एक्स्प्लोर

Pune News: दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल अहवाल साफ खोटा, CCTV चेक करा, CDR काढा; गर्भवती महिलेच्या पतीची आर्जव

Pune News: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने तज्ञांची समिती स्थापन केली आहे. त्याचबरोबर आता त्यांचा अहवालही समोर आला आहे. यामध्ये रूग्णालयाने दिलेल्या अहवालावर भिसे कुटुंबीयांनी आक्षेप घेतला आहे.

पुणे: पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. प्रसूतीचा त्रास होत असणाऱ्या तनिषा भिसे यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणण्यात आले होते. मात्र उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाने रुग्णाला दहा लाख रुपये भरण्यासाठी सांगितले. इतके पैसे अचानक कसे आणायचे असा प्रश्न गर्भवती महिलेच्या कुटुंबीयांना पडला. अखेर अडीच ते तीन लाख भरायला तयार असतानाही रुग्णालय प्रशासनाने गर्भवती महिलेला प्रसुतीसाठी दाखल करून घेतलं नाही, तिच्यावरती उपचार सुरू केले नाहीत. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने पैशांच्या हव्यासापोटी उपचारात अडवणूक केल्याने एका महिलेला आपला जीव गमावावा लागला. या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे. या रूग्णालयाच्या समोर आंदोलन केलं जात आहे. त्याचबरोबर या रूग्णालयाची या घटनेनंतर चौकशी सुरू आहे. अशातच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने तज्ञांची समिती स्थापन केली आहे. त्याचबरोबर आता त्यांचा अहवालही समोर आला आहे. यामध्ये रूग्णालयाने दिलेल्या अहवालावर भिसे कुटुंबीयांनी आक्षेप घेतला आहे. 

भिसे कुटुंबीयांचे मंगेशकर हॉस्पिटलच्या अहवालावर आक्षेप हा अहवाल साफ खोटा आहे. त्यादिवशी आम्ही पैसे देत होतो, तीन ते चार तास आम्ही हॉस्पिटलमध्येच होतो, सीसीटीव्ही चेक करा. आम्ही तीन लाख रुपये भरायला तयार होतो. आमच्याकडे पैसेही होते. 
पैसे घेऊन आम्ही त्या ठिकाणी भरण्यासाठी गेलो होतो. मात्र, पैसे घेतले नाही जोपर्यंत दहा लाख रुपये भरत नाही तोपर्यंत उपचार मिळणार नाही. दीनानाथ मंगेशकर हे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल आहे, म्हणून आम्ही या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेलो होतो. एवढा वेळ वाया घालवला नसता तर आज या दोन बाळांची आई आपल्यात असती, असंही भिसे कुटुंबीयांनी म्हटलं आहे. 

अमित गोरखे उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने सादर केलेला अहवाल खोटा आहे, मी उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटून याबाबतची कल्पना देणार असल्याचं भाजपचे विधानपरिषदेचे आमदार अमित गोरखेंनी म्हटलंय. डॉ घैसास, डॉ केळकर यांचे आणि माझे पीए सुहास भिसेंचे कॉल रेकॉर्ड तपासावेत यातून सर्व सत्य बाहेर येईल, अशी मागणी गोरखेंनी अहवाल पाहिल्यानंतर केली. आता अहवालात किमान दहा लाख रुपये ऍडव्हान्स कबुली रुग्णलयाने दिली, मात्र तनीषा भिसेंना कॅन्सर होता, अशी खोटी शंका रुग्णालयाने उपस्थित केल्याचा दावा ही गोरखेंनी केला.

काय म्हटलं आहे अहवालात?

१. सौ. भिसे ईश्वरी सुशांत (वृत्तपत्र व वाहिन्यांवर प्रसारित झालेले नाव सौ तनिषा सुशांत भिसे) MRD १०५३७६३. या २०२० पासून रुग्णालयात वेळोवेळी उपचार व सल्ला घेण्यासाठी येत होत्या. 

२. सदर महिला रुग्णाची २०२२ साली दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये ५०% चॅरिटीचा लाभ घेऊन शस्त्रक्रिया झाली होती. 

३. २०२३ साली या रुग्णाला रुग्णालयातर्फे सुखरूप गर्भारपण व प्रसूती होण्याची शक्यता नसल्याने मूल दत्तक घेण्या विषयी सल्ला देण्यात आला होता. 

४. सर्व रुग्णालयामध्ये असा संकेत असतो कि आई व बाळाच्या सुरक्षिततेसाठी प्रसूतीपूर्व तपासणी (ANC) कमीत कमी 3 वेळा करून घेणे आवश्यक असते. तो त्यांनी या रुग्णालयात केला नाही व त्याची या रुग्णालयास माहिती नाही. 

५. १५ मार्च रोजी इंदिरा IVF चे रिपोर्ट घेऊन त्या डॉक्टर घैसास यांना भेटल्या. अतिशय जोखमीच्या व धोकादायक pregnency बद्दल डॉक्टर घैसास यांनी त्यांना माहिती दिली. दर ७ दिवसांनी तपासणीस बोलावले. त्याप्रमाणे त्यांनी २२ तारखेस येणे अपेक्षित होते. परंतु तेव्हाही त्या आल्या नाहीत.

६. २८ मार्च २०२५ शुक्रवार रोजी सकाळी ११.३० वाजला सदर रुग्ण, पती व नातेवाईक डॉक्टर पैसास यांच्या बाह्यरुग्ण विभागात आले. ते Emergency किंवा Labour Room मध्ये आले नव्हते, याची कृपया नोंद घ्यावी. 

डॉक्टर घैसास यांनी तिची तपासणी केली. ती पूर्णपणे नॉर्मल होती व तिला कुठल्याही तातडीच्या उपचाराची गरज नव्हती. परंतु जोखमीची अवस्था लक्षात घेता observation साठी भरती होण्याचा सल्ला दिला. त्याच बरोबर pregnancy a caesarean section मधील धोक्याची माहिती देण्यात आली. तसेच नवजात अर्भक कक्षाच्या (NICU) डॉक्टरांशी त्यांची भेट करून देण्यात आली. कमी वजनाची, ७ महिन्याची जुळी मुले, जुन्या आजाराची गुंतागुंत व कमीत कमी २ ते २.५ महिने NICU चे उपचार लागतील हे समजावून सांगितले व रुपये १० ते २० लाख खर्च एकंदर येऊ शकतो याची कल्पना देण्यात आली. त्यावर रुग्णाच्या नातेवाईकांनी तुम्ही भरती करून घ्या व मी प्रयत्न करतो असे सांगितले. 

रुग्णाच्या नातेवाईकांनी वेद्रद्यकीय संचालक डॉक्टर केळकर यांना फोन केला व आपली अडचण सांगितली. त्यावर डॉक्टर केळकरांनी जमतील तेवढे पैसे भरा (नातेवाईकांप्रमाणे रुपये २ ते २.५ लाख), म्हणजे मी डॉक्टर घैसास यांना सांगतो, असे सांगितले. 

असाच सल्ला एका दूरच्या नातेवाईकांना श्री सचिन व्यवहारे यांनी फोनवर दिला. रुग्णाचा कोणीही नातेवाईक प्रशासन अथवा चॅरिटी डिपार्टमेंट इथे प्रत्यक्ष भेटला नाही याची कृपया नोंद घ्यावी. जेव्हा डॉक्टर केळकर यांचे ऑपेरेशन संपले व त्यांनी डॉक्टर घैसास यांना फोन केला तेव्हा त्यांनी रुग्ण न सांगता निघून गेल्याचे कळवले. 

डॉक्टर घैसास ह्यांना असे वाटत होते की रुग्ण पैश्याची तजवीज करत आहे. तशी तजवीज न झाल्यास रुग्णाच्या पतीला ससून येथे जाण्याचा सल्ला दिला होता. जेणेकरून आईची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया व होणाऱ्या अपुऱ्या वाढीच्या गर्भाची शुश्रूषा ससून येतील NICU मध्ये व्यवस्थित होईल. दरम्यानच्या काळात एका नर्सने रुग्ण /नातेवाईक आपली बॅग उचलून चालत गेल्याचे सांगितले. थोड्या वेळाने रुग्णाच्या नातेवाईकांकडून काहीच हालचाल न झाल्याने डॉ. पैसास यांनी रुग्णाच्या पतीला फोन केला, तो त्यांनी उचलला नाही. त्यामुळे २८ मार्च च्या दुपारनंतर रुग्णाचे काय झाले याबद्दल डॉ. घैसास व रुग्णालय प्रशासन यांना काहीच कल्पना नव्हती. 

यानंतर Daily Mirror मध्ये आलेल्या बातमीनंतर सर्वांना कळले की रुरणाचा सिझेरियनमध्ये झालेल्या गुंतागुंतीमुळे मृत्यू झाला. वृत्तपत्रातील माहिती प्रमाणे, २८ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता सूर्या हॉस्पिटल वाकड़ रपये भरती झाली व २६ मार्च राजी सकाळी सिडोरियन झाले. दीनानाथमधून सदर रुग्ण ससून व तिथून सूर्या हॉस्पिटलमध्ये स्वतःच्या गाडीने गेला व सिझेरियन सुद्धा दुसऱ्या दिवशी झाले ह्याची नोंद घ्यावी. तसेच सूर्या हॉस्पिा ल मधील माहितीनुसार आधीच्या operation ची व कॅन्सर संबंधीची व तिच्या नातेवाईकांनी माहिती लपवून ठेवत की असे समजते.

सदर चौकशी अंती व रुग्णालयातील इतर सिनियर gynaecologist च्या opinion नुसार आमच्या समितीचा निष्कर्ष खालीलप्रमाणे : 

१. सदर रुग्णासाठी Twin Pregnancy धोकादायक होती. 

३. माहितीचे रुग्णालय असून सुद्धा ANC चेकअप पहिले सहा महिने रुग्णालयात आल्या नाहीत. 

४. Advance मागितल्याच्या रागातून सदर तक्रार केलेली दिसते. 

रुग्णालयाचे वैद्यकीय सल्ले जसे मानले नाहीत तसेच वैद्यकीय संचालकांनी जमेल तेवढे पैसे भरुन ऍडमिट होण्याचा सल्ला पण त्यांनी पाळला नाही. 

रुग्णाच्या मृत्यूमुळे आलेली निराशा व advance मागितल्यामुळे आलेल्या रागातून ही दिशाभूल करणारी तक्रार करण्यात आली आहे असे समितीचे मत आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Elon Musk : भविष्यात पैसा 'बिनकामाचा' ठरणार, करंसीचे महत्व शून्य, नोकरी करणेही ऑप्शनल ठरेल; इलॉन मस्कची भविष्यवाणी
भविष्यात पैसा 'बिनकामाचा' ठरणार, करंसीचे महत्व शून्य, नोकरी करणेही ऑप्शनल ठरेल; इलॉन मस्कची भविष्यवाणी
एकनाथ शिंदे झोपतो कधी, उठतो कधी हा विरोधकांना प्रश्न पडतो, अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत अडीच तासापेक्षा जास्त झोपलो नाही : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे झोपतो कधी, उठतो कधी हा विरोधकांना प्रश्न पडतो, अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत अडीच तासापेक्षा जास्त झोपलो नाही : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मतदानाला अवघे काही तास, हिंगोलीत कारमध्ये सापडलं घबाड; पोलिसांकडून मोठी रक्कम जप्त, तपास सुरू
मतदानाला अवघे काही तास, हिंगोलीत कारमध्ये सापडलं घबाड; पोलिसांकडून मोठी रक्कम जप्त, तपास सुरू
VIP Number Plate : HR88B8888 नंबरप्लेटसाठी 1.17 कोटी रुपयांची बोली लावली पण एक ट्विस्ट, आता पुन्हा लिलाव, व्हीआयपी नंबर कोणाला मिळणार?
HR88B8888 नंबरप्लेटसाठी 1.17 कोटी रुपयांची बोली लावली पण एक ट्विस्ट, आता पुन्हा लिलाव कारण...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nagarparishad Election Postponed : निवडणुका पुढे का ढकलल्या? राज्य निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण
Nagarparishad Election : शिंदे, अजित पवारांसह इतर नेत्यांना प्रलोभनं देणारी वक्तव्य भोवणार-सूत्र
Nana Patole Nagpur : भाजप ऑपरेशन लोटस राबवण्याच्या तयारीत, एकनाथ शिंदे, अजित पवारांना फटका बसणार
Shahajibapu Patil On Raid : शहाजीबापू वाघ, कारवाईला घाबरणार नाही, यामागे फडणवीस नाही
Jaisingh Mohite on BJP : विधानसभेला आतून मदत करण्यासाठी 50 कोटींची ऑफर, मोहितेंनी केली भाजपची पोलखोल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Elon Musk : भविष्यात पैसा 'बिनकामाचा' ठरणार, करंसीचे महत्व शून्य, नोकरी करणेही ऑप्शनल ठरेल; इलॉन मस्कची भविष्यवाणी
भविष्यात पैसा 'बिनकामाचा' ठरणार, करंसीचे महत्व शून्य, नोकरी करणेही ऑप्शनल ठरेल; इलॉन मस्कची भविष्यवाणी
एकनाथ शिंदे झोपतो कधी, उठतो कधी हा विरोधकांना प्रश्न पडतो, अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत अडीच तासापेक्षा जास्त झोपलो नाही : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे झोपतो कधी, उठतो कधी हा विरोधकांना प्रश्न पडतो, अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत अडीच तासापेक्षा जास्त झोपलो नाही : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मतदानाला अवघे काही तास, हिंगोलीत कारमध्ये सापडलं घबाड; पोलिसांकडून मोठी रक्कम जप्त, तपास सुरू
मतदानाला अवघे काही तास, हिंगोलीत कारमध्ये सापडलं घबाड; पोलिसांकडून मोठी रक्कम जप्त, तपास सुरू
VIP Number Plate : HR88B8888 नंबरप्लेटसाठी 1.17 कोटी रुपयांची बोली लावली पण एक ट्विस्ट, आता पुन्हा लिलाव, व्हीआयपी नंबर कोणाला मिळणार?
HR88B8888 नंबरप्लेटसाठी 1.17 कोटी रुपयांची बोली लावली पण एक ट्विस्ट, आता पुन्हा लिलाव कारण...
एड्सच्या साथीचे सिंहावलोकन करताना..
एड्सच्या साथीचे सिंहावलोकन करताना..
नाकात नथणी, गळ्यात काँग्रेसचा गमछा; शेवटच्या दिवशी गौतमी पाटील उतरली प्रचारात, उंचावला 'हात'
नाकात नथणी, गळ्यात काँग्रेसचा गमछा; शेवटच्या दिवशी गौतमी पाटील उतरली प्रचारात, उंचावला 'हात'
अन्यथा संपूर्ण निवडणुका 'स्थगित' कराव्या लागल्या असत्या; निवडणुका आयोगाकडून पहिल्यांदाच स्पष्टीकरण
अन्यथा संपूर्ण निवडणुका 'स्थगित' कराव्या लागल्या असत्या; निवडणुका आयोगाकडून पहिल्यांदाच स्पष्टीकरण
Video महिला खासदारानं पाळीव कुत्र्याला कारमधून आणलं थेट संसद परिसरात; चावतंय का विचारताच दिलेल्या उत्तरानं भाजपचा संताप
Video महिला खासदारानं पाळीव कुत्र्याला कारमधून आणलं थेट संसद परिसरात; चावतंय का विचारताच दिलेल्या उत्तरानं भाजपचा संताप
Embed widget