पुणे :पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार (Pune Nasrapur Girl Death) करून तिला निर्घृणपणे संपवलं, या प्रकरणातील आरोपीला आणखी दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीला आज (मंगळवारी, ता १२) ऑनलाईन पध्दतीने न्यायालयात हजर (Pune Nasrapur Girl Death) करण्यात आले, यावेळी त्याला आणखी दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. नसरापूर घटनेतील आरोपीला 14 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आज पुण्यातील शिवाजीनगर सत्र न्यायालयात आरोपीला हजर करण्यात आलं होतं. ऑनलाइन पद्धतीने आरोपीला कोर्टात हजर केलं होतं. यावेळी त्याला कोर्टाने विचारलं, पोलिसांविरोधात तक्रार आहे का? त्यावर आरोपीने, नाही, असे उत्तर दिलं. संपूर्ण युक्तिवाद पार पडल्यानंतर 24 मे पर्यंत आरोपीला पोलीस कोठडी देण्यात आली आहे.(Pune Nasrapur Girl Death)
Nasrapur Girl Death : पोलिसांविरोधात तक्रार आहे का?
नलाइन पद्धतीने आरोपीला कोर्टात हजर केलं होतं. यावेळी त्याला कोर्टाने विचारलं, पोलिसांविरोधात तक्रार आहे का? त्यावर आरोपीने, नाही, असे उत्तर दिलं. संपूर्ण युक्तिवाद पार पडल्यानंतर 24 मे पर्यंत आरोपीला पोलीस कोठडी देण्यात आली आहे.(Pune Nasrapur Girl Death)
Nasrapur Girl Death : नरसापूरमध्ये नेमकं काय घडलं?
पुण्यातील नसरापूर येथे 1 मे रोजी एक धक्कादायक घटना घडली. एका 65 वर्षीय व्यक्तीने, घरासमोर खेळणाऱ्या चिमुकलीला गोठ्यात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर दगडाने ठेचून तिला निर्घृणपणे संपवलं आणि नंतर तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली झाकून ठेवला. दुपारी चिमुकली न दिसल्यानं तीची शोधाशोध केल्यानंतर चिमुकली गोठ्यात मृत अवस्थेत आढळली. त्यानंतर परिसरात असलेले सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यानंतर आरोपी चिमुकलीला गोठ्याच्या दिशेने घेऊन जाताना दिसला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.(Pune Nasrapur Girl Death)
नराधम आरोपीने वासरू दाखवतो म्हणून हात धरून त्या चिमुकलीला गोठ्यात नेलं आणि तिच्यावर अत्याचार केला. आजीकडे उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आलेल्या या मुलीच्या कुटुंबीयांनी आपल्याच मुली सोबत असं कधी घडेल असा विचारही केला नव्हता. मात्र दुपारी साडेतीन वाजताचे ते सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आणि अख्खं कुटुंब हादरलं. या घटनेनंतर गावकऱ्यांनी संताप व्यक्त करत पोलिसांना घेराव घातला.(Pune Nasrapur Girl Death)
इतकं गंभीर कृत्य करूनही या नराधमाला त्याचा जराही पश्चाताप झालेला नाही. ग्रामस्थांनी त्याला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिलं. तरीही आपण काहीही चुकीचं केलेलं नाही, असा दावा या नराधमाने कोर्टात केला. शनिवारी पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केलं. यावेळी युक्तिवादही नराधमाच्या समोरच झाला. मग न्यायाधीशांनी या नराधमाला प्रश्न विचारला, तुमची केस नेमकी काय आहे माहिती आहे का? त्यावर या नराधमाने अक्षरश: संताप येईल, असं उत्तर दिलं. ही मारामारीची किरकोळ केस आहे, असं हा असूर कोर्टात म्हणाला. मात्र, या नराधमाने केलंलं हे पहिलं नाहीतर तिसरं कृत्य आहे. याआधी पुरावे नसल्यानं तो दोन वेळा निर्दोष सुटला. त्यामुळे किमान या प्रकरणात तरी त्याला कठोर शिक्षा व्हावी, अशी प्रतिक्रिया सर्वच स्तरातून उमटत आहेत.
