पुणे: पुण्यात महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. काही प्रभागांचं चित्र स्पष्ट झालं आहे. यातील काही प्रभागांचं चित्र स्पष्ट झालं आहे. या निवडणुकीमध्ये (Pune Municipal Corporation Result) अनेक दिग्गज नेत्यांना आणि त्यांच्या कुटूंबातील व्यक्तींना (Pune Municipal Corporation Result) पराभवाचा सामना करावा लागत आहे. तर समोर आलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाच्या (Pune Municipal Corporation Result) नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांचा (Pune Municipal Corporation Result) पराभव झाला आहे, प्रभाग २५ आणि २६ अशा दोन प्रभागातून त्या निवडणूक लढवत होत्या. दोन्ही ठिकाणी त्या पराभूत झाल्या. तर सुरूवातीला त्यांनी ईव्हीएम मशीनवरती आक्षेप घेतला होता, त्यांनी काही वेळ मतमोजणी देखील बंद पाडली होती. मात्र दोन प्रभागांमध्ये त्यांचा पराभव झाल्याने त्यांच्यासह पक्षाला मोठा धक्का बसला आहे.(Pune Municipal Corporation Result)

आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू ऊर्फ सुर्यकांत आंदेकर याचाही पराभव

गेल्या काही दिवसांमध्ये चांगलेच चर्चेत आलेला आणि अपक्ष निवडणूक लढवणारा आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू ऊर्फ सुर्यकांत आंदेकर याचाही प्रभाग क्रमांक २४ मधून पराभव झाला आहे. बंडू आंदेकरांची भावजयी लक्ष्मी आंदेकर आणि सुन सोनाली आंदेकर या दोघी प्रभाग क्रमांक २३ मधून निवडून आल्या आहेत. या दोघींना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली होती. मात्र अपक्ष लढणाऱ्या स्वतः बंडू आंदेकराचा महानगरपालिका निवडणुकीत पराभव झाला आहे. बंडू आंदेकरला फक्त १५३ मते मिळाली आहेत.(Pune Municipal Corporation Result)

रविंद्र धंगेकरांच्या पत्नीसह मुलाचाही पराभव

शिवसेना नेते आणि माजी आमदार रविंद्र धंगेकरांनी पुणे महापालिकेसाठी (Pune Municipal Corporation Result)  आपल्या मुलाला आणि पत्नीला उमेवारी दिली होती, मुलगा प्रणव आणि पत्नी प्रतिभा या दोघांचाही पराभव झाला आहे. रविंद्र धंगेकरांच्या पत्नी प्रतिभा यांचा प्रभाग क्रमांक २३ मधुन पराभव तर मुलगा प्रणवचा प्रभाग क्रमांक २४ मधुन पराभव झाला आहे.(Pune Municipal Corporation Result)

वसंत मोरे यांना देखील पराभवाला सामोरं जाव लागलं

तर मनसेततून शिवसेना ठाकरे गटात गेलेले वसंत मोरे यांना देखील पराभवाला सामोरं जाव लागलं आहे. वसंत मोरेंसह त्यांचा मुलगा देखील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून निवडणूक लढवत होते. दोघांचाही मोठ्या फरकाने पराभव झाला आहे.(Pune Municipal Corporation Result)