एक्स्प्लोर

Guillain Barre Syndrome: जीबीएसच्या पार्श्वभूमीवर पुण्यात मोठी कारवाई, दूषित पाणी आढळलेल्या 'त्या' आरओ प्लांटला महापालिकेने ठोकलं टाळं

Guillain Barre Syndrome: महापालिका आयुक्तांनी अशा आरओ प्लांटवर कारवाईचा आदेश सोमवारी दिले आहेत. त्यानंतर मंगळवारी दूषित पाणी आढळलेल्या 19 प्लांटला टाळे ठोकले असल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे: पुण्यासह राज्यात गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome)ची रूग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. या आजारासाठी कारणीभूत ठरणाऱ्या दुषित पाण्याची चाचपणी देखील केली जात आहे. यावरून महानगर पालिका देखील ॲक्शन मोडवरती आल्याचं दिसून येत आहे. अशातच काही खासगी पाणी शुद्धीकरण प्रकल्पांच्या ठिकाणाहून (आरओ प्लांट) दूषित पाणीपुरवठा करत नागरिकांच्या जिवाशी खेळ करत असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी पैसे मोजूनही काही खासगी पाणी शुद्धीकरण प्रकल्पांनी (आरओ प्लांट) दूषित पाणीपुरवठा करून नागरिकांच्या जिवाशी खेळत असल्याचा प्रकार आहे. महापालिका आयुक्तांनी अशा आरओ प्लांटवर कारवाईचा आदेश सोमवारी दिले आहेत. त्यानंतर मंगळवारी दूषित पाणी आढळलेल्या 19 प्लांटला टाळे ठोकले असल्याची माहिती समोर आली आहे. 

पुणे महापालिकेतील नांदेड, किरकटवाडी, नांदोशी, धायरी, डीएसके विश्व, आंबेगावसह सिंहगड रस्ता परिसरातील गावांमध्ये गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome)चे (जीबीएस) रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून आले होते. महापालिका प्रशासनाने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या होत्या. प्रारंभी खासगी टँकर भरणा केंद्र आणि पाण्याची तपासणी केल्यानंतर संबंधित पाण्यात कॉलीफॉर्म जिवाणू असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार संबंधितांना महापालिकेने पत्रे पाठवली होती, तसेच पाणी शुद्ध करून पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. दरम्यान, महानगरपालिकेने 28 जानेवारीला 30 आरओ प्लांटमधील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतलेले होते. 

त्यासंबंधीच्या अहवालात 19 आरओ प्लांटमधील पाण्यात ई-कोलाय व अन्य जिवाणू आढळून आले होते. या दूषित पाण्याचा पुरवठा संबंधित आरओ प्लांट चालकांकडून केला जात असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला होता. या प्रकरणाची पुणे महानगर पालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत, सोमवारी संबंधित आरओ प्लांटवर कायदेशीर कारवाई करण्याचा आदेश पाणीपुरवठा विभागाला दिला होता. त्यानंतर मंगळवारी 19 आरओ प्लांटला टाळं ठोकण्यात आलं आहे. मात्र अद्यापही खासगी टँकरसह पाणी भरणा केंद्रावर कारवाईचा बडगा उगारलेला नाही. संबंधितांना पाणी शुद्ध करण्यासाठी ब्लिचिंग पावडरचा वापर करण्याचं आवाहन देखील महानगर पालिकेकडून करण्यात आलं आहे.

कोणत्या प्रकल्पांवर पालिकेची कारवाई?

माउली अ‍ॅक्वा, धायरी
युगंधर चाकणकर, धायरी
बालाजी अ‍ॅक्वा
रायकरमळा, धायरी
नालंद अ‍ॅक्वा
कोमल अ‍ॅक्वा
किरण अ‍ॅक्वा
सदगुरू अ‍ॅक्वा
धायरेश्वर अ‍ॅक्वा- 1
धायरेश्वर अ‍ॅक्वा - २
शिवालय अ‍ॅक्वा
प्रदीप कोरडे, कोरडे बाग
पंकज पायगुडे, जलधारा फ्रेश
नीलेश करंजकर अ‍ॅक्वा
किशोर पिंपळकर अ‍ॅक्वा
विजय कोल्हे अ‍ॅक्वा
सागर कोल्हे अ‍ॅक्वा
मोहन कोल्हे अ‍ॅक्वा
चव्हाण वस्ती, धायरी

खासगी टँकर व पाणी भरणा केंद्रांनंतर आरओ प्लांटमधील पाण्याचे नमुने महानगरपालिकेने तपासणीसाठी घेतले होते. त्यामध्ये 19 आरओ प्लांटमधील पाणी दूषित आढळले आहे. त्यानुसार संबंधित आरओ प्लांटला टाळे ठोकण्यात आले आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेचे पाणीपुरवठा विभाग प्रमुखांनी दिली आहे.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

शिवानी पांढरे
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पिंपरी चिंचवडमधील 52 कोटींचं भ्रष्टाचार प्रकरण! शिवसेना शिंदे गटासह राष्ट्रवादीचे खळबळजनक आरोप
पिंपरी चिंचवडमधील 52 कोटींचं भ्रष्टाचार प्रकरण! शिवसेना शिंदे गटासह राष्ट्रवादीचे खळबळजनक आरोप
मोठी बातमी : मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
पार्थ पवारांच्या विनंतीनंतर अर्ज माघारी घेणार होते, पण धनंजय मुंडेंची पोस्ट बघून लढण्याचा निर्णय घेतला : करुणा शर्मा
पार्थ पवारांच्या विनंतीनंतर अर्ज माघारी घेणार होते, पण धनंजय मुंडेंची पोस्ट बघून लढण्याचा निर्णय घेतला : करुणा शर्मा
Pune Crime News: प्रेमात आंधळ्या झालेल्या आईने सहा वर्षाच्या मुलाला संपवलं, प्रियकराच्या साथीने बनावही रचला, पण आजोबांमुळे फुटलं प्रकरणाचं बिंग, नेमकं काय घडलं?
प्रेमात आंधळ्या झालेल्या आईने सहा वर्षाच्या मुलाला संपवलं, प्रियकराच्या साथीने बनावही रचला, पण आजोबांमुळे फुटलं प्रकरणाचं बिंग, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Police Bharti Special Report : फाटक्या चपलातली दांडगी जिद्द, पोलिस भरतीवेळी थक्क करणारी घटना
Ashok Kharat Special Report : खरातविरोधात 160 जीबीचे पुरावे, त्या 19 फोल्डर्समध्ये काय दडलंय?
Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: महिला व बाल विकास विभागाचा मोठा निर्णय; अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनी पदाच्या सुधारित आकृतीबंधास मंजुरी
Maharashtra Live blog updates: महिला व बाल विकास विभागाचा मोठा निर्णय; अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनी पदाच्या सुधारित आकृतीबंधास मंजुरी
Manisha Mhaiskar : महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
Nitin Gadkari : मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करणार, नारायण राणेंसमोर नितीन गडकरींचा शब्द
मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करणार पण उद्घाटनाला येणार नाही, नितीन गडकरींनी कारण सांगितलं
Stock Market : शेअर बाजारात सेन्सेक्स- निफ्टीत 5 वर्षातील सर्वात मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या कमाईत एका आठवड्यात 29 लाखांची कमाई
शेअर बाजारात सेन्सेक्स- निफ्टीत 5 वर्षातील सर्वात मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या कमाईत एका आठवड्यात 29 लाखांची कमाई
Donald Trump : चर्चा निष्फळ ठरली तर हल्ला करु, सर्वात धोकादायक शस्त्र तयार, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी
चर्चा निष्फळ ठरली तर हल्ला करु, सर्वात धोकादायक शस्त्र तयार, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी
Personal Loan : वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
मोठी बातमी : मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
Embed widget