पुणे: पुणे महानगरपालिका निवडणूक अनेक कारणांमुळं चर्चेत आली होती. शहरात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या चेहऱ्यांपैकी अनेक नवे चेहरे आणि नावं चर्चेत आली होती. यामध्ये शहराच्या राजकारणात (Pune Municipal Corporation Result) विशेष लक्ष वेधून घेतल आहे ते वडगाव शेरी येथील प्रभाग क्रमांक ४. या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बापूसाहेब पठारे हे आमदार आहेत. बापूसाहेब पठारे जरी शरद पवारांच्या पक्षात असले तरी त्यांच्या कुटुंबाने या निवडणुकीत कमळ हाती घेतल्याचं दिसून आलं. सुरेंद्र पठारे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी ऐश्वर्या पठारे यांनी देखील भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली आहे. ऐश्वर्या पठारे या प्रभाग क्रमांक तीनमधून (Pune Municipal Corporation Result) निवडणुकीच्या रिंगणात होत्या, तर सुरेंद्र पठारे हे प्रभाग क्रमांक चारमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यामुळे शरद पवारांच्या आमदारांच्या घरातच त्यांचा मुलगा आणि सून हे भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत असल्याने शहराच्या राजकारणात याची विशेष चर्चा रंगली आहे. यादरम्यान अजित पवार यांनी त्यांच्याविरोधात शड्डू ठोकला होता. या पठारे पत्नी पत्नीने निवडणुकीत विजय मिळवला आहे.(Pune Municipal Corporation Result)
महापालिका निवडणुकीदरम्यान सुरेंद्र पठारे यांनी प्रभाग क्रमांक ३ आणि ४ ची जबाबदारी उचलली. प्रभाग ३ मधून पत्नी ऐश्वर्या पठारे तर प्रभाग ४ मधून स्वतः सुरेंद्र पठारे उमेदवार होते. (Pune Municipal Corporation Result)
Ajit Pawar On Pathare: अजित पवारांनी केलेलं लक्ष
चंदननगर येथील सभेत बोलताना त्यांनी भाजपचे उमेदवार सुरेंद्र पठारे यांच्यावर हल्लाबोल केला होता. मी मोठ्या काकाचा पुतण्या आहे. तुझ्या बापापेक्षा माझा काका खूप मोठा आहे, अशा शब्दात अजित पवारांनी सुरेंद्र पठारेंवर हल्लाबोल केला होता. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, मी शब्दाचा पक्का माणूस आहे. उद्याच्या निवडणुकीत तुम्हाला कोणाला तरी मत द्यायचे आहे. तुम्ही आधी अनेकांना मत दिले आहे. पूर्वी जे घड्याळावर निवडून आले होते, त्यांनाही तुम्ही संधी दिली. आता आम्हाला सत्ता द्या. या भागातील टँकर माफियांची कंबर मोडली नाही तर माझे नाव अजित पवार नाही, असंही अजित पवारांनी म्हटलं होतं.
यावेळी त्यांनी नाव न घेता भाजपच्या नेत्यांवरही टीका केली. घड्याळाचा गजर कसा वाजतो हे दाखवून देऊ, असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले. या भागात ड्रग्ससारखे प्रकार सुरु असल्याचे सांगून ते थांबवण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले होते. प्रभाग 4 मधील काही उमेदवार टँकर माफिया असल्याचा आरोप करत, जर कोणी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर आम्हीही शांत बसणार नाही, असा इशाराही अजित पवार यांनी दिला होता.
