Pune News:  मान्सूनचे आगमन झाले असले तरी महापालिकेकडून मान्सूनपूर्व कामे सुरूच आहेत. 90 टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला तरी शहरातील नाले, नाल्यांमध्ये अनेक ठिकाणी राडारोडा आणि कचरा दिसून येत आहे. उर्वरित काम 10 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी महापालिका शहरातील नाले, गटारी, पावसाळी गटार, चेंबर आदींची साफसफाई करून राडारोडा, तसेच डांबरी खड्डे बुजवते.


हे काम दरवर्षी एप्रिलमध्ये सुरू करून पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र, पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने खोल्या तुंबून रस्त्यावर पाणी साचले आहे. पावसाळ्यापूर्वी करावयाच्या कामांसाठी पालिका प्रशासनाने पुन्हा 11 कोटी रुपयांच्या 28 निविदा काढल्या आहेत. या निविदाही दरवर्षीपेक्षा कमी दराने आल्या आहेत. ही कामे मे अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पालिकेने ठेवले होते. आता पाऊस पडत आहे, एक-दोन दिवसांत कधीही पाऊस पडू शकतो.मात्र,शहरात पावसाळापूर्व कामे सुरूच आहेत.


शहराची नालेसफाईचं काम झालं नाही. या नाल्यांची वेळीच सफाई करा, यासाठी काही दिवसांपुर्वी पुणे शहरातील मनसेच्या कार्यकरत्यांनी पुणे महापालिकेच्या परिसराचत आंदोलन केलं होतं. भविष्यात जर महानगरपालिका प्रशासनाने नाले साफ केले नाही तर त्या विभागाच्या अधिकाऱ्यांनाच नाल्यात उतरवू, अशी आक्रमक भूमिका मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी घेतली आहे. पुण्यातील नालेसफाईचे काम अपुर्ण आहे किंवा नालेसफाई झालीच नाही, यावरुन पुण्याच्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत पुणे महानगरपालिकेसमोर आंदोलन केले आहे.


पुणे शहरामध्ये एकूण 236 नाले आहेत त्यातील 170 नाले पुणे शहरातून वाहतात. त्यातील अनेक नाल्यांची सफाई झालीच नाही. ज्या नाल्यांची सफाई झाली ते फक्त फोटोसेशनपुर्ती मर्यादित होती. या नालेसफाईच्या टेंडरमध्ये प्रचंड घोटाळा असतो. त्या घोटाळ्यात अनेक अधिकाऱ्यांना पैसै खायचे असतात. त्यामुळे फक्त दाखवण्याकरीता मधला गाळ काढून बाजुला टाकायचा. हे योग्य नाही. भविष्यात जर महानगरपालिका प्रशासनाने नाले साफ केले नाहीत तर त्या विभागाच्या अधिकाऱ्यांनाच नाल्यात उतरवू, अशी आक्रमक भूमिका मनसे शहराध्यक्षांनी घेतली आहे.