एक्स्प्लोर

Pune Municipal Election 2026: मतदानानंतर बोटावरील शाई पुसून बोगस मतदान; रूपाली चाकणकरांची निवडणूक आयोगाकडे तक्रार, बोटावरील शाई लिक्विडने पुसून पुन्हा...पुण्यातील घटना

Pune Municipal Election 2026: पुण्यातील प्रभाग क्रमांक ३४ मध्ये अनेक महिला व मुले बोगस मतदान करून बोटावरील शाई लिक्विडने पुसून पुन्हा बोगस मतदान करत आहे.

Maharashtra Municipal Corporation Elections 2026: राज्यभरात महानगरपालिका निवडणुकीत मतदानानंतर बोटावर लावल्या जाणाऱ्या शाईबाबत मोठी चर्चा सुरू झालेली आहे. यावेळी पारंपरिक शाईऐवजी मार्कर पेनचा वापर करण्यात आला असून, त्यामुळे मतदानानंतर बोटावरती लावली जाणारी शाई पुसली जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. अशातच पुण्यात महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे (Maharashtra Municipal Corporation Elections 2026) तक्रार दाखल करण्यात आली आहे.  पुण्यात काही ठिकाणी मतदानानंतर बोटावरती शाई पुसून बोगस मतदान होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. काही महिला बोगस मतदान करत असल्याचा चाकणकरांचा दावा आहे. पुण्यातील (Maharashtra Municipal Corporation Elections 2026) प्रभाग क्रमांक ३४ मध्ये अनेक महिला व मुले बोगस  मतदान करून बोटावरील शाई लिक्विडने पुसून पुन्हा बोगस मतदान करत आहे, यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे रूपाली चाकणकरांनी तक्रार नोंदवली आहे.(Maharashtra Municipal Corporation Elections 2026)

बोटावर लावण्यात आलेली ही शाई फिनरने निघत असल्याच्या तक्रारी अनेक ठिकाणाहून येत आहे. पुण्यात प्रभाग क्रमांक ३४ (नऱ्हे, वडगाव बुद्रुक, धायरी ) मधील धायरी फाट्याजवळील नारायणराव सणस विद्यालयाच्या बाहेरील मतदान केंद्रावर मतदान झाल्यावर मतदाराला बोटाला लावण्यात येणारी मतदानाची शाई पुसत असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एका व्यक्तीला पकडले. त्याला चोप दिला. सकाळी साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला असल्याची माहिती आहे.(Maharashtra Municipal Corporation Elections 2026)

मुंबईत मतदान करुन परतलेल्यांच्या बोटावरची शाई पुसली, आयुक्त म्हणाले...

मुंबईत आज सकाळी मतदान करुन आलेल्या काही नागरिकांच्या बोटावरील शाई पुसली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत (BMC Election 2026) यंदा मतदान करणाऱ्या नागरिकांच्या बोटावर शाईऐवजी मार्करने (Voting Ink Mark) खूण केली जात आहे. पण या मार्करची शाई बोटावरुन पुसली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. बोटावर मार्करने खूण केल्यानंतर फक्त नखावरील शाई पुसली जात असल्याची कबुली मुंबई महानगरपालिकेचे (BMC Election 2026) आयुक्त भूषण गगराणी यांनीही दिली. कोल्हापूरमधील कर्मवीर इंग्लिश मिडीयम स्कूलमधील मतदान केंद्रावरही काही मतदारांच्या हातावरील शाई पुसली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे पुन्हा एकदा निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

राज्य निवडणूक आयोगाकडून यंदा मतदानासाठी शाईऐवजी मार्करचे किट उपलब्ध करुन देण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. हा मार्कर 2012 पासून प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वापरला जात असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने शेवटच्या क्षणी घेतलेले काही निर्णय वादग्रस्त ठरत आहेत. निवडणूक आयोगाने आता एक PADU नावाचं नवीन मशीन आणलं आहे. प्रिंटींग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट (PADU) मशीन असं त्याचे नाव आहे. मुंबईतील काही वॉर्डमध्ये ईव्हीएमला बॅकअप म्हणून हे यंत्र वापरले जाणार आहे. निवडणूक आयोगाने शेवटच्या क्षणी याबाबत माहिती दिल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. यापूर्वी कधीही PADU मशीन वापरण्यात आले नव्हते. मग निवडणूक आयोगाने आताच हे मशीन का वापरले, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता. तसेच मुंबईत गुरुवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाली तेव्हा निवडणूक आयोगाने आणखी एक धक्कादायक निर्णय जाहीर केला. त्यानुसार माध्यम प्रतिनिधींना मतदान केंद्रात सोडण्यास राज्य निवडणूक आयोगाकडून मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे मतदानाच्या ऐनवेळी निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे अनेक सवाल उपस्थित होत आहे.

उल्हासनगरमध्येही मतदानानंतरची बोटावर लावली जाणारी शाई लगेच पुसली

मतदान केल्यानंतर बोटावर लावली जाणारी शाई लगेच पुसली जात असल्याचा आरोप सर्वत्र केला जात आहे. अशातच उल्हासनगरमध्येही प्रभाग क्रमांक तीनमधील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शारदा रे शवाल यांचे प्रतिनिधी संजू रेशवाल यांचा आरोप आहे. मतदान केल्यानंतर बोटाला लावलेली शाई लगेचच पुसली जाते असा दावा त्यांनी केली आहे. असा काही प्रकार घडत असल्यास खबरदारी घेण्याचं सांगण्यात आले आहे.

बोटावर लावण्यात असलेली शाई पुसली जात असल्याप्रकरणी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. शाई पुसली जाते असे काही व्हिडिओ प्राप्त झाल्यानंतर पालिका आयुक्तांकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. शाई त्वचेला लागेल अशी गडद लावा आयुक्तांच्या सुचना आहेत. मार्करच्या मदतीने शाई लावली जात असल्याने शाई सहज पुसली जात असल्याचा मतदारांना संशय आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Chakan MIDC Pune News: चाकण MIDC मधून 20 कंपन्यांना टाळे लागणार, 1000 कोटींचा फटका, 4000 कर्मचारी बेरोजगार होण्याच्या मार्गावर
चाकण MIDC मधून 20 कंपन्यांना टाळे लागणार, 1000 कोटींचा फटका, 4000 कर्मचारी बेरोजगार होण्याच्या मार्गावर
Tukaram Mundhe Favorite Actress: तुमची आवडती हिरोईन कोण? मित्राचं नाव घेत तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, सभागृहात एकच हशा पिकला, नेमकं काय घडलं?
तुमची आवडती हिरोईन कोण? मित्राचं नाव घेत तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, सभागृहात एकच हशा पिकला!
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Raigad Accident News: चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Embed widget