Pune News : पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 9 (सूस-बाणेर-बालेवाडी-पाषाण) ही लढत शहरातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली होती. येथे भाजपचे उमेदवार लहू बालवडकर आणि भाजपमधून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केलेले उमेदवार अमोल बालवडकर (Amol Balwadkar vs Lahu Balwadkar) यांच्यात थेट सामना रंगला होता. त्यातच मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लहू बालवडकर हे राज्यांमध्ये सर्वाधिक मतं घेऊन विजयी होतील, असे भाकीत केले होते. चंद्रकांत पाटील यांच्या या भाकीतामुळे सर्वांचेच लक्ष या प्रभागाच्या निवडणुकीकडे लागले होते. त्या प्रभाग क्रमांक 9 चा निकाल काल (१६ जानेवारीला) रात्री उशीरा समोर आला आहे. या टफ फाईट मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल बालवडकर विजयी झाले आहेत. दोन्ही बाजुच्या उमेदवारांनी अनेकदा आक्षेप घेतल्याने मतमोजणी थांबवण्यात आली होती. त्यामुळे रात्री उशीरा या प्रभागाचा निकाल समोर आला आहे.(Chandrakant patils prediction)
पुण्यातील प्रभाग क्रमांक ९ मधून अमोल बालवडकर आणि बाबुराव चांदेरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर अमोल बालवडकर यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमधे प्रवेश केला होता. त्यामुळं मंत्री चंद्रकांत पाटलांनी ही लढत प्रतिष्ठेची केली होती. मात्र हाय होल्टेज लढतीत बालवडकर आणि चांदेरे यांनी विजय मिळवलाय. दोन्ही बाजुच्या उमेदवारांनी अनेकदा आक्षेप घेतल्याने मतमोजणी थांबवण्यात आली होती.
Chandrakant patils predictio: चंद्रकांत पाटलांचं भाकीत ठरलं खोटं
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लहू बालवडकर यांच्या प्रचारात उतरून मोठी भविष्यवाणी (Chandrakant patils prediction) केली होता. पाटील म्हणाले होते, "प्रभाग 9 मधून भाजपचे लहू बालवडकर हे महाराष्ट्रातील सर्वाधिक मतांनी नगरसेवक म्हणून विजयी होतील. डायरीत लिहून ठेवा, ही भविष्यवाणी खरी ठरेल." त्यावर अमोल बालवडकर यांनी पाटील यांची कोणतीही भविष्यवाणी (Chandrakant patils prediction) खरी ठरत नसल्याचे सांगितले होते, त्यामुळे या प्रभागाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आता अमोल बालवडकरांच्या विजयानंतर मंत्री चंद्रकांत पाटलांची भविष्यवाणी खोटी ठरल्याची चर्चा सुरू झाली आहे.(Chandrakant patils prediction)
माजी भाजप नगरसेवक अमोल बालवडकर यांना पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांच्या पॅनेलमध्ये गायत्री मेढे-कोकाटे, बाबुराव चांदेरे आणि पार्वती निम्हाण यांचा समावेश आहे. दुसरीकडे, भाजपने लहू बालवडकर यांना उमेदवारी दिली होती, त्यांच्या पॅनेलमध्ये रोहिणी चिमटे, गणेश कळमकर आणि मयुरी कोकाटे आहेत. हा प्रभाग आयटी हब आणि निवासी सोसायट्यांनी व्यापलेला असल्याने विकास, रस्ते, पाणी आणि वाहतूक या मुद्द्यांवर लढत अवलंबून होती. मात्र ही लढत सध्या निष्ठावंत विरुद्ध बंडखोर अशीच रंगाल्याची पाहायला मिळली.
