 जणांची जम्बो समिती नेमली
ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मांतर केल्यानंतरही अनुसूचित जमातीचे लाभ; सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत, तब्बल 27 जणांची जम्बो समिती नेमली
Iran War Live Update: अमेरिकेचा सलग सहाव्या दिवशी इराणवर हवाई हल्ला सुरुच, भारताची कोट्यवधी डाॅलरची गुंतवणूक असलेल्या चाबहार पोर्टवर सुद्धा तिसऱ्यांदा हल्ला
अमेरिकेचा सलग सहाव्या दिवशी इराणवर हवाई हल्ला सुरुच, भारताची कोट्यवधी डाॅलरची गुंतवणूक असलेल्या चाबहार पोर्टवर सुद्धा तिसऱ्यांदा हल्ला
20 लाखाच्या कारमध्ये E20 पेट्रोल अन् इंजिन बंद पडलं! आता, न्यायालयाचा ग्राहकाच्या बाजूने तगडा निर्णय; कंपनीला जबर दणका, काय आहे संपूर्ण प्रकरण?
20 लाखाच्या कारमध्ये E20 पेट्रोल अन् इंजिन बंद पडलं! आता, न्यायालयाचा ग्राहकाच्या बाजूने तगडा निर्णय; कंपनीला जबर दणका, काय आहे संपूर्ण प्रकरण?
Sunil Tatkare: जयंत पाटलांना अर्थखातं मिळण्याची चर्चा, एकनाथ शिंदे- जयंत पाटील भेटीवर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
जयंत पाटलांना अर्थखातं मिळण्याची चर्चा, एकनाथ शिंदे- जयंत पाटील भेटीवर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Tukaram Mundhe FDA Action Parsi Dairy Farm Mumbai News: तुकाराम मुंढेंची मुंबईतील 110 वर्षे जुन्या पारसी डेअरी फार्मवर कारवाई, परवानाच रद्द करुन टाकला, FDA ला धाड टाकताच काय काय दिसलं?
तुकाराम मुंढेंची मुंबईतील 110 वर्षे जुन्या पारसी डेअरी फार्मवर कारवाई, परवानाच रद्द करुन टाकला, FDA ला धाड टाकताच काय काय दिसलं?
Chhatrapati Sambhajinagar Crime: पैशांच्या वादातून सुखी संसाराचा क्रूर शेवट; निष्पाप 14 महिन्यांच्या बालकासह विवाहितेचा घेतला बळी; छत्रपती संभाजीनगरच वाळूज हादरलं!
पैशांच्या वादातून सुखी संसाराचा क्रूर शेवट; निष्पाप 14 महिन्यांच्या बालकासह विवाहितेचा बळी घेतला; छत्रपती संभाजीनगरच वाळूज हादरलं!
Crime news: छत्रपती संभाजीनगरमधील पोलीस अधिकाऱ्याने महिलेसोबत नको ते केलं; शारीरिक जवळीक, ब्लॅकमेलिंगचा आरोप, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमधील पोलीस अधिकाऱ्याने महिलेसोबत नको ते केलं; शारीरिक जवळीक, ब्लॅकमेलिंगचा आरोप, नेमकं काय घडलं?
Deool Band Fame Actress Celebrated Birthday At Cremation: 'माझा बर्थडे मी स्मशानभूमीत सेलिब्रेट केलेला...'; 'देऊळ बंद' फेम अभिनेत्रीच्या वाढदिवसाचा 'तो' किस्सा
'माझा बर्थडे मी स्मशानभूमीत सेलिब्रेट केलेला...'; 'देऊळ बंद' फेम अभिनेत्रीच्या वाढदिवसाचा 'तो' किस्सा
Embed widget