एक्स्प्लोर
Advertisement
पुण्यातील तरुणीच्या मृत्यूप्रकरणी दोघे ताब्यात
सिंहगड रोड परिसरात दोन दिवसांपूर्वी राधाकृष्ण सोसायटीमध्ये 29 वर्षीय तेजसा श्यामराव पायाळ नावाच्या तरुणीचा मृतदेह सापडला होता. पोलिसांना तिथे मद्याच्या बाटल्या, हुक्का आदी सामग्री सापडली होती.
पुणे : पुण्यातील माणिकबाग इथल्या सोसायटीत आढळलेल्या तरुणीच्या मृत्यूप्रकरणी दोन तरुणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. ताब्यात घेण्यात आलेले दोन्ही तरुण तिला एका पार्टीमध्ये भेटले होते. त्यांच्याशी परियच झाल्यानंतर त्यांचा संपर्क वाढला होता. दरम्यान हत्या की आत्महत्या या निष्कर्षावर पोलिस अजूनही पोहोचलेले नाहीत.
सिंहगड रोड परिसरात दोन दिवसांपूर्वी राधाकृष्ण सोसायटीमध्ये 29 वर्षीय तेजसा श्यामराव पायाळ नावाच्या तरुणीचा मृतदेह सापडला होता. मूळची बीडची असलेल्या तेजसाने एमबीएचं शिक्षण घेतलं होतं. ती हिंजवडी इथल्या एका कंपनीत कामाला होती. काही दिवसांपूर्वी ती आई वडिलांसोबत गावाला गेली होती. चार-पाच दिवसांपूर्वी ती पुण्यात परतली. मात्र त्यानंतर तेजसाचा फोन लागत नव्हता. तिची आई परतली असता तिला घरात मृतदेह आढळला.
तेजसाचा मृत्यू झाला त्या दिवशी पार्टी केल्यानंतर हे दोन्ही तरुण घराला बाहेरून कुलूप लावून गेले होते. पोलिसांना तिथे मद्याच्या बाटल्या, हुक्का आदी सामग्री सापडली होती. मात्र शवविच्छेदनाच्या अहवालानंतर खुनाचा गुन्हा नोंदवला असला तरी तिचा खून झाला आहे की आत्महत्या या निष्कर्षावर पोलिस अद्याप पोहोचले नाहीत.
सिंहगड पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम 302 (हत्या) आणि 201 (पुरावे नष्ट करणे) अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे. पुढील चौकशी सुरु असून तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या घटनाक्रमाचा मागोवा घेण्यावर काम करत असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion