पुणे: स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम बापू (Asaram Bapu) उपचारसाठी खोपोलीत दाखल झाला आहे. खोपोलीतील एका आयुर्वेदिक रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. चोख सुरक्षा व्यवस्थेत आसाराम बापूला खोपोलीत (Asaram Bapu) दाखल करण्यात आले आहे. अल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला (Asaram Bapu) राजस्थान उच्च न्यायालयाने दिलासा देत आयुर्वेदिक उपचार घेण्याची परवानगी दिली आहे. वैद्यकीय कारणासाठी आसारामला 7 दिवसांची पॅरोलवरची रजा मंजूर करण्यात आली आहे.


मागील काही दिवसांपासून आसाराम बापूला (Asaram Bapu) ह्रदयविकाराचा त्रास होत होता. आता त्याला पोलिस कोठडीमध्ये राहूनच हे उपचार घ्यावे लागणार आहेत. न्या. पी.एस.भाटी आणि न्या. मुन्नारी लक्ष्मण यांच्या पीठाने हे निर्देश दिले. आसाराम बापूला येथील रुग्णालयामध्ये ठेवण्यात आल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी भीती  पुणे पोलिसांनी व्यक्त केली होती. त्यानंतर त्याला कोर्टाने त्याला खोपोलीत उपचार घेण्याची परवानगी दिली आहे. 


आसाराम बापूला राजस्थान उच्च न्यायालयाने दिलासा देत आयुर्वेदिक उपचार घेण्याची परवानगी


अल्पवयीन मुलीवरील बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम बापू (Asaram Bapu) याला राजस्थान उच्च न्यायालयाने आयुर्वेदिक उपचार घेण्याची परवानगी दिली आहे.


सप्टेंबर 2013 मध्ये अटक करण्यात आलेल्या आसाराम (Asaram Bapu) (83) याच्यावर पुण्याच्या माधवबाग रुग्णालयात हृदयविकाराच्या आजारासाठी सात दिवस उपचार केले जातील, असे पोलिसांनी सांगितले. दुपारी 2:20 वाजता इंडिगोच्या विमानाने मुंबईला रवाना झालेल्या आसाराम बापूंसोबत जोधपूर पोलिस अधिकारी आणि इतर अधिकारी होते. यापूर्वी एअर ॲम्ब्युलन्सने रवानगी झाल्याची बातमी आली होती.


13 ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयाने आसारामला सात दिवसांच्या पोलीस कोठडीत महाराष्ट्रातील आयुर्वेदिक रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी दिली होती. तसेच पॅरोल मंजूर करताना हायकोर्टाने काही अटी घातल्या होत्या, ज्यात त्याच्यासोबत चार पोलीस कर्मचारी प्रवास करतील, त्याला सोबत दोन अटेंडंट ठेवण्याची मुभाही देण्यात आली होती. त्याला खोपोलीतील एका खाजगी कॉटेजमध्ये ठेवण्यात येणार असून उपचार व वाहतुकीचा संपूर्ण खर्च तसेच पोलीस बंदोबस्ताचा खर्च त्याला करावा लागणार आहे. आरोग्याच्या कारणास्तव शिक्षेला स्थगिती देण्याची आसारामची याचिका उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी फेटाळली होती.