Pune News: पुण्यातील बारामतीमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. वॉशिग सेंटरमध्ये काम करणाऱ्या मुलाचा वीजेचा झटका लागून मृत्यू झाला आहे. पण वॉशिंग सेंटरच्या वतीने करण्यात आलेल्या तक्रारीत चक्कर येऊन पडल्याने मुलगा दगावल्याची नोंद करण्यात आली आहे. १८ तारखेला घडलेल्या या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून पोलीस यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
बारामतीतल्या फलटण रोडवरील एका वॉशिंग सेंटर मध्ये कामावर असलेला सचिन कुंभार याचा विजेचा झटका लागून मृत्यू झाला आहे. सीसीटीव्ही कॅमेरात ही घटना कैद झाली आहे.
वॉशिंग सेंटरने दिली वेगळीच फिर्याद
वॉशिंग सेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुण काम करत असताना अचानक कोसळून खाली पडल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. 18 तारखेला घडलेल्या या घटनेनंतर वॉशिंग सेंटरने पोलिसांना या तरुणाचा चक्कर येऊन खाली पडल्याने मृत्यू झाला असल्याची फिर्याद दिली. परंतु जेव्हा तरुणाचे शुभविच्छेदन केले गेले तेव्हा या अहवालात विजेच्या झटक्याने तरुण ठार झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता या घटनेवर पोलीस काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुण्यात माजी नगरसेवक पुत्राचं दारुच्या नशेत हार्श ड्रायव्हिंग
शहरातील कल्याणीनगर भागात झालेल्या पोर्शे कार अपघाताच्या (Accident) घटनेनंतर पुण्यातील (Pune) पोलीस यंत्रणा अलर्ट झाली असून कारवाईला वेग आला आहे. पुण्यात दारु पिऊन गाडी चालवल्यास परवाना रद्द करण्यात येणार असल्याचंही पुणे पोलिसांनी यापूर्वीच सांगितलं आहे. मात्र, अद्यापही बड्य बापांची लेकरं दारु पिऊन गाडी चालवून इतरांचा जीव धोक्यात घालत असल्याचं पाहायला मिळत आहे. आधी पोर्शे कार अपघात, त्यानंतर अपघातांची मालिकाच लागल्यांचं दिसून आलं. मुंबईतील वरळीतही हीट अँड रन प्रकरण चांगलंच गाजलं. आता, पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) माजी नगरसेवकाच्या लेकानं दारु पिऊन टेम्पोला धडक दिली. त्यामध्ये, टेम्पोचालक आणि गाडीचा क्लीनर जखमी झाला आहे.
हेही वाचा: