पुणे : रिक्षा भाडेवाढीनंतर (Pune Auto Rickshaw fare hike) आता पुणेकरांवर नवं संकट ओढवलंय.  आज इंधन दरवाढ  (Petrol Price Hike) झालेली नसली तरी पुण्यात सीएनजी दरात प्रतिकिलोमागे  1 रुपया  80 पैशांची वाढ करण्यात आली. त्यामुळे पुणेकरांना एक किलो सीएनजीसाठी 63.90 रु. मोजावे लागणार आहेत.


पुण्यात सीएनजीच्या किमतीत प्रती किलो 1 रुपये 80 पैशांची वाढ करण्यात आली. त्यामुळे आधीच पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे हैराण झालेल्या सामान्य जनतेला या सिलेंडरच्या किंमती वाढीमुळे धक्का बसला आहे. याचा पुणेकरांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आता पुण्यातील सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांच्या भाड्यातही वाढ होऊ शकते


पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरच्या तुलनेत सीएनजी स्वस्त


सध्या पेट्रोल, डिझेल आणि घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या तुलनेत सीएनजीचे दर स्वस्त आहे. पुण्यात एक लीटर पेट्रोलचा भाव 109.50 रुपये आहे. तर डिझेलचा भाव 92.50रुपये आहे. पेट्रोलच्या तुलनेत सीएनजी  स्वस्त आहे. तर डिझेलच्या तुलनेत देखील सीएनजी स्वस्त आहे. 


पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दररोज वाढत आहेत. महाराष्ट्रात पेट्रोलच्या दरांनी शंभरी पार केली असून डिझेलचे दरही शंभरीच्या दिशेने वाटचाल करत आहेत. त्यामुळे इंधन दरवाढीनंतर सीएनजी दरवाढीनंही सर्वसामान्यांचा खिसा हलका होणार आहे. 


असे असणार रिक्षाचे नवे दर


पहिल्या दिड किलोमीटरसाठी आतापर्यंत अठरा रुपये द्यावे लागत होते.  मात्र आता त्यामध्ये तीन रुपयांची वाढ करण्यात आली असून आता पहिल्या दीड किलोमीटरसाठी एकवीस रुपये मोजावे लागणार आहेत.  पहिल्या दीड किलोमीटर नंतरच्या प्रत्येक किलोमीटरला आतापर्यंत बारा रुपये एकतीस पैसै मोजावे लागत होते. आता त्यामधे एक रुपया 69 पैशांची वाढ करण्यात आली आहे. आता प्रत्येक किलोमीटरसाठी चौदा रुपये मोजावे लागणार आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात रात्री बारा ते पहाटे पाच या कालावधीत 25 टक्के अधिक भाडे रिक्षासाठी मोजावे लागणार आहे. तर जिल्ह्याच्या इतर भागामधे याच कालावधीत रिक्षासाठी चाळीस टक्के अधिक भाडे मोजावे लागणार आहे. येत्या 22 नोव्हेंबरपासून नवे दर रिक्षा प्रवासासाठी लागू होणार आहेत. त्यामुळे नव्या दरांप्रमाणे मीटरचे सेटिंग बदलून घेणे रिक्षाचालकांना बंधनकारक राहणार आहे. जवळपास सहा वर्षानंतर रिक्षा दरवाढ करण्यात आली आहे.  


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



संबंधित बातम्या :


पुणे: रिक्षा दरवाढीचा मीटर फास्ट; प्रवासासाठी मोजावे लागणार 'एवढे' रुपये!


Anand Mahindra : प्लॅस्टिक कचऱ्यापासून बूटाची निर्मिती, आनंद महिंद्रा 23 वर्षीय मुलाची मदत करण्यास तयार


Petrol Price Today : पेट्रोल-डिझेलचे आजचे दर जारी; मुंबईत एक लिटर पेट्रोलचे दर काय?