पुणे: जलतरण सरावादरम्यान राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (NDA) विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. एनडीएमध्ये शिकत असलेल्या १८ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यूने एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (NDA) विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. काल (गुरूवारी, ता,२३) संध्याकाळी जलतरण सरावादरम्यान ही घटना घडली आहे. आदित्य डी. यादव (वय १८ वर्षे) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. एनडीएच्या जनसंपर्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार,काल (गुरूवारी, ता,२३) संध्याकाळी ५ वाजता, कमकुवत जलतरणपटूंसाठी आयोजित जलतरण सरावादरम्यान हा प्रकार घडला. प्रशिक्षकांच्या देखरेखीखाली प्रशिक्षणार्थी तलावाच्या रुंदीवर पोहत होते. त्या दरम्यान कॅडेट आदित्य डी. यादव पाण्याच्या खाली अचानक बेशुद्ध अवस्थेत दिसून आला.

Continues below advertisement

National Defence Academy : लाईफगार्ड यांनी तत्काळ पाण्यात उडी मारून त्याला बाहेर काढले

आदित्य बेशुद्ध असल्याचं पाहताच, दोन लाईफगार्ड यांनी तत्काळ पाण्यात उडी मारून त्याला बाहेर काढले, त्याला त्वरित सीपीआर आणि प्राथमिक वैद्यकीय उपचार दिले गेले, तसेच पुढील उपचारासाठी एम.एच. खडकवासला येथे हलवण्यात आले. दुर्दैवाने, कॅडेटला वाचवता आले नाही. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आले असून चौकशीचे आदेश सुद्धा देण्यात आले आहेत.

दरम्यान पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (NDA) पोहण्याचा सराव करत असताना या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे. मृत विद्यार्थ्याचे नाव आदित्य यादव असे आहे. 23 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. विशेष म्हणजे, गेल्या दोन आठवड्यांतील एनडीएमध्ये विद्यार्थ्याच्या मृत्यूची ही दुसरी घटना आहे. एनडीएने दिलेल्या माहितीनुसार, ज्या विद्यार्थ्यांना पोहण्यासाठी अधिक प्रशिक्षणाची गरज होती, त्यांचा सराव प्रशिक्षकांच्या देखरेखीखाली सुरू होता.

Continues below advertisement

National Defence Academy : खोलीत बेडशीटच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या

काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) या प्रतिष्ठित संस्थेत एका विद्यार्थ्याने आत्महत्या (Pune Crime News) केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. अंतरीक्ष कुमार (वय १८) असे आत्महत्या  (Pune Crime News) केलेल्या विद्यार्थ्याचे नाव होतं, तो मूळचा उत्तर प्रदेशातील लखनौ जिल्ह्याचा रहिवासी होता. अंतरीक्ष कुमार हा माजी सैनिकाचा मुलगा होता. त्याचे वडील भारतीय सैन्यात सेवेत होते. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत देशसेवेचे स्वप्न घेऊन अंतरीक्षने जुलै महिन्यात पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये  (Pune Crime News) प्रवेश घेतला होता. तो सध्या पहिल्या सत्रात शिक्षण घेत होता. (Pune Crime News) 

पहाटेच्या सुमारास अंतरीक्षने आपल्या वसतिगृहातील खोलीत बेडशीटच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यानंतर आता ही आठवड्याभरात दुसरी घटना घडली आहे, या घटनेचा तपास सुरू आहे.