पुणे : पुण्याचा ऐतिहासिक आणि गौरवशाली गणेशोत्सव केवळ पुणेकरांचा नाही, तर अवघ्या देशाचे आणि जगाचे आकर्षण ठरला आहे. मात्र या पारंपरिक सणाचे रूपांतर अलीकडच्या काळात स्पीकर्सच्या भिंती, डीजे आणि अश्लील गाण्यांच्या गोंगाटात होत असल्याने, याविरोधात समाजातील काही सजग घटकांनी आवाज उठवायला सुरुवात केली आहे. त्यामध्ये ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष पुनीत बालन यांनी आपली ठाम भूमिका मांडली आहे.
पुण्यातल्या गणेशोत्सवा दरम्यान यंदा पुनीत बालन यांच्याकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यातील जे गणपती मंडळ डीजे लावतील त्यांना देणगी न देण्याचा निर्णय पुण्यातील उद्योजक सुनीत बालन यांनी घेतला आणि त्यांच्या या निर्णयाचं सध्या सर्व स्तरावरून स्वागत होताना दिसते आहे. त्यामुळे यंदा डीजे मुक्त गणेशोत्सव होणार असल्याच्या चर्चा देखील रंगत आहेत. जे गणपती मंडळ डीजे लावतील त्यांना आम्ही यंदा देणगी देणार नाही आहोत. दहा दिवसाच्या या गणेशोत्सवात शेवटच्या दिवशी म्हणजेच मिरवणुकीला सर्वात जास्त डीजेचा वापर केला जातो.
देणगी दिलेल्या या सगळ्या मंडळांवर आम्ही काटेकोरपणे नजर ठेवणार आहोत आणि ज्यांनी देणगी घेऊनही डीजे वाजवला तर त्यांना यापुढे कधीही देणगी न देण्याचा निर्णय घेणार आहोत, असं पुनीत बालन यांनी सांगितलं आहे. सोबतच काही संस्थांनी देखील या निर्णयाचा स्वागत केले त्या संस्थांना देखील सोबत घेऊन पोलीस आणि प्रशासनाची चर्चा करून यावर पुन्हा एकदा निर्णय घेणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. गणेशोत्सव हा परंपरेचा आणि सगळ्यांच्या आवडीचा विषय असतो त्यामुळे याला गालबोट लागू नये हाच या मागचा हेतू असल्याचाही त्यांनी सांगितले.
कोण आहेत पुनित बालन?
पुण्यात गणपती बघायला आल्यानंतर गणपती व्यक्तिरिक्त पुनित बालन यांच्या होर्डिंग्स सगळ्यांचं लक्ष वेधतात. पुनीत बालन हे प्रसिद्ध उद्योजक एस. बालन यांचे सुपुत्र आहेत. त्यासोबतच एक भारतीय उद्योजक, चित्रपट निर्माते, क्रिकेटर आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही त्यांची ओळख आहे. आज अनेक क्षेत्रात पुनित बालन यांचं नाव घेतलं जातं.
इंडियन आर्मी सोबत मिळून त्यांनी काश्मीरी विद्यार्थ्यांसाठी दहा शाळा चालवायला घेतल्यात. प्रत्येक महिन्यात ते या सगळ्या शाळांचा आढावा घेत असतात. मागील काही वर्षांपासून त्यांचा आणि पुण्यातील गणेशोत्सवाचा जवळचा संबंध दिसत आहे. हिंदूस्थानातील पहिला गणेशोत्सव अशी ओळख असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे विश्वस्त आणि उत्सवप्रमुख आहेत. 2023 मध्ये कश्मिरमध्ये गणेशोत्सवाची सुरूवात त्यांनी केली आहे.
रसिकलाल माणिकचंद धारीवाल यांचे जावई
पुण्यात पुनित बालन ग्रुपच्या होर्डिंग्स सोबत आणखी एक ऑक्सिरिचचं नाव दिसतं. या दोघांचा काय संबंध असा प्रश्नही अनेकांना पडतो. तर माणिकचंद ग्रुपचे रसिकलाल माणिकचंद धारीवाल यांची मुलगी जान्हवी धारीवाल या पुनित बालन यांच्या पत्नी आहेत. सोबतच त्या माणिकचंद ऑक्सिरिचची सीएमडीही आहेत. त्यामुळे पुनित बालन ग्रुपसोबत ऑक्सिरीचचे होर्डिंग पुण्यात सगळीकडे झळकतात.