एक्स्प्लोर

Pune News: 29 वर्षांची एक पोरगी म्या गमावली, आंदोलन करुन बसले काहीही झालं नाही; दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर आईचा टाहो

Pune News: काल वेदनेनं तडफडत असलेल्या त्या महिला रूग्णाची जबाबदारी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने का घेतली नाही. त्यावेळी त्यांची संवेदनशीलता कुठे गेली होती, असंही यावेळी या महिलांनी म्हटलं आहे.

पुणे: पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Dinanath Mangeshkar Hospital) प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे.. प्रसूतीचा त्रास होत असणाऱ्या तनिषा भिसे यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Dinanath Mangeshkar Hospital)  दाखल करण्यासाठी आणण्यात आले होते. मात्र उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाने रुग्णाला दहा लाख रुपयांची मागणी केली. इतके पैसे अचानक कसे आणायचे असा प्रश्न गर्भवती महिलेच्या कुटुंबीयांना पडला. अखेर अडीच लाख भरायला तयार असतानाही रुग्णालय प्रशासनाने गर्भवती महिलेला प्रसुतीसाठी दाखल करून घेतलं नाही. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने पैशांच्या हव्यासापोटी उपचारात अडवणूक केल्याने एका महिलेला आपला जीव गमावावा लागला. या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे. या रूग्णालयाच्या समोर आंदोलन केलं जात आहे. (Dinanath Mangeshkar Hospital) 

 दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलसमोर जमलेल्या आणि संतापलेल्या नागरिकांनी रूग्णालयाच्या अधिकाऱ्यांवर चिल्लर फेकली त्याचबरोबर त्यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकवेळ पैसे कमावता येतात पण गेलेला माणून परत मिळवता येतो का? असा सवाल रूग्णालयासमोर जमलेल्या संतप्त नागरिकांनी केला आहे. त्यावेळी आणखी एका महिला म्हणाली मी पण माझी एक मुलगी गमावली मुंबईमध्ये 29 वर्षांची एक पोरगी मी गमावली आहे. सगळं काही करून बसले, आंदोलन केलं. कही झालेलं नाही. मी आज माझ्या पोरीचं बारकं पोरगं संभाळते. मला माहिती आहे काय वेदना होतात. लक्षात घ्या, ही अंधाधुदी बंद करा आणि गरीबांचा वाली व्हा असंही यावेळी एका संतप्त महिलेनं म्हटलं आहे. काल वेदनेनं तडफडत असलेल्या त्या महिला रूग्णाची जबाबदारी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने का घेतली नाही. त्यावेळी त्यांची संवेदनशीलता कुठे गेली होती, असंही यावेळी या महिलांनी म्हटलं आहे. 
 
दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या बाहेर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून आंदोलन केलं जात आहे. यावेळी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या पाटीवरती काळं लावलं गेलं. संतप्त झालेल्या आंदोलकांनी रूग्णालयाच्या अधिकाऱ्यांवर चिल्लर देखील फेकल्याचं दिसून आलं. 

आठ वर्षांपूर्वी तनिषा-सुशांतचा विवाह

सुशांत भिसे आणि तनिषा भिसे यांचा प्रेमविवाह आठ वर्षांपुर्वी झाला होता. दोघेही कर्वेनगरमध्ये राहत होते. दोघांची ओळख मित्र- मैत्रिणींच्या माध्यमातून झाली. या दोघांचा आठ वर्षांपासून प्रेमाचा संसार फुलला होता. तनिषा या पूर्वी शिक्षिका म्हणून देखील काम करत होत्या. मात्र, लग्नानंतर काही वर्षांनी त्यांनी काम सोडून दिलं. यादरम्यान, सुशांत यांना प्रशासकीय विभागामध्ये नोकरी लागली. प्रशासकीय विभागामध्ये नोकरी मिळाल्यानंतर अगदी योग्यरितीने त्यांच्या सुखी संसार सुरू होता. दरम्यान, सुशांत भिसे यांनी अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये देखील सक्रियपणे सहभाग घेतला. परिसरातील रुग्णांच्या सेवेसाठी सुशांत यांना आरोग्यदूत हा पुरस्कार देखील मिळालेला आहे. या सुखी संसांरात तब्बल आठ वर्षांनी गुड न्यूज आली. पण नियतीच्या आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने पैशांच्या हव्यासापोटी हे सुख मात्र तनिषा-सुशांतला लाभलं नाही. 

आठ वर्षांनी घरात पाळणा हलणार होता

तब्बल आठ वर्षानंतर पहिल्यांदाच त्यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार होतं. आठ वर्षांनी त्यांच्या आयुष्यात आई-बाबा म्हणणारे आणि घरभर फिरणारी चिमुकली पावलं येणार होती. दोघेही खूप खुश होते. अशातच तनिषा या एक नाही तर दोन बाळांना जन्म देणार होत्या, त्यामुळे त्यांचा आनंद देखील मोठा होता पण त्या आनंदावर असं विरजण पडलं. 

नेमकं काय घडलं? 

पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे.. प्रसूतीचा त्रास होत असणाऱ्या तनिषा भिसे यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणण्यात आले होते. मात्र उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाने रुग्णाला दहा लाख रुपयांची मागणी केली. इतके पैसे अचानक कसे आणायचे असा प्रश्न गर्भवती महिलेच्या कुटुंबीयांना पडला. अखेर अडीच लाख भरायला तयार असतानाही रुग्णालय प्रशासनाने गर्भवती महिलेला प्रसुतीसाठी दाखल करून घेतलं नाही. परिणामी तिला इतर रुग्णालयात हलवण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला. दुसऱ्या रुग्णालयात हलवत असताना महिलेला त्रास झाला. या महिलेचे पती सुशांत भिसे हे भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक आहेत. रुग्णालयात पत्नीला दाखल करून घेत नाहीत म्हणल्यावर दीनानाथ रुग्णालयाला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून रामेश्वर नाईक यांनी फोन केला. तरीही रुग्णालय प्रशासनाने त्यांचं ऐकलं नाही. परिणामी गर्भवती महिलेने दोन गोंडस जुळ्या मुलांना जन्म दिला मात्र महिलेचा जीव गमावला. या घटनेबाबत आमदार अमित गोरखे यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रारही केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Pune Moshi Building Collapse: अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
Maharashtra Live News Updates: 64 तासांनंतरही मोशी दुर्घटनेचं शोधकार्य सुरू, अत्याधुनिक कटरद्वारे पाडकाम
Maharashtra Live News Updates: 64 तासांनंतरही मोशी दुर्घटनेचं शोधकार्य सुरू, अत्याधुनिक कटरद्वारे पाडकाम
Monsoon Update : भरमसाठ कोसळल्यानंतर राज्यावर मान्सून पुन्हा रुसला, अरबी समुद्र अन् उत्तर भारतात कमी दाबाचा पट्टा; ढगांची दाटी विरळ, राज्यावर पुन्हा नवं संकट? वाचा सविस्तर
भरमसाठ कोसळल्यानंतर राज्यावर मान्सून पुन्हा रुसला, अरबी समुद्र अन् उत्तर भारतात कमी दाबाचा पट्टा; ढगांची दाटी विरळ, राज्यावर पुन्हा नवं संकट? वाचा सविस्तर
Pune Moshi Building Collapse: पायावर मोठा स्लॅब, पत्नीला मेसेज, शेवटचा सेल्फी अन् मित्रांना वाचवण्याची धडपड, मोशी दुर्घटनेतील थक्क करणारा थरार!
पायावर मोठा स्लॅब, पत्नीला मेसेज, शेवटचा सेल्फी अन् मित्रांना वाचवण्याची धडपड, मोशी दुर्घटनेतील थक्क करणारा थरार!

व्हिडीओ

Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
Pune Moshi Building Collapse: अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
Jalna Crime News: बस अडवून तरुणीला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न; जाब विचारताच चालकाला तरुणाकडून बेदम मारहाण, जालन्यातील संतापजनक घटना
बस अडवून तरुणीला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न; जाब विचारताच चालकाला तरुणाकडून बेदम मारहाण, जालन्यातील संतापजनक घटना
नोव्हाक जोकोविचचे 25व्यांदा ग्रँडस्लॅम जिंकण्याचं स्वप्न भंगलं; सेमीफायनलमध्ये 15 वर्षांनी लहान असणाऱ्या सिनरने बाजी मारली
नोव्हाक जोकोविचचे 25व्यांदा ग्रँडस्लॅम जिंकण्याचं स्वप्न भंगलं; सेमीफायनलमध्ये 15 वर्षांनी लहान असणाऱ्या सिनरने बाजी मारली
Panvel Crime News : ग्राहक बनून हॉटेलमध्ये गेले; व्यवहार ठरवला पैसे अन्...; पनवेलमधील नामांकित हॉटेलमध्ये हाय-प्रोफाइल देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश; 6 महिलांची सुटका
ग्राहक बनून हॉटेलमध्ये गेले; व्यवहार ठरवला पैसे अन्...; पनवेलमधील नामांकित हॉटेलमध्ये हाय-प्रोफाइल देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश; 6 महिलांची सुटका
Embed widget