पुणे: पुण्यात एका पीएमपीएल बस (Pune PMPML Bus News) चालकाने काही नागरिकांवर अरेरावी करत धमकावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. किरकोळ कारणावरून पीएमपीएल (Pune PMPML Bus News) बस चालक आणि काही स्थानिकांमध्ये वादावादी झाली. पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात एका पीएमपीएल बस आणि दुचाकीस्वार यांच्यात कट मारल्याने वाद सुरू झाले. यात नागरिकांनी पीएमपीएल बस चालकावर आरोप करत चुकीच्या पद्धतीने बस चालवणाऱ्या या चालकाला जाब विचारला. काही जणं थेट बसमध्ये शिरले आणि त्यांनी या चालकाला (Pune PMPML Bus News) चांगलेच खडसावले. रागाने लाल झालेल्या पीएमपीएल बस चालकाने "माझं डोकं गरम करू नका, जा तुला कोणाला जायचं ते सांग, माझा भाऊ पोलिस खात्यात आहे असा मुजोरपणा दाखवला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.(Pune PMPML Bus News) 

Continues below advertisement

Pune News: व्हिडीओमध्ये नेमकं काय?

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक महिला त्या पीएमपीएल बस चालकाला जाब विचारते, अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला तू, लोकांच्या जीवाशी तू खेळतो का, लोकांना रस्त्यावरची  गाडीने उडवायचा प्रयत्न करतो, आमच्या जीवावर उठतो, आमच्या अंगावर गाडी घालणार का? आम्ही रॉंग साईडला आलो होतो का? मुद्दाम केलं आहे यांनी, दोनदा गाडी अंगावरती घातली,असं हा व्हिडीओ काढणारी महिला म्हणते, त्यावर पीएमपीएल बस माझं डोकं गरम करू नका, जा तुला काय करायचं ते कर जा; तीने गाडी मध्ये घातली, माझा भाऊ पोलिस आहे, जा काय करायचं ते कर जा, असं तो पीएमपीएल बस चालक म्हणतो.

घटनेनंतर स्थानिकांकडून पीएमपीएल प्रशासनावरही निष्काळजीपणाचे आरोप केले जात आहेत. परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे की, अशा प्रकारे वाहन वेगाने व बेफिकिरीने चालवणाऱ्या चालकांवर त्वरित कारवाई न झाल्यास मोठा अपघात घडू शकतो. दरम्यान, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुण्यातील बेशिस्त वाहन चालवण्याच्या आणि अपघाताच्या घटना चर्चेत आल्या आहेत. तसेच, प्रवाशांच्या सुरक्षेला धोका पोचवणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

Continues below advertisement